Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा इशारा, जाणून घ्या काय म्हणाले

लाडकी बहीण योजना' e-KYC बाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्यांवर महिला व बालविकास विभागाने मोठा खुलासा केला आहे. कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याचा कोणताही आदेश दिला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 21, 2026 | 03:36 PM
'लाडकी बहीण' योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा इशारा (Photo Credit- X)

'लाडकी बहीण' योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा इशारा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • लाडकी बहीण योजना
  • e-KYC च्या फसव्या बातम्यांवर सरकारचे स्पष्टीकरण;
  • महिला व बालविकास विभागाचे सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या e-KYC प्रक्रियेबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. सोशल मीडियावरील भ्रामक दाव्यांवर विश्वास ठेवून महिलांनी कोणत्याही शासकीय कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले होते. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास बँकेत पैसे जमा होणार नाहीत, असे सरकारने आधीच स्पष्ट केले होते. मात्र, या प्रक्रियेची अंतिम मुदत आता संपली असून राज्यातील लाखो महिलांचे e-KYC अद्याप अपूर्ण आहे. यामुळे संबंधित महिलांना योजनेचा लाभ मिळणे तात्पुरते बंद झाले आहे.

सोशल मीडियावरील ‘त्या’ बातमीमुळे महिलांमध्ये संभ्रम

याच दरम्यान सोशल मीडियावर एक खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली. तांत्रिक अडचणींमुळे ज्या महिलांचे e-KYC होऊ शकले नाही, त्यांनी आपले सर्व अधिकृत दस्तऐवज थेट जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जमा करावेत, असा दावा या बातमीत करण्यात आला होता. या अफवेला बळी पडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेकडो महिला कागदपत्रे घेऊन शासकीय कार्यालयांमध्ये चकरा मारू लागल्या. या वाढत्या गर्दीची आणि संभ्रमाची दखल घेत अखेर सरकारने अधिकृत परिपत्रक काढून यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद का झाला? पात्र असूनही खात्यात पैसे न आल्याने महिलांचा संताप!

शासकीय कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याचा कोणताही आदेश नाही!

महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, “ज्या महिला मुदतीत आपले e-KYC पूर्ण करू शकलेल्या नाहीत, त्यांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात येून कागदपत्रे जमा करावीत, असे कोणतेही निर्देश किंवा आदेश शासनाने जारी केलेले नाहीत.” योजनेची e-KYC करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल रोजीच संपली आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतर कार्यालयात कागदपत्रे स्वीकारली जात असल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आणि चुकीच्या आहेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

भ्रामक रिपोर्ट्सवर विश्वास ठेवू नका: प्रशासनाचे आवाहन

महिला व बालविकास विभागाने सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः महिला भगिनींना आवाहन केले आहे की, त्यांनी अशा कोणत्याही सोशल मीडियावरील मेसेज किंवा भ्रामक बातम्यांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही अधिकृत निर्णयाची माहिती केवळ सरकारी संकेतस्थळांवर किंवा अधिकृत प्रसिद्धीपत्रकांद्वारेच दिली जाते. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडून स्वतःचा वेळ आणि श्रम वाया घालवू नये.

३० एप्रिल ही होती अंतिम मुदत

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी १ एप्रिल रोजी जाहीर केले होते की, तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या महिलांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC सुधारणेसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही वाढीव मुदत संपल्यानंतरही ज्या लाभार्थ्यांनी आवश्यक पडताळणी केली नाही, त्यांना अपात्र ठरवून सध्या योजनेचा लाभ देणे थांबवण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana: दोन महिने उलटले, पण हप्ता नाहीच; लाभार्थी महिलांचा सरकारविरोधात संताप

Web Title: Major warning from the department of women and child development regarding e kyc for the ladki bahin scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Ladki Bahin Yojana
  • maharashtra

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! बोगस लाडक्या बहिणींचा 9605 कोटींवर डल्ला; राज्य सरकार आता ‘त्या’ महिलांकडून पैसे करणार वसूल?
1

मोठी बातमी ! बोगस लाडक्या बहिणींचा 9605 कोटींवर डल्ला; राज्य सरकार आता ‘त्या’ महिलांकडून पैसे करणार वसूल?

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
2

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका
3

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान
4

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.