Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार

Marathi Breaking Live Marathi : देश-विदेशसह राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, उद्योग क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2025 | 03:13 PM
LIVE
Top Marathi News Today Live : ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार

Top Marathi News Today Live : ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार

Follow Us
Close
Follow Us:
  • 11 Sep 2025 03:25 PM (IST)

    11 Sep 2025 03:25 PM (IST)

    आधार कार्डमध्ये नाव चुकलंय? घाबरू नका!

    आधार कार्ड हा सर्वात महत्वाचा कागदपत्र आहे. आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक सरकारी आणि खाजगी कामात ओळख पटवण्याचा सर्वात महत्वाचा कागदपत्र बनला आहे. पण जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव चुकीचे लिहिले असेल तर आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. नावातील एक छोटीशी चूक सरकारी योजनांचा लाभ घेणे, बँक खाते उघडणे, पास्पोट मिळवणे, मुलांचे प्रवेश घेणे किंवा पॅन-आधार लिंक करणे यासारख्या कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तर अश्यापरिस्थित तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही घर बसल्या बसल्या हे व्यवस्थित करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडलं असेल की हे आपण घर बसल्या बसल्या कसे करू शकतो? तर यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.

    वाचा सविस्तर 

  • 11 Sep 2025 03:20 PM (IST)

    11 Sep 2025 03:20 PM (IST)

    MEA Advisory : कोणत्याही ऑफरपासून दूर राहा, रशियन सैन्यात भरती होऊ नका

     “कोणत्याही ऑफरपासून दूर राहा” असा स्पष्ट आणि कठोर इशारा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आपल्या नागरिकांना दिला आहे. रशियन सैन्यात भारतीय नागरिकांना फसवणुकीने भरती केल्याच्या बातम्या समोर आल्याने भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रातून धक्कादायक माहिती समोर आली. पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक प्रदेशात दोन भारतीय युवक आढळले, जे बांधकामाच्या कामासाठी रशियाला गेले होते, परंतु त्यांना थेट युद्ध आघाडीवर तैनात करण्यात आले. या खुलाशामुळे केवळ संबंधित कुटुंबांमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    वाचा सविस्तर 

  • 11 Sep 2025 03:13 PM (IST)

    11 Sep 2025 03:13 PM (IST)

    अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर Blockbuster सिनेमांचा मेळावा!

    सप्टेंबर महिना म्हणजे सणांचा जल्लोष, गणपती बाप्पाच्या गजरात भरलेलं वातावरण आणि आनंदाच्या उधळणीचा काळ. या सणासुदीच्या वातावरणात अल्ट्रा झकास मराठी ओटीटी आपल्या प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. या महिन्यात प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी प्रेक्षकांना मराठी चित्रपटांसोबतच हिंदी आणि साऊथ ब्लॉकबस्टर सुपरहिट चित्रपट मराठीत अनुभवायला मिळणार आहेत. यामध्ये खास आकर्षण ठरणार आहे नुकताच थिएटरमध्ये हाऊसफुल्ल ठरलेला आणि प्रेक्षकांची दाद मिळवणारा बेटर-हाफ ची लव्हस्टोरी.

    वाचा सविस्तर :

  • 11 Sep 2025 02:41 PM (IST)

    11 Sep 2025 02:41 PM (IST)

    SC On IND Vs Pak: “इतकी घाई काय आहे? हा तर…”; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

    Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धा सुरू झाली आहे. कालच भारताने संयुक्त अरब अमिरातीवर जोरदार विजय प्राप्त केला आहे. दरम्यान 14 तारखेला या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान हा सामना रद्द करावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर महत्वाचा निर्णय दिला आहे.

  • 11 Sep 2025 02:40 PM (IST)

    11 Sep 2025 02:40 PM (IST)

    Xiaomi चा सर्वात पॉवरफुल प्रोसेसरचा 5G फोन

    Xiaomi लवकरच आणखी एक शक्तिशाली फोन लाँच करू शकते, जो कंपनी Xiaomi 16 म्हणून सादर करू शकते. फोनशी संबंधित अनेक वैशिष्ट्ये आधीच ऑनलाइन समोर आली आहेत आणि हा आगामी फ्लॅगशिप डिव्हाइस Xiaomi 15 चा अपग्रेड केलेला मॉडेल असणार आहे, जो ऑक्टोबर 2024 मध्ये सादर करण्यात आला होता. अलीकडेच, Xiaomi 16 कधी लाँच केला जाईल याची माहितीदेखील समोर आली आहे.

