Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शायना एन. सी. यांच्या लग्नाला उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे; जुने फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो अनावधनाने फाडल्यामुळे शिंदेसेनेच्या नेत्या शायना एन.सी. या चर्चेत आल्या आहेत. यानंतर आता त्यांनी जुने फोटो शेअर करत त्यांच्या लग्नात बाळासाहेब ठाकरे उपस्थित असल्याचे क्षण शेअर केले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 19, 2026 | 01:56 PM
Balasaheb Thackeray attended Shaina N. C.'s wedding.

Balasaheb Thackeray attended Shaina N. C.'s wedding.

Follow Us
Follow Us:
  • शायना. एन. सी यांच्या लग्नाला बाळासाहेब ठाकरे यांची उपस्थिती
  • शायना. एन. सी यांनी शेअर केले बाळासाहेब ठाकरेंबरोबरचे फोटो
  • फोटो फाडल्याप्रकरणी मागितली माफी
Shaina N. C. Balasaheb Thackeray : शिंदेसेनेच्या नेत्या शायना एन. सी. यांच्याकडून अनावधानाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला. यामुळे जोरदार राजकारण तापले. ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत शायना एन.सी. यांच्याविरोधात आंदोलन केले. या दरम्यान, शायना एन. सी. यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. शायना. एन. सी यांच्या लग्नाला बाळासाहेब ठाकरे यांची उपस्थिती असल्याचे दिसून आले आहे.

शायना एन. सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो चुकून फाडल्याने वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी बाळासाहेब यांच्याबरोबरच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. यामध्ये बाळासाहेब ठाकरे त्यांच्या लग्नाला उपस्थित राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये संपूर्ण कुटुंबासह त्या दिसून आल्या असून लग्नाच्या दिवशी त्या बाळासाहेबांचे आशीर्वाद घेत असल्याचे दिसून आले. या फोटोतून बाळासाहेब ठाकरे व शायना एन. सी. यांच्या कुटुंबाचे घनिष्ट संबंध असल्याचे दिसून येत आहे.

माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व – शायना एन. सी.

या फोटोसह शायना एन. सी. यांनी लिहिले, “काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व. मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते.”

शिवसेना अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी? सोनिया गांधींच्या पुस्तकाऐवजी फाडला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो

पुढे त्यांनी लिहिले, “बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे.”

सुधीर मुनगंटीवार पुन्हा नाराज? ‘ही’ मागणी मान्य न झाल्याने महायुती सरकारची थेट केली इंग्रजांशी तुलना, चर्चांना उधाण

फोटो फाडण्याच्या घटनेवर शायना एन.सी. यांनी लिहिले, “कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते. बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की—बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही.”

काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व.
मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते.
बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे.
कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते.
बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की—बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही!
सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा!
जय हिंद, जय महाराष्ट्र! @Shivsenaofc
— Shaina Chudasama Munot (@ShainaNC) November 19, 2026

पुढे त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावत लिहिले, “सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.”

Web Title: Balasaheb thackeray was present at shaina n cs wedding old photos shared viral nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • political news
  • shivsena

संबंधित बातम्या

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा क्षेत्रातील त्रिमूर्तीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांना घरं सोडण्याची वेळ
1

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा क्षेत्रातील त्रिमूर्तीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांना घरं सोडण्याची वेळ

‘हे पुस्तक जर्नी ऑफ लव्ह नाही तर लव्ह जिहाद…’; शिवसेनेकडून सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
2

‘हे पुस्तक जर्नी ऑफ लव्ह नाही तर लव्ह जिहाद…’; शिवसेनेकडून सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दैवत…”
3

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दैवत…”

सोनिया गांधींचे पुस्तक फाडताच काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेला थेट दिले ‘हे’ आव्हान
4

सोनिया गांधींचे पुस्तक फाडताच काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेला थेट दिले ‘हे’ आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.