
'ये पॉलिटिक्स है बाबू भैया'! Manikrao Kokate संकटात अन् मुंडे कमबॅक करणार? थेट मंत्री होऊनच...
मंत्री धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असल्याच्या चर्चा
माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार
कोकाटे यांनी हायकोर्टात केली तातडीच्या सुनावणीची मागणी
मुंबई: राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाने दिलासा न दिल्यास त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद देखील जाऊ शकते असे म्हटले जात आहे. त्याच दरम्यान धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
नाशिक कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्याविरध अटक वॉरट जारी केले आहे. नाशिक कोर्टाने कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे. त्याच वेळेस माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे ही दिल्लीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
हायकोर्टाने कोकाटे यांना दिलासा देण्यास नकार दिला तर त्यांचे मंत्रिपद जाण्याचा अंदाज आहे. कोकाटे यांच्यावर असलेली टांगती तलवार आणि धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा यावर चर्चा सुरू आहे. कोकाटे यांचे मंत्रिपद गेल्यास धनंजय मुंडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोकाटे यांच्याबाबत हायकोर्ट काय देणार याकडे सवरणाचे लक्ष लागले आहे. त्याच दरम्यान धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असल्याचा चर्चा आहेत. त्यामुळे सरकारमध्ये मंत्री म्हणून धनंजय मुंडे कमबॅक करणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण दुसरीकडे, माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही सकाळपासून नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी त्यांची मंत्रिमंडळातूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांची आमदारकीही रद्द करण्यात आली आहे.
Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द
मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून दिलासा देण्यात आला आहे. हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाईल. असे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई केली जाणार नाही.