Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेपूर्वीच लागले राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीचे वेध; महायुतीची तयारी सुरु, ‘या’ नावांवर चर्चा

राज्यात जुलै 2022 मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर आधीच्या आमदारांची यादी संपुष्टात आली. मात्र, यासाठी इच्छुकांची नावे निश्चित करण्यासाठी युतीच्या नेत्यांची देखील दमछाक झाली. आता विधानसभा निवडणुकीआधी या जागांवर नियुक्ती व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 24, 2024 | 07:15 AM
विधानसभेपूर्वीच लागले राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीचे वेध; महायुतीची तयारी सुरु, ‘या’ नावांवर चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. असे असल्याने आता राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील जागा भरण्यासाठी महायुतीमध्ये तयारी सुरू आहे.

महाविकास आघाडीची सत्ता असताना ठाकरे सरकारने आमदारांची यादी निश्चित करून ती तत्कालीन राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी या यादीच्या मंजुरीला विलंब केल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. राज्यात जुलै २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर आधीच्या आमदारांची यादी संपुष्टात आली. मात्र, यासाठी इच्छुकांची नावे निश्चित करण्यासाठी युतीच्या नेत्यांची देखील दमछाक झाली. आता विधानसभा निवडणुकीआधी या जागांवर नियुक्ती व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या बारा जागांपैकी भाजप सहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा आहेत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष इच्छुकांची नावे ठरविण्यात व्यस्त आहेत.

भाजपकडून चित्रा वाघ यांच्यासह पाच नावे चर्चेत

भाजपकडून महिला आघाडीच्या चित्रा वाघ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, आध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले, तसेच नाशिकचे बाळासाहेब सानप यांची नावे चर्चेत असली तरी यावर दिल्लीत निर्णय होणार आहे.

शिंदे गटाकडून शेवाळे, फाटक

शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार मनीषा कायंदे, माजी खासदार राहुल शेवाळे यांची नावे चर्चेत असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे अन्य नेत्यांनी देखील फिल्डींग लावली आहे.

अजित पवार गटाकडून चाकणकर

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुंबई बँकेचे सिद्धार्थ कांबळे, रूपाली चाकणकर, माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्यापैकी तीन नावे निश्चित होणार असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Mahayuti busy in mlc candidate finalization nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 07:15 AM

Topics:  

  • Mahaharashtra Politics
  • political news
  • Vidhan sabha

संबंधित बातम्या

Rahul Gandhi News: माजी न्यायाधीशांपासून नोकरशहांपर्यंत…; 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र
1

Rahul Gandhi News: माजी न्यायाधीशांपासून नोकरशहांपर्यंत…; 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र

नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बिघडणार
2

नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बिघडणार

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत
3

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश
4

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.