Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: ‘हा नवीन भारत, कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही’; पंतप्रधान मोदींचे विधान

Marathi Breaking Live Marathi : देश-विदेशसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्व यांसारख्या विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 17, 2025 | 07:25 PM
Top Marathi News Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Top Marathi News Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates :  ‘हा नवीन भारत आहे. भारत कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही. तर घरात घुसून मारतो’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार येथे अनेक विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन देखील केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महिला सशक्तीकरण आणि आरोग्य क्षेत्राबाबत देखील भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. मध्य प्रदेशात हा वाढदिवस साजरा केला जात आहे. हा एक विशेष कार्यक्रम आहे, कारण पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा राज्याच्या भूमीवर त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. यापूर्वी, 17 सप्टेंबर 2022 रोजी, त्यांच्या 72 व्या वाढदिवशी, त्यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते सोडून प्रोजेक्ट चित्ता सुरू केला.

पंतप्रधान मोदी धार जिल्ह्यातील भैनसोला गावात आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. येथे ते टेक्सटाईल पार्क, स्वस्थ नारी, सशक्त कुटुंब आणि पोषण अभियान आणि आदि सेवा पर्व यासह राज्याला अनेक महत्त्वाच्या भेटवस्तू देतील. या दरम्यान, राज्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव देखील उपस्थित राहणार आहेत.

यादरम्यान, पंतप्रधान महिला, किशोरवयीन आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण बळकट करण्यासाठी मोहिमेचे उद्घाटन करतील. ही मोहीम आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि महिला आणि बाल विकास विभाग संयुक्तपणे चालवेल. या अंतर्गत, आरोग्य शिबिरे आणि संस्थांद्वारे प्रतिबंधात्मक, प्रचारात्मक आणि उपचारात्मक सेवा प्रदान केल्या जातील.

The liveblog has ended.
  • 17 Sep 2025 07:22 PM (IST)

    17 Sep 2025 07:22 PM (IST)

    Maharashtra Politics: “… तर महाराष्ट्र कर्नाटकविरुद्ध याचिका दाखल करेल”; फडणवीसांचा स्पष्ट इशारा


    Fadnavis On Pune News:
     आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबईत स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कोणीतरी लाल रंग फेकल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावर देखील भाष्य केले आहे. दरम्यान पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

  • 17 Sep 2025 07:03 PM (IST)

    17 Sep 2025 07:03 PM (IST)

    ‘मना’चे श्लोक’च्या निमित्ताने गौतमी देशपांडे बनली गीतकार, देशपांडे बहिणी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार एकत्र !

    ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट दिग्दर्शिका आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडेकरता खास ठरत आहे. दिग्दर्शन, अभिनय अशी दुहेरी जबाबदारी ती सांभाळतेय. तरीही या चित्रपटाची आणखी खासियत म्हणजे मृण्मयीची बहिण गौतमी देशपांडे पहिल्यांदाच या चित्रपटासाठी गीतलेखन करत आहे. ‘मना’चे श्लोक चित्रपटातील नुकतंच प्रदर्शित झालेलं तिचं ‘तू बोल ना’ हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरतंय. एवढंच नव्हे, तर या चित्रपटात गौतमी अभिनयही करतेय. त्यामुळे देशपांडे भगिनी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

  • 17 Sep 2025 06:52 PM (IST)

    17 Sep 2025 06:52 PM (IST)

    Taliban सर्किटच! अफगाणिस्तानमध्ये ‘या’ सर्वात महत्वाच्या गोष्टीवरच बंदी; आता नागरिकांचे हाल निश्चित

    अफगाणिस्तानमध्ये दिवसेंदिवस नागरिकांचे राहणे कठीण होत चालले आहे. 2021 पासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान संघटनेची सत्ता आहे. या ठिकाणी तालिबानचे सरकार आल्यापासून अनेक बंदीचे निर्णय घेण्यात आले आहे. नागरिकांना जाचक असणारे निर्णय देखील त्यांच्या सरकारने घेतला आहे. आता देखील तालिबानने नवीनच फतवा काढला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत.

