Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahayuti Cabinet expansion: महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; कुणाला मिळणार संधी, कुणाची होणार गच्छंती?

आजपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात  विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झालेले कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 07, 2024 | 11:35 AM
महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध

महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात 5 डिसेंबरला महायुतीचे नवे सरकार सत्तेवर आले आहे. 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडल विस्ताराचे वेध लागले आहे. तत्पुर्वी आजपासून (7 डिसेंबर) विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आज नवनिर्वाचित आमदारांना आज शपथ दिली जाईल.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, नवीन सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 30 ते 32 आमदार मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. यामध्ये भाजपचे 15, शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे 7 ते 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपला एकूण 21 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे मिळू शकतात.

Kumar Ketkar Criticized BJP: “भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरण’- कुमार केतकर

निवडणुकीत भाजपने अभुतपूर्व 132 जागां जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडे काही निवडक आणि महत्त्वाची खाती असतील.  यात गृह खाते, गृहमंत्री बांधकाम, सरकारी शिष्टाचार, ऊर्जा, कायदा व न्याय, ग्रामविकास, पाटबंधारे, महसूल, पर्यटन, कौशल्य विकास, आदिवासी आदी विभागांचा समावेश असल्याचेही स्पष्ट दिसते आहे. यासोबतच  सामान्य प्रशासन विभागही भाजप आपल्याजवळ ठेवू शकते, अशी माहिती आहे.

शिंदे गट- अजित पवार गटाला काय मिळणार?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला  उत्पादन शुल्क, पर्यावरण, सामाजिक न्याय, नगरविकास, खाणकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, उद्योग, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अन्न व पुरवठा, एफडीए, वित्त व नियोजन, महिला व बालविकास, क्रीडा व युवक कल्याण, कृषी व पुनर्वसन ही खाती मिळू शकतात.

थंडीमध्ये शरीरातील हाडे कटकट वाजतात? मग नियमित करा ‘या’ काळ्या दाण्यांचे सेवन, हाडं

किती मंत्री घेणार शपथ?

सध्या महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडून मुख्यमंत्र्यांसह 21 मंत्र्यांची शपथ घेण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेनेचे 11 ते 12 आणि राष्ट्रवादीचे 9 ते 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, एक-दोन दिवसांत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संख्या आणि नावे निश्चित होतील, अशी माहिती  भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात  विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झालेले कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील. विधानसभेच्या अध्यक्षांची निवड 9 डिसेंबर म्हणजेच सोमवारी होणार आहे, त्यानंतर नवीन सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल. राज्यपाल देखील दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. . यानंतर 16 डिसेंबरपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे.

Web Title: Mahayuti cabinet expansion latest news update nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 11:18 AM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.