हिवाळ्यात काळे तीळ खाण्याचे फायदे
हिवाळ्यातील वातावरणामुळे हळूहळू रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्यास सुरुवात होते. या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. थंड वातावरणामुळे सतत सर्दी, खोकला, ताप येणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात काळ्या तिळाचे सेवन करावे. काळे तीळ शरीरातील उष्णता निर्माण करतात. शिवाय आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये घरी काळे तीळ, पांढरे तीळ आणि गुळाचा वापर करून लाडू बनवले जातात. तिळांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, कॅल्शियम, लोह, ओमेगा 6 फॅटी ॲसिड, मॅग्नेशियम, जस्त, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात काळ्या तिळाचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी तुम्ही तीळ आणि गूळ एकत्र मिक्स करून खाऊ शकता. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. शरीराला आलेली सूज, हाडांचे आरोग्य आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी काळे तीळ अतिशय उपयोगी आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात तीळ खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हिवाळ्यात नियमित तिळाचे सेवन केल्यामुळे कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे रोजच्या आहारात तीळ आणि गुळाचे सेवन करावे. तिळामध्ये अँटिऑक्सिडंट्स, विटामिन ई आणि झिंक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ज्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ खाल्यामुळे सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत नाही.
हिवाळ्यात काळे तीळ खाण्याचे फायदे
थंडीच्या दिवसांमध्ये तीळ खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हाडे मजबूत राहतात. शिवाय यामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे नियमित तीळ आणि गुळाचे सेवन करावे. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात काळे तीळ खावेत.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये सर्वच घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात. मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, तिळाचे लाडू त्याप्रमाणेच तुम्हीसुद्धा काळ्या तिळाचे लाडू बनवू शकता. हे लाडू आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक आहेत. शिवाय तिळाचे सेवन तुम्ही दूध किंवा पाण्यासोबत करू शकता. यामुळे तुमची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.