Maharashtra Local Body Election Result: स्वतंत्र लढत, एकत्रित यश ; महायुतीची अंतर्गत संघर्षाची 'ती' स्ट्रॅटेजी यशस्वी
Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; महायुतीने तब्बल…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रचारसभांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तर प्रचारात उतरलेही नव्हते असेच चित्र होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विजय महायुतीचा आत्मविश्वास वाढविणारा ठरणार हे निश्चित. महाविकास आघाडीला आपली रणनिती पूर्णपणे नव्याने आखावी लागणार आहे.
महाराष्ट्रात तब्बल नऊ वर्षांनंतर नगरपालिका निवडणुका होणार होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या महणून मानल्या जातात. स्थानिक कार्यकर्त्यांनाही महत्वाकांक्षा असतात. लोकसभा-विधानसभेसाठी तन-मन झोकून काम करणाऱ्या या स्थानिक कार्यकत्यांना आपली रग जिरवू द्या. त्यासाठी स्वतंत्र लढू, मग एकत्र येता येतेच या रणनीतीवर महायुतीनेकाम केले. प्रचारात तर महायुतीच्या स्थानिक पदाधिकारी-कार्यकत्यांमध्ये संघर्ष इतका टोकाला गेला की, प्रमुख नेत्यांना मध्यस्थी करावी लागली. पण हीच स्ट्रॅटेजी काम करती झाली. एका बाजूला स्थानिक पातळीवर पक्षांचे स्वतंत्र अस्तित्वही राहते. कार्यकर्तेदेखील पेटून काम करत असतात. निकालानंतर वरिष्ठ पातळीवर समझौताही होतो. महाराष्ट्रात महायुतीच्या पातळीवर तरी हेच चित्र आहे.
प्रमुख प्रचारसभा महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्रभर प्रचारसभा घेतल्या. आमच्यासाठी स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता लोकसभा-विधानसभेसाठी जीव निवडणुकीसाठी उतरायचे नाही का. मी मुख्यमंत्री असूनही अगदी दहा हजाराच्या लोकसंख्येच्या ठिकाणीही सभा घेतली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. एकनाथ शिंदे-अजितदादांनीही आपापल्या कार्यकर्त्यांसाठी-पदाधिका-यांसाठी जोर लावला. प्रमुख नेते प्रचारात प्रत्यक्ष उतरल्याचे दिसून आले नाही.