  • 17 Sep 2025 06:33 PM (IST)

    17 Sep 2025 06:33 PM (IST)

    आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता! डॉक्टरांनी दिली संपाची हाक, काय आहे कारण?

    कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक जारी करून सीसीएमपी (CCMP) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) च्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्णयाचा भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) महाराष्ट्र राज्याने तीव्र विरोध दर्शविला असून उद्या गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय संपाची हाक दिली आहे.

  • 17 Sep 2025 06:13 PM (IST)

    17 Sep 2025 06:13 PM (IST)

    घोर कलियुग! मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू; क्षुल्लक कारण वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात, पहा Viral Video

    Rajsthan Crime News: राजस्थानच्या जयपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. जयपूरमध्ये एका मुलाने आपल्याच आईची क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. एका मुलाने आपल्या आईला दंडुक्याने बेदम मारहाण केली आहे. आईने केवळ वायफाय कनेक्शन बंद केल्यामुळे मुलाने आईची हत्या केली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

  • 17 Sep 2025 05:48 PM (IST)

    17 Sep 2025 05:48 PM (IST)

    हॉरर, सस्पेन्सने भरलेली ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

    स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच हॉरर, सस्पेन्सने भरलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 16 सप्टेंबरला स्टार प्रवाहने ही नवीन मालिका येणार असल्याची घोषणा पोस्टच्या माध्यमातून केली. मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रोमो बघून प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून चॅनेलचं कौतुक केलं आहे.

     

  • 17 Sep 2025 05:25 PM (IST)

    17 Sep 2025 05:25 PM (IST)

    मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली

    अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांचा ‘जॉली एलएलबी ३’ हा (Jolly LLB 3) कोर्टरूम ड्रामा चित्रपट टीझर प्रदर्शित झाल्यापासून कायदेशीर अडचणीत सापडला होता. या चित्रपटावर न्यायाधीश आणि वकिलांची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर, बुधवारी (१७ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.

  • 17 Sep 2025 05:19 PM (IST)

    17 Sep 2025 05:19 PM (IST)

    अमित शहांनी राहुल गांधींच्या ‘त्या’ यात्रेची लाजच काढली

    बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुचे बिगूल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, कॉँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉँग्रेसवर टीका केली आहे. घुसखोरांच्या मदतीने कॉँग्रेस जिंकण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका शहा यांनी केली आहे.

    अमित शहा यांनी कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींच्या ‘मत अधिकार यात्रे’वर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार टीका केली आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बिहार दौऱ्यावर आहेत. त्याआधीच तयांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

    सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

  • 17 Sep 2025 05:07 PM (IST)

    17 Sep 2025 05:07 PM (IST)

    अमित शहांनी राहुल गांधींच्या ‘त्या’ यात्रेची लाजच काढली; म्हणाले, “ही तर घुसखोरांची…”

    Amit Shah On Congress: बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुचे बिगूल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, कॉँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉँग्रेसवर टीका केली आहे. घुसखोरांच्या मदतीने कॉँग्रेस जिंकण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका शहा यांनी केली आहे.

  • 17 Sep 2025 05:07 PM (IST)

    17 Sep 2025 05:07 PM (IST)

    स्मृती मानधनाचा आणखी एक भीम पराक्रम!

    ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात भारताची दिग्गज स्मृती मानधनाने पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली आहे. तिने या सामन्यात शानदार शतक लगावले आहे. तिने आपल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध जोरदार मोर्चा वळवला. तिच्या खेळीदरम्यान मानधनाने एक अनोखा विक्रम रचला आहे. मानधनाने महिला एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक ५०+ धावा काढणारी पाचवी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. मानधनाने दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डचा विक्रम मागे टाकला आहे.