  • 11 Sep 2025 02:38 PM (IST)

    11 Sep 2025 02:38 PM (IST)

    पावसाचा ‘या’ राज्यांमध्ये कहर; IMD च्या इशाऱ्याने वाढली चिंता

    गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजेच पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी स्थिती सामान्य झाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिल आहे ते, जाणून घेऊयात.

  • 11 Sep 2025 02:36 PM (IST)

    11 Sep 2025 02:36 PM (IST)

    देवीचं आगमन आणि प्रस्थान देणार यावेळी शुभ-अशुभ संकेत

    हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान आहे. यावेळी देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. तर देवी वेगवेगळ्या वाहनांवर स्वार होऊन येते. देवीच्या आगमनाच्या वेळी आणि प्रस्थानाच्या वेळी वाहन कोणते असेल आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे ते जाणून घ्या. प्रत्येक वेळी देवीचे आगमन आणि प्रस्थान वेगवेगळे असते. यंदा नवरात्रीची सुरुवात सोमवार, 22 सप्टेंबरपासून होत आहे. या वेळी घटस्थापना केली जाणार आहे. यंदा नवरात्रीचा उत्सव 10 दिवस चालणार आहे. यंदा देवीचे आगमन हातावर होणार आहे.

  • 11 Sep 2025 02:36 PM (IST)

    11 Sep 2025 02:36 PM (IST)

    9/11 दहशतवादी हल्ल्याला 24 वर्षे पूर्ण

    ११ सप्टेंबर २००१ ही तारीख ऐकताच आजही जगभरातील लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेवर असा दहशतवादी हल्ला झाला, ज्याने इतिहास कायमचा बदलून टाकला. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर विमाने आदळून झालेल्या त्या भयानक क्षणांना आज २४ वर्षे झाली, पण त्याची भीषण आठवण आजही जिवंत आहे.

  • 11 Sep 2025 02:35 PM (IST)

    11 Sep 2025 02:35 PM (IST)

    पीठ न आंबवता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीच्या पिठाची इडली

    सकाळच्या नाश्त्यात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कधी इडली, डोसा तर कधी कांदापोहे, उपमा, शिरा बनवला जातो. पण नेहमीच काही ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं? सुचत नाही. साऊथ इंडियन पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. हे पदार्थ बनवण्यासाठी तांदूळ डाळीचे पीठ आंबवावे लागते. तांदळाचे पीठ व्यवस्थित आंबवल्याशिवाय इडली किंवा डोसा व्यवस्थित येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १५ मिनिटांमध्ये नाचणीच्या पिठाची इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • 11 Sep 2025 02:34 PM (IST)

    11 Sep 2025 02:34 PM (IST)

    मनसेच्या रडारवर आला कपिल शर्मा, नेमकं काय प्रकरण?

    बॉलीवूड अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा अडचणीत अडकला आहे. कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबारानंतर अभिनेता चांगलाच चर्चेत होता, दरम्यान ते प्रकरण शांत झालेलं असताना कपिल शर्मा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आता कपिल मनसेच्या निशाण्यात सापडला आहे. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कपिल शर्मा आणि त्याच्या शोवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

  • 11 Sep 2025 01:50 PM (IST)

    11 Sep 2025 01:50 PM (IST)

    India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका!

    भारताच्या आशिया कपची सुरुवात दमदार केली आहे, टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात यूएईच्या संघाला पराभूत करुन सुपर 4 च्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता भारताचा संघ हा पुढील सामना हा पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे हा सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे जेव्हापासून वेळापत्रक आले आहे तेव्हापासून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी या सामन्याचा विरोध केला आहे. आता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणारा सामना हा रद्द होणार का? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.

  • 11 Sep 2025 01:40 PM (IST)

    11 Sep 2025 01:40 PM (IST)

    रेस्टॉरंटमध्ये ट्रम्पविरोधी पॅलेस्टिनी समर्थकांची घोषणाबाजी

    सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वॉशिंग्टन डीसीतील एका रेस्टॉरंटमध्ये ते गेले असताना तिथे पॅलेस्टिनी समर्थकांनी गोंधळ घातला होता. परंतु यावेळी ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर कुत्सित (गर्विष्ठ) हास्य दिसले. यामुळे सध्या त्यांच्या या हास्यावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. शिवाय या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 11 Sep 2025 01:28 PM (IST)

    11 Sep 2025 01:28 PM (IST)

    India-Nepal सीमा सील, मैत्री बस सेवा बंद; भारताने घेतला कठोर निर्णय

    नेपाळमध्ये सुरू असलेल्या तीव्र गोंधळामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या अस्थिरतेचा थेट परिणाम भारतावरही झाला आहे. सीमा पूर्णपणे सील करण्यात आली असून, महेंद्रनगर ते दिल्ली व डेहराडून या मार्गांवरील “मैत्री बस सेवा” तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेपाळमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत तर भारतात गेलेले अनेक नेपाळी नागरिकही घरी परतू शकत नाहीत.

