मुंबईत टेक वीकमध्ये प्रमुख AI आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचे अनावरण (फोटो सौजन्य-X)
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई टेक वीक २०२५चे उदघाटन केले. मुंबई टेक वीक २०२५ (एमटीडब्ल्यू’२५) मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग प्रमुख व धोरणकर्त्यांसह एआय आणि इनोव्हेशनसाठी जागतिक पॉवरहाऊस म्हणून मुंबईचे स्थान उंचावण्यासाठी अनेक धोरणात्मक उपक्रमांची घोषणा केली. या घोषणांमुळे तंत्रज्ञान प्रगत करण्यापुरती, उद्योजकतेला चालना देण्याप्रती आणि या ठिकाणी परिवर्तनकारी गुंतवणूक आकर्षित करून घेण्याप्रती महाराष्ट्र सरकारची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
धोरणात्मक फिनटेक पायाभूत सुविधांचा विस्तार: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत औपचारिक जमीन हस्तांतरण करून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)चे अधिकृतपणे स्वागत केले.
उद्योजकता म्युझियम: मुंबई शहरातील व्यवसाय नाविन्यतेचा वारसा साजरा करण्यासोबत दाखवण्यासाठी भारतातील अद्वितीय उद्योजकता म्युझियम स्थापन करण्यास सज्ज आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र सरकार आणि टेक आंत्रेप्रीन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीईएएम) गव्हर्निंग कौन्सिलच्या प्रमुख भागधारकांसह मुंबई टेक वीक २०२५ च्या उद्घाटनाप्रसंगी ही घोषणा केली. हे म्युझियम नॉलेज हब म्हणून काम करेल, जे उद्योजकीय टप्प्यांना दाखवेल आणि संस्थापकांच्या भावी पिढीला प्रेरित करेल.
टीईएएम मुंबई २०२५ अहवाल लाँच: बहुप्रतिक्षित टीईएएम-मुंबई अहवालासाठी मॅककिन्से अँड कंपनी नॉलेज भागीदार आहे. हा अहवाल मुलभूत संशोधन आणि विश्लेषणात्मक तथ्य-आधार प्रदान करतो. माननीय मुख्यमंत्री यांनी टीईएएम गव्हर्निंग कौन्सिल आणि मॅककिन्से इंडिया लीडरशीपसोबत या अहवालाचे अनावरण केले. हा सखोल अहवाल भारताची एआय राजधानी म्हणून मुंबईचा उदय, त्याची वेगाने वाढणारी स्टार्टअप इकोसिस्टम आणि येत्या दशकात एआय-नेतृत्वाखालील इनोव्हेशन्सचा अंदाजित आर्थिक परिणाम याबद्दल माहिती देतो.
सामंजस्य करार: महाराष्ट्र सरकार आणि मेटा: महाराष्ट्र सरकार आणि मेटा यांनी प्रशासनात एआय एकत्रित करण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. या सहयोगांतर्गत, मेटाचा एआय-संचालित ‘आपले सरकार’ उपक्रम प्रगत एआय मॉडेल्सच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा वितरण आणि नागरिकांचा सहभाग वाढवेल.
इनोव्हेशन सिटी व एआयसंदर्भात कौशल्य विभाग व टीईएएम यांच्यामध्ये सामंजस्य करार: महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि टीईएएम यांनी महाराष्ट्रात एआय-संचालित इनोव्हेशनला चालना देण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. ते धोरण, स्टार्टअपला पाठिंबा आणि प्रशासनासाठी एआय यासंदर्भात सहयोग करतील. या सहयोगाचा एआय परिसंस्था मजबूत करण्याचा आणि संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक वाढीला चालना देण्याचा मनसुबा आहे.
टीईएएम एंजल्सचे लॉंच: टीईएएमने संस्थापक-नेतृत्वित गुंतवणूक समूह ‘टीईएएम एंजल्स’ची घोषणा केली, जेथे संस्थापक मुंबई-आधारित स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी भांडवल एकत्र करतात. हा उपक्रम मुंबईतील सर्वोत्तम सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी भांडवल, मार्गदर्शन आणि उद्योग नेटवर्क उपलब्ध करून देईल. इनोव्हेशन सिटीमध्ये मुख्यालय असलेल्या त्याच्या मुंबई-आधारित स्टार्टअप्सना संरचना आणि निधीद्वारे समर्थन देण्याचे एकमेव लक्ष्य असेल.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”योग्य संधी मिळाल्यास आपल्या लोकांना काय साध्य करता येते हे आपण पाहिले आहे, म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्याला पुढील स्टार्ट-अप हब म्हणून स्थान देण्यासाठी कटिबद्ध आहोत. बहुतेक स्टार्टअप्स आता तंत्रज्ञानावर आधारित असल्याने आपल्या देशाच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करू इच्छिणाऱ्या प्रत्येक इनोव्हेटरचे पालनपोषण करण्यासाठी आम्ही व्यापक परिसंस्था तयार करत आहोत. आमचे ध्येय स्पष्ट आहे की, महाराष्ट्र संपूर्ण भारतात इंजिन पॉवरिंग इनोव्हेशन बनेल आणि आपल्या राज्याच्या सीमेपलीकडे देखील समृद्धी निर्माण करेल.”
महाराष्ट्र सरकारसोबत सहयोगाने टीईएएम (टेक आंत्रेप्रीन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबई) द्वारे राबवण्यात येणाऱ्या आशियातील सर्वात मोठ्या एआय कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वामध्ये जागतिक विचारवंत, धोरणकर्ते आणि उद्योगातील अग्रणी एकत्र आले, जेथे एआयच्या भविष्याला आकार देणाऱ्या अर्थपूर्ण चर्चा करण्यात आल्या आणि सहयोगांना चालना मिळाली.