Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीकडून अमित ठाकरेंसाठी फिल्डिंग? सदा सरवणकरांना ‘ही’ ऑफर दिल्याची चर्चा, माहीममध्ये काय होणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2024 | 03:15 PM
महायुतीकडून अमित ठाकरेंसाठी फिल्डिंग? सदा सरवणकरांना 'ही' ऑफर दिल्याची चर्चा, माहीममध्ये काय होणार?

महायुतीकडून अमित ठाकरेंसाठी फिल्डिंग? सदा सरवणकरांना 'ही' ऑफर दिल्याची चर्चा, माहीममध्ये काय होणार?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या ठिकाणी महायुती अमित ठाकरे यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सरवणकर यांनी अर्ज भरला आहे. मात्र महायुतीचा धर्म पाळण्यासाठी त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र सरवणकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान आता त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांना मोठी ऑफर दिली गेल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान अमित ठाकरे यांना मदत करण्यासाठी सदा सरवणर यांना अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली जात आहे. तसेच सदा सरवणकर यांना महायुतीकडून विधानपरिषदेची ऑफर देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता सदा सरवणकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदा सरवणकर हे महायुतीचा दबाव स्वीकारून विधानपरिषदेची ऑफर स्वीकारणार का? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माहीममधून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्यामुळे जून 2022 मध्ये शिवसेनेची दोन गटात विभागणी झाली होती.

माहीम विधानसभेतून तिरंगी लढत

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात माहीम जागेवरील लढत अतिशय रंजक ठरणार आहे. कारण मध्य मुंबईतील या विधानसभा मतदारसंघात तीन ‘सेना’मध्ये टक्कर होणार आहे. राज्यात सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष शिवसेना, विरोधी पक्ष शिवसेना (यूबीटी) आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) उमेदवारांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. माहीम ही मुंबईतील 36 विधानसभा जागांपैकी एक आहे.

हेही वाचा: माहीम विधानसभेतून तिरंगी लढत; ‘राज’ पुत्राला माहिमचा किल्ला जिंकता येणार का?

माहीममध्ये कोणती समीकरणे तयार होताना दिसली?

अमित ठाकरे यांना भाजपचा पाठिंबा मिळाल्यास आणि महायुतीच्या उमेदवारांनी नावे मागे घेतल्यास माहीमची कहाणी बदलू शकते. ही जागा जिंकण्यासाठी राज ठाकरे यांचा मुलगा प्रबळ दावेदार ठरणार आहे. मात्र, त्याची शक्यता कमी दिसते. भाजप नेत्यांनी केवळ निवडणुकीची वक्तव्ये केली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्याचवेळी माहीमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी शनिवारी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले होते.  माहीम विधानसभा मतदारसंघ 1990 पासून नेहमीच अविभक्त शिवसेना किंवा मनसेकडे आहे. 2009 मध्ये मनसेचे नितीन सरदेसाई येथून विजयी झाले होते.

 

Web Title: Mahayuti give vidhanparishad offer to sada sarvankar for help of amit thakceray mahim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 03:01 PM

Topics:  

  • amit thackeray
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
1

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी…’; संजय गायकवाड यांची इच्छा
3

‘आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी…’; संजय गायकवाड यांची इच्छा

KDMC News : खड्ड्यांच्या त्रासापासून नागरिकांना दिलासा; शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात
4

KDMC News : खड्ड्यांच्या त्रासापासून नागरिकांना दिलासा; शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.