Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळ्या काचांच्या वाहनांवर माळेगाव पोलिसांचा दणका; काचा उतरवून दंडात्मक कारवाई, नियमभंग करणारी वाहने केली डिटेन

Malegaon black glass vehicles crackdown: माळेगाव शहरात काळ्या काचा लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी विशेष कारवाई मोहीम सुरू केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 14, 2026 | 08:48 PM
Malegaon black glass vehicles crackdown

Malegaon black glass vehicles crackdown

Follow Us
Follow Us:
  • काळ्या काचांच्या वाहनांवर माळेगाव पोलिसांचा दणका
  • काचा उतरवून दंडात्मक कारवाई
  • नियमभंग करणारी वाहने केली डिटेन

माळेगाव : शहरात वाहनांना काळ्या काचा लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात माळेगाव पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. काळ्या काचा असलेल्या वाहनांच्या काचा जागेवरच उतरवून संबंधित चालकांकडून दंड वसूल करण्यात येत असून, वारंवार नियमभंग करणारी काही वाहने डिटेन करण्यात आली आहेत.माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध चौकांमध्ये वाहनांची तपासणी सुरू आहे. विशेषतः इंजिनिअरिंग कॉलेज परिसर, राजहंस चौक यासह प्रमुख मार्गांवर गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

‘भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत अन्न…’; काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?

यापूर्वी दंडात्मक कारवाई करूनही काही वाहनचालकांकडून काळ्या काचा लावण्याचे प्रकार सुरूच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी आता केवळ दंड आकारण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता वाहनांवरील काळ्या काचा काढणे आणि आवश्यकतेनुसार वाहने डिटेन करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, वाहनांची नंबर प्लेट झाकणे, नंबर प्लेटवर अत्यंत लहान अक्षरांत क्रमांक लिहिणे अथवा नंबर प्लेटमध्ये अनधिकृत बदल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई केली जात आहे.

काळ्या काचांचा वापर करून वाहनांमध्ये संशयास्पद हालचाली लपविण्याची शक्यता असते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे, वाहनांमधून होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, वाहतूक पोलीस पोलीस हवालदार सचिन होळकर, काका पाटोळे, संदीप वाघमोडे, अमजद शेख आणि गणेश खंडागळे यांनी केली.

Washim News: राष्ट्रीय लोकअदालतीत ५९४ प्रकरणे निकाली; १९ कोटीहून अधिक रक्कमेची तडजोड

Web Title: Malegaon black glass vehicles crackdown police action fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Car
  • Traffic Police
  • Traffic Rules

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.