  • 17 Sep 2025 04:54 PM (IST)

    17 Sep 2025 04:54 PM (IST)

    व्यापार कराराच्या आशेने सलग दुसऱ्या दिवशी बाजार तेजीत

    जागतिक बाजारातील संमिश्र भावनांमुळे, बुधवारी (१७ सप्टेंबर) सलग दुसऱ्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजार तेजीने बंद झाले. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरील चर्चा पुन्हा सुरू झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम भावनांवर झाला. यामुळे आयटी क्षेत्रात खरेदी झाली. तसेच, पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजाराला चालना मिळाली. तथापि, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांवरील निर्णयापूर्वी गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेवर, फेडरल रिझर्व्हवर आहे. फेडरल रिझर्व्ह बुधवारी व्याजदरांवरील निर्णय जाहीर करेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मध्यवर्ती बँक त्यात कपात करू शकते.

    वाचा सविस्तर 

  • 17 Sep 2025 04:54 PM (IST)

    17 Sep 2025 04:54 PM (IST)

    Who is Meena Thackeray : कोण होत्या मीनाताई ठाकरे...?

    दादरमधील शिवाजी पार्क येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाजी पार्क येथे असणाऱ्या त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसैनिक आणि मनसैनिकांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी करत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला चोवीस तासांमध्ये अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र प्रत्यक्ष राजकारणाशी संबंध नसलेल्या मीनाताई ठाकरे यांनी शिवसेनेच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

    वाचा सविस्तर 

  • 17 Sep 2025 04:53 PM (IST)

    17 Sep 2025 04:53 PM (IST)

    स्मृती मानधनाचा आणखी एक भीम पराक्रम!

    ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात भारताची दिग्गज स्मृती मानधनाने पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली आहे. तिने या सामन्यात शानदार शतक लगावले आहे. तिने आपल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध जोरदार मोर्चा वळवला. तिच्या खेळीदरम्यान मानधनाने एक अनोखा विक्रम रचला आहे. मानधनाने महिला एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक ५०+ धावा काढणारी पाचवी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. मानधनाने दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डचा विक्रम मागे टाकला आहे.

    वाचा सविस्तर 

  • 17 Sep 2025 04:32 PM (IST)

    17 Sep 2025 04:32 PM (IST)

    Maruti Victoris बुक केलीत, आता डिलिव्हरी कधी?

    भारतीय ऑटो बाजारात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यातही सर्वात जास्त मागणी ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या भारतात एसयूव्ही कार ऑफर करत असतात. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील भारतीय रस्त्यांवर धावत आहेत. नुकतेच देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki ने भारतात नवीन एसयूव्ही ऑफर केली आहे. कंपनीने Maruti Victoris एसयूव्ही लाँच केली आहे. जर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करून घरी आणण्याचा विचार करत असाल, तर या कारची डिलिव्हरी कधी सुरू होईल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

    वाचा सविस्तर 

     

  • 17 Sep 2025 04:29 PM (IST)

    17 Sep 2025 04:29 PM (IST)

    ‘मग ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू…’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले मोठे विधान

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘हैदराबाद मुक्ती दिन’ कार्यक्रमात दहशतवादावर मोठे विधान केले. कोणताही हस्तक्षेपामुळे दहशतवादाविरुद्धची कारवाई थांबवण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करताना त्यांनी भविष्यात पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास ‘ऑपरेशन सिंदूर’ पुन्हा सुरू केले जाईल, असा इशारा दिला.

    वाचा सविस्तर 

  • 17 Sep 2025 04:29 PM (IST)

    17 Sep 2025 04:29 PM (IST)

    ‘तो वाटेतच मरेल…’ जॅकी दादांनी शेअर केला ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ

    बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी नुकतेच आपल्या इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिसत आहे. जॅकी यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत जॅकी श्रॉफ म्हणाले की, ”लोकांनी संवेदनशीलता दाखवली पाहिजे आणि रुग्णवाहिकेसाठी वेगळा मार्ग बनवला पाहिजे.”

