Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मलकापूरच्या विकासाला आता जागतिक बँकेचे बळ; 30 वर्षे निधीची कमतरता भासणार नाही

मलकापूरचा विकास सध्या वेगाने सुरू असून, भविष्यात ही गती आणखी वाढणार आहे. त्यामुळे शहराचे रूपांतर मोठ्या शहरात होण्यास वेळ लागणार नाही. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मलकापूरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार केला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2026 | 11:18 AM
मलकापूरच्या विकासाला आता जागतिक बँकेचे बळ; 30 वर्षे निधीची कमतरता भासणार नाही

मलकापूरच्या विकासाला आता जागतिक बँकेचे बळ; 30 वर्षे निधीची कमतरता भासणार नाही

Follow Us
Follow Us:

कराड : मलकापूर शहराच्या वेगवान विकासाला आता जागतिक बँकेच्या योजनांचे बळ मिळणार असून, या योजनांमध्ये मलकापूरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी ३० वर्षांच्या विकासासाठी शहराला निधीची कमतरता भासणार नाही, अशी माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

मलकापूर शहर वीज बिलमुक्त अभियान, तसेच संकलित करामध्ये १० टक्के सवलत देण्याच्या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सुरेशबाबा भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी होते.

आमदार डॉ. भोसले म्हणाले, मलकापूरचा विकास सध्या वेगाने सुरू असून, भविष्यात ही गती आणखी वाढणार आहे. त्यामुळे शहराचे रूपांतर मोठ्या शहरात होण्यास वेळ लागणार नाही. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मलकापूरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, भुयारी गटार तसेच अन्य नागरी सुविधांच्या जुन्या योजनांचा विस्तार व आधुनिकीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.

मलकापूरची २४ बाय ७ नळ पाणीपुरवठा योजना देशभरात आदर्श ठरली आहे. आता जागतिक बँकेच्या योजनांच्या माध्यमातून या योजनेचे ‘अल्ट्रा मॉडर्न’ स्वरूपात रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच भुयारी गटार योजनेच्या विस्तारासाठीही निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कराड दक्षिण मतदारसंघ ‘वीज बिलमुक्त’ करण्याचे लक्ष्य

मलकापूरला ‘सोलर सिटी’ बनविण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी शहरातील घरांचा सर्वेक्षण करून प्रत्येक घरासाठी योग्य सौरऊर्जा प्रणाली निश्चित करण्याचे काम सुरू आहे. ‘पीएम सूर्य घर’ योजनेच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघ वीज बिलमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत मतदारसंघातील १ हजार १२३ घरांवर सौर पॅनेल बसविण्यात आले असून, केंद्र शासनाच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांची सबसिडी मतदारसंघात आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले.

मलकापूर शहरातील २३८ घरांवर सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. शहरातील ७० टक्के घरांवर सौर पॅनेल बसविण्यात यश आल्यास मलकापूरला पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार असून, पंतप्रधानांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी शहराला मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, २४ बाय ७ नळ पाणीपुरवठा योजना हा मलकापूरचा ब्रँड बनला आहे. आता त्याच धर्तीवर ‘वीज बिलमुक्त मलकापूर’ हा नवा ब्रँड निर्माण करण्याची गरज आहे. मलकापूरमध्ये शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध असून, राज्यातील विकसित शहर म्हणून मलकापूरची ओळख निर्माण झाली आहे.

सुभाषराव जोशी म्हणाले, मलकापूरमध्ये लोककल्याणकारी योजना राबवून त्या यशस्वी करण्याची परंपरा आहे. नागरिकांचा विकासकामांना नेहमीच सहकार्याचा हात असतो. भविष्यातही मलकापूरचा विकास याच गतीने सुरू राहील.

मनोहर शिंदे यांनी, मलकापूरच्या विकासातील कृष्णा हॉस्पिटल आणि ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत झालेले रूपांतर या दोन महत्त्वपूर्ण टप्प्यांचा उल्लेख केला. मलकापूरच्या विकासात भोसले व चव्हाण कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. सुरेश भोसले यांचा विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन शहरवासीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्ञानदेव साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय येडगे यांनी आभार मानले.
यावेळी बाजीराव जाधव, बी. टी. मोहिते, नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी कपिल जगताप, सुरज शेवाळे, धनंजय येडगे, गीतांजली पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Malkapur development gets a boost from the world bank no fund shortage for 30 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Satara News
  • World Bank

संबंधित बातम्या

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान
1

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव
2

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
3

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
4

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.