  • 11 Sep 2025 01:15 PM (IST)

    11 Sep 2025 01:15 PM (IST)

    भारतासमोर नतमस्तक न झाल्यामुळे सत्तेला मुकलो; राम जन्मभूमीबाबतही ‘ओली’ यांचे धक्कादायक वक्तव्य

    नेपाळच्या राजकारणात सतत वाद निर्माण करणारे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जनरेशन-झेडच्या तीव्र विरोधानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतरही ओली यांनी आपली भारतविरोधी भूमिका कायम ठेवली आहे. बुधवारी (१० सप्टेंबर २०२५) त्यांनी जाहीर केलेल्या निवेदनात त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले.

  • 11 Sep 2025 01:05 PM (IST)

    11 Sep 2025 01:05 PM (IST)

    RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त PM मोदींचा खास लेख

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. मोहन भागवत यांचा 75 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. भाजप नेत्यांकडून मोहन भागवत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी आरएसएस मोहन भागवत यांच्या कार्याचे कौतुक करणारा लेख लिहिला आहे. सोशल मीडियावर पंतप्रधानांनी हा लेख शेअर केला आहे.

  • 11 Sep 2025 12:55 PM (IST)

    11 Sep 2025 12:55 PM (IST)

    सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी, वाहतूक ठप्प

    सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. धुळ्यावरून सोलापूर कडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 11 Sep 2025 12:45 PM (IST)

    11 Sep 2025 12:45 PM (IST)

    रवींद्र चव्हाणांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

    भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे 'एक्स' अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरने अर्थात एक्सने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याने अकाउंट सस्पेंड झाल्याचे माहिती आहे.

  • 11 Sep 2025 12:35 PM (IST)

    11 Sep 2025 12:35 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक

    जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीला महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे गैरहजर आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचा पहिलाच दौरा असताना या बैठकीला महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे अनुपस्थित असल्याने चर्चा सुरू झाली आहे. आमदार एकनाथ खडसे उपस्थित मात्र दुसरीकडे त्यांच्या कन्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे बैठकीला गैरहजर आहेत.

  • 11 Sep 2025 12:20 PM (IST)

    11 Sep 2025 12:20 PM (IST)

    राज ठाकरेंनी बोलवली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक

    काल राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर आज मुंबईत मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकींवर चर्चा होणार असल्याचं समजत आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर ही बैठक होत आहे.

  • 11 Sep 2025 12:00 PM (IST)

    11 Sep 2025 12:00 PM (IST)

    लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या गोष्टींचा आज लिलाव होणार

    मुंबईतील लालबागच्या राजा गणपतीला संपूर्ण देशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. भक्तीभावाने भाविक सोन्यापासून अनेक गोष्टी अर्पण करत असतात. लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या गोष्टींचा आज लिलाव होणार आहे.

  • 11 Sep 2025 11:50 AM (IST)

    11 Sep 2025 11:50 AM (IST)

    RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचा वाढदिवस

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व समर्थकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 11 Sep 2025 11:40 AM (IST)

    11 Sep 2025 11:40 AM (IST)

    नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांसाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरु

    नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

  • 11 Sep 2025 11:30 AM (IST)

    11 Sep 2025 11:30 AM (IST)

    हैदराबाद गॅझेटियरविरोधात मोठी बातमी

    मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेट सुरु करण्यात आले आहे. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. पण त्याचवेळी जरांगे पाटलांना पहिला मोठा धक्का बसला आहे. हैदराबाद गॅझेटियरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या तरतुदीविरोधात लोकहितवादी याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • 11 Sep 2025 11:20 AM (IST)

    11 Sep 2025 11:20 AM (IST)

    नेपाळमधील हिंसाचार काही थांबेना..पुन्हा गोळीबार

    भारतातील अनेक पर्यटक हे सध्या नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. काडमांडू विमानतळावर सध्या लष्कराचा ताबा आहे. नेपाळमधील परिस्थिती पूर्णपणे चिघळताना दिसली. अनेक मंत्र्यांनी देखील आपल्या पदाची राजीनामे दिली आहेत. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात असून अजूनही गोळीबार केला जात आहे.