    वाचा सविस्तर 

  • 17 Sep 2025 04:06 PM (IST)

    17 Sep 2025 04:06 PM (IST)

    भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा कसोटी संघ जाहीर!

    वेस्ट इंडिज कसोटी सामने खेळायला भारत दौऱ्यावर येणार आहे. या  भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. माजी कर्णधार क्रेग ब्रेथवेटला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघातून डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये तेगनारायण चंद्रपॉल आणि अ‍ॅलिक अथानासे हे कसोटी संघामध्ये स्थान देण्यात आले आहेत.

    वाचा सविस्तर 

  • 17 Sep 2025 04:03 PM (IST)

    17 Sep 2025 04:03 PM (IST)

    Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ लोकांना सुनावलं; म्हणाले,”स्वातंत्र्यसेनानींचा यापेक्षा मोठा…”

    Devendra Fadnavis On Marathwada Mukti Sangram Din: आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. यानिमित  कार्यक्रमाला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र त्यांचे भाषण सुरू असताना काही लोकांनी तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या लोकांना चांगलेच सुनावले आहे.

  • 17 Sep 2025 03:53 PM (IST)

    17 Sep 2025 03:53 PM (IST)

    झी मराठी वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप?

    झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ काही दिवसांपूर्वीच त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शोमध्ये प्रमुख भूमिका साकारलेला नितीश चव्हाण आणि अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

  • 17 Sep 2025 03:44 PM (IST)

    17 Sep 2025 03:44 PM (IST)

    ‘आम्हाला गुन्हेगारासारखे…’ ; जॉर्जियात भारतीय पर्यटकांसोबत गैरवर्तन

    एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जॉर्जियाच्या सीमेवर भारतीयां प्रवाशांना अमानुष वागूण देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

  • 17 Sep 2025 03:41 PM (IST)

    17 Sep 2025 03:41 PM (IST)

    पाकिस्तानी तज्ज्ञाने आपल्याच खेळाडूंना सुनावले खडे बोल

    आशिया कपमध्ये(Asia cup 2025) १४ सप्टेंबर रोजी मोठ्या तणावाच्या वातावरणात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्ने पराभव केला. या सामन्यानंतर भारतीय संघाने  हस्तांदोलन न करण्यावरून वाद पेटला आहे.

  • 17 Sep 2025 03:34 PM (IST)

    17 Sep 2025 03:34 PM (IST)

    करिश्मा कपूरच्या मुलांना नाही मिळाले त्यांच्या हक्काचे १९०० कोटी रुपये

    बॉलीवूडची “लोलो” म्हणजेच करिश्मा कपूर आणि तिची मुले, समायरा कपूर आणि कियान कपूर, जी अनेकदा प्रसिद्धीपासून दूर राहतात, ते सध्या चर्चेत आहेत.

  • 17 Sep 2025 03:19 PM (IST)

    17 Sep 2025 03:19 PM (IST)

    वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास!

    भारताचासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरणारा वरुण चक्रवर्तीसाठी (Varun Chakaravarthy) आशिया कपमध्ये एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या टी-२० रँकिंगमध्ये तो जगातील नंबर १ गोलंदाज बनला आहे.

  • 17 Sep 2025 03:03 PM (IST)

    17 Sep 2025 03:03 PM (IST)

    पंतप्रधान मोदी कसे बनले तरुणांचे आवडते? ‘ही’ आहेत त्यांना युथ आयकॉन बनवणारी 10 प्रमुख कारणे

    भारताला तरुणांचा देश म्हटले जाते. आज आपल्या देशातील ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. एवढ्या मोठ्या तरुण संख्येचं मन जिंकणं, त्यांना दिशा देणं आणि त्यांचं नेतृत्व करणं हे कोणत्याही नेत्यासाठी मोठं आव्हान असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आव्हान संधीमध्ये बदललं आणि स्वतःला एका “युवा आयकॉन” म्हणून सिद्ध केलं.

