
एका जागेसाठी चार उमेदवार होते रिंगणात
ठाकरे सेना आणि अपक्ष यांच्यात लढत
लांजा शहरात भाजपचे दणदणीत यश
लांजा: लांजा शहरासह तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या लांजा नगरपंचायतीवर अखेर शिवसेना भाजपा महायुतीने दणदणीत विजय संपादन केला आहे. प्रतिष्ठेच्या आणि अटीतटीच्या ठरलेल्या नगराध्यक्षपद निवडणुकीत शिवसेना महायुतीच्या सावली सुनील कुरूप यांनी १९८४ मताधिक्याने विजय संपादन केला आहे. तर नगरसेवक पदाच्या १७ पैकी १० जागांवर शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीने आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय संपादन केला आहे.
सहा जागांवर अपक्षांनी बाजी मारली असून शिवसेना उबाठाला एकमेव नगरसेवक पदावर समाधान मानावे लागले आहे. निकालानंतर शिवसेना महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. प्रभाग क्र. १ मधील एका जागेसाठी एकूण ५ उमेदवार रिंगणात होते.
Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; महायुतीने तब्बल…
यामध्ये शिवसेनेच्या निधी गुरव यांनी ३७० मते घेत विजय संपादन केला. प्रभाग क्र. २ मध्ये शिवसेना उबाठा व शिवसेना यांच्यात कडवी लढत झाली. या ठिकाणी शिवसेनेच्या पंढरीनाथ माय शेट्ये यांनी ३९२ मते घेत विजय संपादन केला. प्रभाग क्र. ३ मध्ये शिवसेनेच्या श्रद्धा संजय तोडकरी यांनी २६७ मते घेत विजय संपादन केला. प्रभाग क्र. ४ मध्ये रूढत लक्षवेधी ठरली होती, या ठिकाणी एका जागेसाठी ४ उमेदवार रिंगणात होते. या ठिकाणी शिवसेना उबाठाच्या सुशीला कांबळे यांनी २२४ मते घेत प्रतिस्पर्ध्याचा पाडाव केला. प्रभाग क्र. ५ मध्ये २
अपक्षांमध्ये लढत झाली.
“काँग्रेसमुक्त नगरपालिका तयार…”; भाजपच्या अभूतपूर्व यशावर Devendra Fadnavis यांनी विरोधकांना डिवचलं
भाजपा विरुद्ध अपक्ष
प्रभाग क्रमांक ९ मधील लढत देखील विशेष लक्षवेधी ठरली होती, शिवसेना विरुद्ध अपक्ष यांच्यात कड़वी लढत होऊन अपक्ष असलेला रफिक नाईक यानी शिवसेनेच्या दिलीप मुजावर यांचा पराभव केला. रफिक नाईया यांनी ३८९ मते घेत विजय मिळवला प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपा विरुद्ध अपक्ष अशी तुल्यबळ लढत झाली, या ठिकाणी भाजपाच्या प्रणाली तेली या २६९ मध्ये घेत विजयी झाल्या, प्रभाग क्रमांक ११ मध्ये तिरंगी लढत झाली. या ठिकाणी शिवसेनेव्या नीलिमा कनावजे यांनी २७६ मतांनी विजय संपादन केला, प्रभाग क्रमांक १२ मधील लढत ही देखील लक्षवेधी ठरली होती, या ठिकाणी शिवसेना महायुतीचा विजय होईल असा दावा केला जात असताना या ठिकाणी माजी नगरसेविका वंदना काहगाळकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असताना देखील २५१ मते घेत विजय संपादन केला.