  • 11 Sep 2025 11:00 AM (IST)

    11 Sep 2025 11:00 AM (IST)

    अमेरिकेच्या धर्म परिषदेसमोर गरजले स्वामी विवेकानंद

    असा एक भारतीय योगी याची ख्याती आणि चर्चा संपूर्ण विश्वामध्ये पसरली ते म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दमध्ये अनेक महत्त्वाच्या घटनांपैकी अमेरिकेतील त्यांचे भाषण आहे. स्वामी विवेकानंदांनी जागतिक सर्व धर्म परिषदेसमोर ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे प्रसिद्ध भाषण दिले. ज्याची सुरुवात “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” या शब्दांनी झाली. या ऐतिहासिक भाषणातून त्यांनी हिंदू धर्माचा सार्वत्रिक सहिष्णुतेचा संदेश जगासमोर मांडला आणि सर्व धर्मांच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे त्यांना आणि भारताला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली.

  • 11 Sep 2025 10:53 AM (IST)

    11 Sep 2025 10:53 AM (IST)

    सलमान कुनिकाचा बोल्ड डान्स...Video Viral

    दरवर्षी सलमान खानच्या वादग्रस्त शो बिग बॉसमध्ये, एक अशी व्यक्ती येते जिच्यावर होस्ट आणि निर्मात्यांवर पक्षपाती असल्याचा आरोप केला जातो. या सीझनमध्ये ती स्पर्धक कुनिका सदानंद आहे. गेल्या आठवड्यात नामांकन होऊनही आणि सर्वात कमी मते मिळवूनही जेव्हा कुनिकाला शोमधून बाहेर काढण्यात आले नाही, तेव्हा या शोचे प्रेक्षक संतापले. याचदरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    पहा व्हिडीओ...

    So now i understand why #SalmanKhan takes #KunickaaSadanand Side 😂❤️#BB19 #BiggBoss pic.twitter.com/dnjZ7zPYqC

    — Rubiology 💋 (@ItsRubiology) September 9, 2025

  • 11 Sep 2025 10:43 AM (IST)

    11 Sep 2025 10:43 AM (IST)

    कोणत्या शेअर्सवर होणार परिणाम

    भारतीय बाजारांसाठी आज संमिश्र संकेत दिसत आहेत. एफआयआयने फ्युचर्समध्ये दीर्घ व्यवहार वाढवले ​​आहेत. गिफ्ट निफ्टीमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. आशियामध्येही तेजीसह व्यवहार सुरू आहेत. काल अमेरिकन बाजारातही संमिश्र व्यवहार दिसून आले. डाउ जोन्स २०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. तथापि, एस अँड पी ५०० निर्देशांक आणि नॅस्डॅक हिरव्या चिन्हावर बंद होण्यास यशस्वी झाला. बातमी सविस्तर वाचा...

  • 11 Sep 2025 10:30 AM (IST)

    11 Sep 2025 10:30 AM (IST)

    महिलेच्या समोर प्रकट झाला मोर

    सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार आणि मनोरंजक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. अशातच एक सुंदर आणि सर्वांना सुखावून जाणारा एक व्हिडिओ सध्या इथे व्हायरल झाला आहे. घराच्या छतावर योगा करताना महिलेसोबत एक आश्चर्यकारक घटना घडून आली आणि याचाच व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. बातमी सविस्तर वाचा...

  • 11 Sep 2025 10:12 AM (IST)

    11 Sep 2025 10:12 AM (IST)

    कशी आहे आशिया कपमध्ये गुणतालिकेची स्थिती?

    टी20 आशिया कप 2025 दुबईमध्ये सुरु झाला आहे. आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. अशाप्रकारे चार संघांनी प्रत्येकी किमान एक सामना खेळला आहे. तथापि, दोन्ही गटातील फक्त 2-2 संघांनी सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत, पॉइंट टेबलची स्थिती काय आहे ते जाणून घ्या. बातमी सविस्तर वाचा...

  • 11 Sep 2025 10:10 AM (IST)

    11 Sep 2025 10:10 AM (IST)

    महिलांचं कुंकू पुसल्या गेलं, भाजप विसरला का? - संजय राऊत

    एकीकडे पहलगाम हल्ल्यावरून देशात पाकिस्तानविरोधात क्षोभ असतानाच दुसरीकडे अबुधाबीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होत आहे. 14 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया कप 2025 मध्ये दोन्ही संघ आमने-सामने येतील. हा सामना रद्द करण्याची देशभरात मागणी होत आहे.यावरुन पहलगाममध्ये महिलांचं कुंकू पुसल्या गेलं, भाजप विसरला का? असा खडा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे.