  • 17 Sep 2025 03:03 PM (IST)

    17 Sep 2025 03:03 PM (IST)

    बीड रेल्वे सेवेचा शुभारंभ

    बीड रेल्वे सेवेचा आज शुभारंभ होतोय, या भावना शब्दांच्या पलीकडच्या आहेत. यापेक्षाही मोठा कार्यक्रम घ्यायचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार” असं मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. “आज बीडच्या रेल्वे सेवेचा शुभारंभ होतोय, या प्रसंगीच्या भावना शब्दांच्या पलीकडील आहेत.

  • 17 Sep 2025 02:58 PM (IST)

    17 Sep 2025 02:58 PM (IST)

    पंतप्रधान मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर हा दिवस केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक स्तरावरही महत्त्वाचा ठरला आहे. कारण, या वर्षी ते ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त भारतभरात विविध उपक्रम, सेवा कार्ये आणि अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच, जगभरातील नेत्यांनीही आपल्या शुभेच्छांचा ओघ सोशल मीडियावर आणि अधिकृत निवेदनांतून व्यक्त केला आहे. या शुभेच्छा केवळ औपचारिक नसून, त्या भारतासोबतच्या दृढ होत चाललेल्या संबंधांचे प्रतीक ठरत आहेत.

  • 17 Sep 2025 02:55 PM (IST)

    17 Sep 2025 02:55 PM (IST)

    २०२५ मध्ये फेडरल रिझर्व्ह पहिल्यांदाच व्याजदरात कपात करू शकते,

    Federal Reserve Meeting Marathi News: अमेरिकेची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्ह, या बुधवारी २०२५ मधील पहिली व्याजदर कपात जाहीर करण्याची अपेक्षा आहे. ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा अमेरिकन अर्थव्यवस्था वाढती महागाई आणि मंदावलेली रोजगार वाढ अशा दुहेरी दबावांना तोंड देत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिका स्थिरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे, जिथे आर्थिक वाढ मंदावते परंतु महागाई उच्च राहते.

  • 17 Sep 2025 02:53 PM (IST)

    17 Sep 2025 02:53 PM (IST)

    ज्वाला गुट्टाकडून ३० लिटर आईचे दूध दान!

    Breast milk donation from Jwala Gutta : माजी भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आता चर्चेत आली आहे. या मागे तिचा खेळ नसून आईचे दूध दान केल्याबद्दल टी सध्या चर्चेत आली आहे. तिच्या या कृतीचे सगळ्यांकडून कौतुक होताना दिसत आहे.  सगळीकडे तिच्याच नावाची चर्चा होता दिसून येत याहे. ज्वाला गुट्टाकडून आईचे दूध दान करण्यात येत असल्यामुळे पूर्वी आजारी आणि कमकुवत असणाऱ्या  नवजात बालकांना नवीन जीवन मिळू लागले आहे.

  • 17 Sep 2025 02:50 PM (IST)

    17 Sep 2025 02:50 PM (IST)

    पंतप्रधान मोदींच्या जीवनावर बनणार बायोपिक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, आणखी एका बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय अभिनेता उन्नी मुकुंदन या चित्रपटात पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करून चित्रपटाचे नाव घोषित केले आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहून चाहते चकीत झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा आज ७५ व्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाची घोषणा करून चाहत्यांना खुश केले आहे.

  • 17 Sep 2025 02:45 PM (IST)

    17 Sep 2025 02:45 PM (IST)

    प्रियंका चोप्राच्या अफेअरबद्दल प्रल्हाद कक्कर यांचा धक्कादायक खुलासा…

    भारताचे आघाडीचे जाहिरात निर्माते आणि अ‍ॅडगुरू म्हणून ओळखले जाणारे प्रह्लाद कक्कर यांनी प्रियंका चोप्राच्या आयुष्यातील एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत प्रियंका चोप्रा हीच्या खास नात्यांवर सूचक विधान केलं आहे. त्यांनी थेट नाव न घेता म्हटलं की, ”बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा प्रियंकाचं नाव एका सुपरस्टारसोबत सातत्याने जोडलं जात होतं.”

