Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस पुरवठ्यात मोठ्या अडचणी; ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीचा आधार

सिलेंडर मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे अनेक ठिकाणी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आल्याची चर्चा सुरू आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे बोलले जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 01, 2026 | 01:25 PM
गॅस पुरवठ्यात मोठ्या अडचणी; ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीचा आधार

गॅस पुरवठ्यात मोठ्या अडचणी; ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीचा आधार

Follow Us
Follow Us:

हिंगोली : ग्रामीण भागातील महिलांना धुरापासून मुक्ती मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु करण्यात आली. सध्या गॅस सिलेंडर पुरवठ्यातील अडचणींमुळे ही योजना प्रश्नचिन्हात आल्याचे चित्र आहे. सिलेंडर मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे अनेक ठिकाणी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आल्याची चर्चा सुरू आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे बोलले जात असून, त्याचा परिणाम घरगुती गॅस उपलब्धतेवरही होत असल्याचे सांगितले जाते.

शहरातील हॉटेल व्यवसायानंतर आता घरगुती वापरावरही त्याचा परिणाम जाणवत असल्याची माहिती मिळत आहे. उज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण महिलांना मोफत गॅस जोडणी देऊन त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि धुरापासून मुक्ती देणे हा उद्देश होता. मात्र, सध्या काही ठिकाणी गॅस मिळत नाही. जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त बुकिंग करू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले जात आहे.

मेसेज न मिळाल्याने संभ्रम

पूर्वी बुकिंगनंतर तात्काळ मेसेज मिळत होता. मात्र, बुकिंगनंतर मेसेज मिळत नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, अफवा पसरत असल्याचे दिसत आहे. मात्र, सध्या काही ग्राहकांना मेसेज मिळत नाही. त्यामुळे सर्व ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असेही सांगण्यात आले आहे.

श्वसनाच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

उज्वला योजनेमुळे अनेक घरांतील चुली बंद झाल्या होत्या. मात्र, आता काही भागात सिलेंडर उपलब्धतेच्या अडचणींमुळे महिलांनी पुन्हा चुलीचा वापर सुरू केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे धुरामुळे होणाऱ्या डोळे व श्वसनाच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यात उज्वला योजनेतून सुमारे ७५४६२ गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे ग्रामीण महिलांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पुरवठा सुरळीत राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी केरोसीनचा वापर वाढू शकतो अशी चर्चा आहे. काही वर्षांत केरोसीनचा वापर कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा स्टोव्हचा वापर वाढला आहे.

हेदेखील वाचा : सरकारचा मोठा निर्णय! रेशन दुकानांवर पुन्हा मिळणार रॉकेल; ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यांना मिळाली मंजुरी?

Web Title: Major difficulties in gas supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • international news
  • Iran-Israel War
  • War News

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
1

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.