Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: ‘जिल्ह्यातील एकही सुशिक्षित तरुण बेरोजगार राहणार नाही’…जालनात मॅरेथॉन बैठका

औद्योगिकीकरण झपाट्याने वाढणारे शहर जालना सध्या नावारूपाला येत असून याठिकाणी रोजगार मेळावा झाला आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य, रोजगाराबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 26, 2025 | 10:07 PM
जालन्यात रोजगार मेळावा, मंगल प्रभात लोढांची उपस्थिती (फोटो सौजन्य - X.com)

जालन्यात रोजगार मेळावा, मंगल प्रभात लोढांची उपस्थिती (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Close
Follow Us:

जालनाः राज्यात जालना हे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढणारे शहर म्हणून नावारुपास येत आहे. येथील तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी तसेच स्वयंरोजगाराच्या वाटा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक पावले टाकत आहेत. तरी स्थानिक औद्योगिक कंपन्यामध्ये ज्या रोजगार कौशल्याची मागणी असेल त्या व्यवसायातील प्रशिक्षण देऊन उमेदवारात कौशल्य वाढवून कुशल मनुष्यबळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाईल. त्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्याने जालना जिल्ह्यातील एकही सुशिक्षित तरुण बेरोजगार राहणार नाही,  अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली.

Mangal Prabhat Lodha: “पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून…”; मंत्री लोढांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

सुशिक्षित तरूणांना नोकरीची हमी 

रोजगार मेळाव्यात मंत्री लोढा यांनी सांगितले की, उद्योजक व शासन एकत्र येऊन काम केले तर निश्चित महाराष्ट्राची भरभराट होईल. यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप महत्वाची आहे असं मत त्यांनी मांडलं. तसंच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबवून कुशल मनुष्यबळाची निर्मिती केली जाणार आहे असे सांगत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 40 कंपन्यांनी आज रोजगार उपलब्ध करुन दिला आहे हे स्पष्ट केले. 

कायदा व सुव्यवस्था आणि मनुष्यबळ या आधारावरच नवीन उद्योग उभारत असतो. उद्योग उभारणीत कुशल मनुष्यबळ अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळाची उभारणी करणे गरजेचे आहे.  उद्योजकांच्या तांत्रिक गरजेनूसार आयटीआयच्या माध्यमातून नवनवीन व्यवसाय चालु करण्यात येणार आहेत. नवीन व्यवसायासाठी लागणारी मशिनरी शासनाकडून तातडीने पुरविण्यात येईल. संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी गुणवत्तेसह  प्रामाणिकपणे आपले काम पार पाडावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

जालन्यात रोजगार मेळावा संपन्न 

कला विज्ञान व  वाणिज्य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्पस,  बदनापूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, कौशल्य विकास विभाग आयुक्त लहू माळी, कौशल्य विकास विभाग सहायक आयुक्त गणेश चिमणकर, कौशल्य विकास विभाग उपायुक्त विद्या शितोळे, देवेश पाथ्रीकर, सहसंचालक पी.टी.देवतळे, डॉ.जकीर पठाण यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मॅरेथॉन बैठका

जनसंवाद/जनता दरबार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसंदर्भात बैठक, पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव जिल्हास्तरीय समिती बैठक, जिल्हा कौशल्य विभाग आढावा बैठक, संस्था व्यवस्थापन समितीच्या मॅरेथॉन बैठका घेत  संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.

सर्व बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल,  कौशल्य विकास विभाग सहायक आयुक्त गणेश चिमणकर, कौशल्य विकास विभाग उपायुक्त विद्या शितोळे, सहसंचालक पी.टी.देवतळे,  यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

Mangal Prabhat Lodha: मंत्री लोढांचा जनता दरबार ठरतोय आदर्श; भाजपा कार्यालयात 500 नागरिकांनी…

Web Title: Mangal prabhat lodha attended jalna rojgar melava assured about employment for educated youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 10:07 PM

Topics:  

  • jalna news
  • Mangal Prabhat Lodha
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.