  • 17 Sep 2025 02:20 PM (IST)

    17 Sep 2025 02:20 PM (IST)

    राज ठाकरेंची आता सटकली?

    Raj Thackeray in Shivaji Park : दादर : शिवाजी पार्कवरील स्वर्गीय मीनताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. र्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या काकी आहेत. ही घटना झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून आता मनसे नेते राज ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • 17 Sep 2025 02:16 PM (IST)

    17 Sep 2025 02:16 PM (IST)

    पंतप्रधान मोदींची पाकिस्तानवर जहरी टीका

    Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढिदवस आहे. जगभरातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मध्यप्रदेशच्या धार मध्ये मोदींनी एका विशाल सभेला संबोधित केले. वाढदिवसानिमित्त मोदी आदिवासी भागात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

  • 17 Sep 2025 02:07 PM (IST)

    17 Sep 2025 02:07 PM (IST)

    PM Narendra Modi: "एका दहशतवाद्याने रडत रडत..."; पंतप्रधान मोदींची पाकिस्तानवर जहरी टीका

    Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढिदवस आहे. जगभरातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मध्यप्रदेशच्या धार मध्ये मोदींनी एका विशाल सभेला संबोधित केले. वाढदिवसानिमित्त मोदी आदिवासी भागात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

  • 17 Sep 2025 01:55 PM (IST)

    17 Sep 2025 01:55 PM (IST)

    महाबळेश्वर अन् पाचगणीचा वाढला मान! युनोस्कोच्या यादीमध्ये मिळवले स्थान

    महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी समोर आली आहे. युनेस्कोच्या यादीमध्ये कासपठारनंतर आता आणखी दोन स्थळांचा समावेश झाला आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन स्थळांचा समावेश युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. निसर्गरम्य ठिकाणे, स्ट्रॉबेरीचे उत्पादन आणि जैविविधता यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीला हा मान देण्यात आला आहे.

  • 17 Sep 2025 01:50 PM (IST)

    17 Sep 2025 01:50 PM (IST)

    वर्ध्यानंतर आता ‘या’ ठिकाणी भाजपला मोठा धक्का

    गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून तयारीही केली जात आहे. त्यातच काही नेते पक्षही सोडताना दिसत आहे. असे असताना आता खोपोलीत आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे.

  • 17 Sep 2025 01:45 PM (IST)

    17 Sep 2025 01:45 PM (IST)

    ‘तो भिंतीवर डोके आपटायचा’, ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा होता सलमान? प्रल्हाद कक्कर यांचा शॉकिंग खुलासा

    सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रेमकथांपैकी एक आहे. तसेच, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची मोठी चर्चा सुरु झाली. त्यांच्या ब्रेकअपबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. आता, जाहिरात गुरु म्हणून ओळखले जाणारे प्रल्हाद कक्कर यांनी सलमान खान आणि ऐश्वर्याच्या प्रेमकथेबद्दल आणि ब्रेकअपबद्दल उघडपणे सांगितले आहे. त्यांनी अनेक खुलासे देखील केले आहेत. ते नक्की या दोघांच्या नात्याबद्दल काय म्हणाले जाणून घेऊयात.

  • 17 Sep 2025 01:35 PM (IST)

    17 Sep 2025 01:35 PM (IST)

    पंतप्रधान मोदींच्या आईच्या AI व्हिडिओवर उच्च न्यायालयाची मोठी कारवाई

    बिहार निवडणुकीपूर्वी पाटणा उच्च न्यायालयाने काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मागण्यांचा एक एआय व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने आता हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस पक्षाने अलीकडेच पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचा एक एआय व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींच्या आई त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांच्याशी बोलत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर भाजपने या व्हिडिओवर जोरदार आक्षेप घेतला.