  • 11 Sep 2025 09:59 AM (IST)

    11 Sep 2025 09:59 AM (IST)

    सोलापुरात पुन्हा हिंसाचार

    सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत गोळीबार नेमका कोणी केला याची माहिती पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाही आहे. काल बुधवारी बार्शी येथील कला केंद्रातील एका नर्तिकामुळे एका उपसरपंचां आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

  • 11 Sep 2025 09:51 AM (IST)

    11 Sep 2025 09:51 AM (IST)

    राज्यात PUC नसेल तर इंधनही मिळणार नाही

    वाहन चालवताना वाहन परवाना, वाहन विमा यांसह पीयूसीही गरजेचे असते. पण, अनेकांकडे पीयूसी नसल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. मात्र, आता हे लागू केले जाणार आहे. त्याशिवाय, पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

  • 11 Sep 2025 09:34 AM (IST)

    11 Sep 2025 09:34 AM (IST)

    नागपुरात भररस्त्यात व्यापाऱ्यावर गोळीबार; हल्लेखोरांनी ५० लाख लुटले

    नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यापाऱ्याला गोळीबार करत दरोडेखोरांनी लुटल्याचे समोर आले आहे. या घटनेत व्यापारी जखमी झाला आहे. ही घटना नागपूरच्या कडबी चौकात भर रस्त्यावर बुधवारी रात्री घडली आहे. या घटनेने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लुटलेली रक्कम हवालाशी निगडित असल्याचा संशय आहे.

  • 11 Sep 2025 09:21 AM (IST)

    11 Sep 2025 09:21 AM (IST)

    राज्यात PUC नसेल तर इंधनही मिळणार नाही : परिवहनमंत्री 

    वाहन चालवताना वाहन परवाना, वाहन विमा यांसह पीयूसीही गरजेचे असते. पण, अनेकांकडे पीयूसी नसल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. मात्र, आता हे लागू केले जाणार आहे. त्याशिवाय, पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

  • 11 Sep 2025 08:44 AM (IST)

    11 Sep 2025 08:44 AM (IST)

    डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कर्क हे बुधवारी युटा कॉलेजमधील एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्याचवेळी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अशाप्रकारे एका भर कार्यक्रमात हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेवरून अमेरिकेत राजकीय हिंसाचाराचा धोका अद्याप संपलेला नसल्याचे दिसून येत आहे.

Marathi Breaking News Updates : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. या निवडीनंतर त्यांनी महाराष्ट्राबाबत कृतज्ञता व्यक्त केली. ‘मी एक प्रखर देशभक्त आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून माझा कार्यकाळ माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव होता. महाराष्ट्रात येण्यापूर्वी मी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम करत होतो’, असे नव्या उपराष्ट्रपतींनी सांगितले.

सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतिपदी निवड झाली आहे. त्यानंतर आता त्यांनी ज्या-ज्या राज्यात राज्यपाल पद स्वीकारले, त्याची माहिती दिली. महाराष्ट्रात येण्यापूर्वी मी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम करत होतो. तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. पण, माझा सर्वात आनंददायी कार्यकाळ महाराष्ट्रात होता. महाराष्ट्रातील माझ्या १३ महिन्यांच्या कार्यकाळात मला दोन मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यवान होते.

जेव्हा मी राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी महाराष्ट्रात आलो, तेव्हा सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. नंतर त्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. दोघांमध्ये नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध होते.

Web Title: Top marathi news today live marathi breaking news navarashtra update maharashtra politics navarashtra live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Marathi Breaking news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी केलं महाराष्ट्राचं कौतुक; ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’
1

उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी केलं महाराष्ट्राचं कौतुक; ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची भेट अन् एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई जिंकण्यासाठी आखली ‘ही’ खास रणनीती
2

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची भेट अन् एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई जिंकण्यासाठी आखली ‘ही’ खास रणनीती

‘आमदार टक्केवारी घेतात अन् विकासही रोखतात’; सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदाराचे विधान
3

‘आमदार टक्केवारी घेतात अन् विकासही रोखतात’; सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदाराचे विधान

मोठी बातमी! आरक्षणाचा मुद्दा तापणार; ‘हा’ समाज आंदोलनाच्या तयारीत, सरकारची डोकेदुखी वाढणार?
4

मोठी बातमी! आरक्षणाचा मुद्दा तापणार; ‘हा’ समाज आंदोलनाच्या तयारीत, सरकारची डोकेदुखी वाढणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.