Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्ह्यात आधार कार्ड व निवडणूक ओळख पत्र जोडणे सक्तीचे; जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची माहिती

सातारा जिल्ह्यात २५ लाख ७३ हजार ३० मतदार असून, या मतदारांचा निवडणूक ओळखपत्र व आधार कार्डाचा लिंकिंग कार्यक्रम एक ऑगस्ट पासून जिल्ह्यात सुरू झाला आहे. यासाठी मतदारांनी छापील नमुना अर्ज नंबर ६ भरून तो मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 04, 2022 | 08:28 PM
सातारा जिल्ह्यात आधार कार्ड व निवडणूक ओळख पत्र जोडणे सक्तीचे; जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा जिल्ह्यात २५ लाख ७३ हजार ३० मतदार असून, या मतदारांचा निवडणूक ओळखपत्र व आधार कार्डाचा लिंकिंग कार्यक्रम एक ऑगस्ट पासून जिल्ह्यात सुरू झाला आहे. यासाठी मतदारांनी छापील नमुना अर्ज नंबर ६ भरून तो मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले. या कार्यक्रमासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ देण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये एकूण आठ मतदारसंघ असून, जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या २९८० आहे. यामध्ये पुरुष मतदार १३ लाख १६ हजार २१६, स्त्री मतदार १२ लाख ५६ हजार ७५२, तृतीयपंथी ६२, सैनिक मतदार १२९८३ व दिव्यांग मतदार १५ हजार ४१६ असे एकूण २५ लाख ७३ हजार तीस आहे. मतदारांनी मतदारांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे यासाठी आधार क्रमांक व मतदार ओळखपत्र हे लिंक करण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात एक ऑगस्ट २०२२ पासून सुरू झालेला आहे. मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक सहा तयार करण्यात आला आहे.

ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. http://www.nvsp.in/ या संकेत स्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे. मतदारांनी नमुना अर्ज क्रमांक सहा भरून ऑफलाइन पद्धतीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावा, एक जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित विशेष पुननिर्रीक्षण कार्यक्रम घेतला आहे. त्यात वर्षातील १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या मतदारांना मतदार यादी मध्ये नाव नोंदवता येणार आहे. या ऑनलाईन अॅप मध्ये १७ वर्ष पूर्ण करून अठरा वर्षात पदार्पण करणाऱ्या तरुण मतदारांना फ्युचर क्लेम नावाचे नवीन ऑप्शन देण्यात आला आहे. हा लिंकिंग कार्यक्रम ३१ मार्च २०२३ पर्यंत चालणार आहे.

[read_also content=”पालिकेद्वारे पाळीव प्राण्यांसाठी मिळणार ऑनलाईन परवाना; आयुक्त राजेश पाटील यांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/online-pet-license-issued-by-municipality-information-of-commissioner-rajesh-patil-nrdm-312108/”]

मतदार यादीतील तपशील प्रमाणीकरण करण्यासाठी मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुक, आरोग्यविमा स्मार्ट कार्ड, चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, फोटोसहीत पेन्शन कागदपत्र, ओळख पत्र, संसद सदस्यांनी जाहीर केलेल्या ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय जारी केलेले विशेष ओळखपत्र यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची आवश्यकता आहे.

Web Title: Mandatory addition of aadhaar card and election identity card in satara district information of collector ruchesh jayavanshi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2022 | 08:26 PM

Topics:  

  • aadhaar card
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

आता ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आधार बंधनकारक; पहिल्या 15 मिनिटांत…
1

आता ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आधार बंधनकारक; पहिल्या 15 मिनिटांत…

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे
2

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे

Top Marathi News Today: ‘हा नवीन भारत, कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही’; पंतप्रधान मोदींचे विधान
3

Top Marathi News Today: ‘हा नवीन भारत, कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही’; पंतप्रधान मोदींचे विधान

Top Marathi News Today: ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार
4

Top Marathi News Today: ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.