  • 17 Sep 2025 01:25 PM (IST)

    17 Sep 2025 01:25 PM (IST)

    उठा चला…आपण जिंकलो? राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून भारत-पाक सामन्यावर टीकास्त्र

    सध्या आशिया चषक स्पर्धा सुरु असून क्रिकेटप्रेमी मोठ्या उत्साहाने सामने बघत आहेत. मात्र आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान झालेल्या सामन्यामुळे भारतात मोठा वाद निर्माण झाला. पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप 26 जणांनी जीव गमावल्यामुळे पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. दुबईमध्ये झालेला हा सामना रद्द करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. मात्र तरीही हा सामना झाला. यामध्ये भारतीय संघ विजयी झाला असला तरी राजकारण्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर आता मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील भारत-पाक या क्रिकेट सामन्यावरुन शहा पिता-पुत्रांना टोला लगावणारे व्यंगचित्र काढले आहे.

  • 17 Sep 2025 01:15 PM (IST)

    17 Sep 2025 01:15 PM (IST)

    ‘पंतप्रधान माझे आदेश मोडूच शकत नाहीत’; PM मोदींच्या वाढदिवशी काँग्रेसच्या ‘या’ व्हिडिओमुळे मोठे राजकीय वादळ

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७५ वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा होत असतानाच, राजकारणात एक नवीन वादळ उठले आहे. सोशल मीडियावर #MyModiStory हॅशटॅगखाली शुभेच्छांचा, संस्मरणीय अनुभवांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू असताना, काँग्रेस पक्षाने या दिवसाचाच वापर करून एक वेगळा राजकीय वार केला. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका एआय व्हिडिओमुळे देशातील राजकीय वातावरण अचानक तापले आहे.

  • 17 Sep 2025 01:04 PM (IST)

    17 Sep 2025 01:04 PM (IST)

    आगामी निवडणुका आघाडी म्हणून लढवणार का? शरद पवारांचं मोठं विधान

    पुण्यातील प्रश्न सोडविण्यासाठी विकासाचा दृष्टीकाेण असलेले नगरसेवक आपल्याला निवडून आणावे लागतील, त्यादृष्टीने महापािलका निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. त्याचवेळी महाविकास आघाडीत एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची विक्रमी ५० वी बैठक व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.

  • 17 Sep 2025 12:50 PM (IST)

    17 Sep 2025 12:50 PM (IST)

    समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

    ओडिसातील पुरी जिल्ह्यात एक धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ब्रह्मगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बलिहारीचंडी समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर एकाची चौकशी सुरु आहे.

  • 17 Sep 2025 12:40 PM (IST)

    17 Sep 2025 12:40 PM (IST)

    प्रेमाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या डोंबिवलीतील शिक्षक अटकेत

    डोंबिवलीतून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकाने आधी एका शिक्षिकेला फसवले त्यानंतर त्यांना मुलं झालं नंतर तिला सोडून दिले. त्यानंतर त्याने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केलं मात्र ते लग्न टिकले नाही ती माहेरी परत गेली. नंतर पुन्हा एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिलाही फसविले. या शिक्षकाच्या धक्कादायक प्रकाराने डोंबिवली हादरली आहे.

  • 17 Sep 2025 12:30 PM (IST)

    17 Sep 2025 12:30 PM (IST)

    साताऱ्यात भरदिवसा गोळीबार! जुन्या खुनाचा घेतला बदला

    सातारा जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील शिरवलमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन हल्लेखोर दुचाकीवर आले आणि हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार भर दिवसा करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

  • 17 Sep 2025 12:12 PM (IST)

    17 Sep 2025 12:12 PM (IST)

    लातूर हादरलं! गॅससाठी खर्चले कॉलेज फीचे पैसे, रागाच्या भरात मुलानेच वडिलांची हत्या

    लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या फिससाठी असलेले पैसे सिलेंडरसाठी वापरले म्हणून मुलानेच वडिलांची निघून हत्या केल्याचे समोर आले आहे. सततचा पाऊस असल्याने चुलीत जाळायला लाकूड मिळालं नाही. म्हणून गॅस सिलेंडरची पैसे खर्च केले. कॉलेजची फी सिलेंडरसाठी खर्चले म्हणून मुलानेच बापाची निर्घृणपणे हत्या केली.

