
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Govt Subsidy: आता अर्ध्या किमतीत गाडी घरी घेऊन जा! सरकारची मोठी घोषणा, EV खरेदीवर मिळणार 50 % सबसिडी
सोनम वांगचुक यांनी आपली वैयक्तिक संपत्ती किंवा एकूण संपत्ती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. पण प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ₹७.५ दशलक्ष म्हणजे ७५ लाख इतकी त्यांची संपत्ती असावी असा अंदाज आहे. काही इतर वृत्तांनुसार हा आकडा याहूनही जास्त आहे, परंतु याबद्दल कोणताही अधिकृत डेटा उपलब्ध नाही.
सोनम वांगचुक यांच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. त्यांचे ‘वांगचुक वर्ल्ड’ नावाचे स्वतःचे यूट्यूब चॅनल आहे, ज्याचे लाखो सबस्क्राइबर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते केवळ या चॅनलमधून दरमहा ३,००,००० ते ७,००,००० रुपये कमावतात. तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर व्याख्याने, परिषदा आणि प्रेरणादायी भाषणे देऊनही पैसे कमावतात
लडाखचे रहिवासी असलेल्या सोनम वांगचुक यांनी ‘स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ची सह-स्थापना केली आणि नंतर ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज, लडाख’च्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. बर्फाचे स्तूप यांसारख्या पर्यावरण तंत्रज्ञानासाठी ते जगभरात ओळखले जातात. त्यांना २०१८ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
सोनम वांगचुक सध्या अनिश्चित काळासाठी उपोषणावर होते. उपोषणाच्या 20 व्या दिवशी दिल्लीत पोलिसांना त्यांना उचलून नेत एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर, सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत त्यांच्या आंदोलनाबद्दल आणि मागण्यांबद्दलची चर्चा तीव्र झाली आहे. या सगळ्यामुळे संपूर्ण देशभर राजकारण तापलं आहे.