Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde News: भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार; स्वबळावर लढत देत शिंदे शिवसेनेचा मोठा स्ट्राइक रेट

कोकणात मंत्री रवींद्र चव्हाण तसेच डहाणू-पालघरमध्ये गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या प्रभावाखालील भागांत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे

  • By anuradha sagar
Updated On: Dec 22, 2025 | 05:12 PM
'मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच महापौर होणार'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

'मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच महापौर होणार'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

Follow Us
Follow Us:
  • एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला घवघवीत यश
  • शिवसेनेने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच सुमारे १३५ जागांवर निवडणूक लढवली
  • भाजपाच्या उमेदवारांचा पराभव करत आपली स्वतंत्र ताकद दाखवून दिली
Shiv Sena Shinde faction victory: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने घवघवीत यश मिळवले आहे. भाजपासोबत युतीत असतानाच शिवसेना चांगली कामगिरी करते, हा समज मोडीत काढत शिंदे यांच्या शिवसेनेने अनेक ठिकाणी स्वबळावर लढत देत मोठा स्ट्राइक रेट नोंदवला आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून जितक्या जागा मिळाल्या नाहीत, त्यापेक्षा अधिक जागांवर एकट्या शिंदे यांच्या शिवसेनेने विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे

१२ पानांचं सुसाइड नोट अन् स्वतःवर झाडली गोळी… पंजाबच्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येने पोलीस दलात

शिवसेनेने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच सुमारे १३५ जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी ५० हून अधिक नगराध्यक्षपदे शिवसेनेच्या पदरात पडली आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या तुलनेत शिंदे गटाला पाच पट अधिक यश मिळाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची एकत्रित कामगिरीही शिंदे यांच्या शिवसेनेच्या यशापुढे फिकी ठरली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व तळागाळात स्वीकारले गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपाच्या बालेकिल्ल्यांना खिंडार

राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या उमेदवारांचा पराभव करत आपली स्वतंत्र ताकद दाखवून दिली आहे. कोकणात मंत्री रवींद्र चव्हाण तसेच डहाणू-पालघरमध्ये गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या प्रभावाखालील भागांत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. कणकवली आणि मालवण या दोन्ही प्रतिष्ठेच्या ठिकाणी शिवसेनेला यश मिळाले आहे. सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकट्याने लढत देत विरोधकांचा क्लीन स्वीप केला. महाडमध्ये भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भगवा फडकवला.

Maharashtra Local Body Election Result: स्वतंत्र लढत, एकत्रित यश ; महायुतीची अंतर्गत संघर्षाची ‘ती’ स्ट्रॅटे

मी मतदारांचे आभार मानतो. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची हाफ सेंच्युरी झाली. काहीजण म्हणत होते शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे, पण आता शिवसेना चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहचली आहे.
– एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

 

सटाण्यात शिंदे गट आणि भाजपामध्ये जोरदार टक्कर

नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. शिवसेनेच्या हर्षदा पाटील आणि त्यांचे पती राहुल पाटील यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे व त्यांच्या पत्नीचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला, हा निकाल पालकमंत्री दादा भुसे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठे यश मानले जात असून, भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांच्या वर्चस्वाला यामुळे स्पष्ट तडा गेल्याचे बोलले जात आहे. या निकालांमुळे राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात शिवसेना शिंदे गटाला एक स्वतंत्र आणि प्रभावी शक्ती म्हणून पुढे आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Shiv sena outperforms maha vikas aghadi with higher strike rate on its own

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • BJP
  • Ekanth Shinde
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी
3

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग
4

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.