  • 17 Sep 2025 12:02 PM (IST)

    17 Sep 2025 12:02 PM (IST)

    मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न

    दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या  पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काल रात्री हा प्रयत्न करण्यात आला असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

  • 17 Sep 2025 11:55 AM (IST)

    17 Sep 2025 11:55 AM (IST)

    मराठ्यांना अजून मुक्ती मिळणं बाकी - मनोज जरांगे पाटील

    मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. जरांगे पाटील म्हणाले की, मराठवाड्याला जरी मुक्ती मिळाली असली तरी मराठ्यांना अजून मुक्ती मिळणं बाकी आहे. आज ज्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आहे, त्यांनी प्रमाणपत्र घेऊन अंतरवाली सराटी येथे यावे. प्रमाणपत्राची खात्री करूनच सरकारचा पुढील निर्णय कळेल असेही ते म्हणाले. 84 च्या जीआरचा आधार कसा घेतला आणि जर मराठ्यांचे आरक्षण काढणार असाल तर तुमचे आरक्षण कसे दिले, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील उपस्थित केला.

     

  • 17 Sep 2025 11:45 AM (IST)

    17 Sep 2025 11:45 AM (IST)

    जालन्यात पंकजा मुंडे गेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांध्यावर

    राज्यभरामध्ये परतीचा तुफान पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्णत्वाला येत असलेले पीक आडवे झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यानंतर भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतीची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

  • 17 Sep 2025 11:35 AM (IST)

    17 Sep 2025 11:35 AM (IST)

    मुंबईतील मोनोरेल सेवा शनिवारपासून बंद

    चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान सुरु असलेली मोनोरेल सेवा आता बंद होणार आहे. येत्या शनिवारपासून म्हणजे 20 सप्टेंबरपासून मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद होणार आहे. सतत होत असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 17 Sep 2025 11:25 AM (IST)

    17 Sep 2025 11:25 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान आरक्षणावरुन घोषणाबाजी

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आजच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असताना काही जणांना घोषणाबाजी केली. पोलिसांनी घोषणाबाजी करुन गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. हैदराबाद गॅझेट रद्द करावं, ओबीसींवर अन्याय होत असल्याची घोषणबाजी काही जणांनी केली

  • 17 Sep 2025 11:15 AM (IST)

    17 Sep 2025 11:15 AM (IST)

    पहलगाम हल्ल्याच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा टोला

    राज ठाकरे हे राजकारणीसह व्यंगचित्रकार म्हणून नावाजले जातात. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरेंचे व्यंगचित्र हे चपराक लगावणारे असते. पहलमाग हल्ल्यानंतर देखील भारत पाकिस्तान सामना झाल्यामुळे राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र साकारले आहे.

    #पहलगाम #काश्मीर #PahalgamAttack #BCCI #ICC #AsiaCup #INDvsPAK#Cricket pic.twitter.com/ASx9fpB81Y

    — Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2025

Web Title: Top marathi news today live marathi news breaking news live update national news live news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 08:59 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Marathi Breaking news
  • Navarashtra Live Update
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “दुश्मनी केली तर ती…”; कॉँग्रेसविरुद्ध धडाडली एकनाथ शिंदेंची तोफ
2

Maharashtra Politics: “दुश्मनी केली तर ती…”; कॉँग्रेसविरुद्ध धडाडली एकनाथ शिंदेंची तोफ

Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली
3

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

KDMC News : निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास –कुणाल पाटील
4

KDMC News : निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास –कुणाल पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.