
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर भाष्य केल आहे. माणिकराव कोकाटे यांनी दोन वर्षांची शिक्षा झाली असल्याने त्यांचे मंत्रिपदासोबतच त्यांची आमदारकीही जाणार आहे. माणिकराव कोकाटे यांना शिक्षेविरूद्ध दाद मागण्याचा अधिकार आहे. पण त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी देखील रद्द होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोकाटेंना दोन वर्षाची शिक्षा झाली असल्याने त्यांचे मंत्रिपदच काय पण आमदारकी देखील रद्द होत असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टाचा नियम देखील सांगितला आहे.
अंजली दमानिया यांनी सांगितले की, कोकाटे यांना शिक्षेविरोधात अपील करण्याचा अधिकार आहे. मात्र अपील दाखल केल्यावरही त्यांचे मंत्रिपद किंवा आमदारकी कायम राहू शकत नाही. कारण लोकप्रतिनिधी कायद्यातील सेक्शन ८(४), ज्याअंतर्गत अपील प्रलंबित असताना दिलासा मिळत होता, हा कायदा सुप्रीम कोर्टाने Ultra Vires ठरवत रद्द केला आहे. त्यामुळे कोकाटे अपील करू शकतात; पण त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी संपुष्टात आली आहे.
Bhosari Election News: भोसरीत निवडणुकीच्या आखाड्यात लांडगे विरुद्ध लांडगे! जाळ अन् धूर संगटच
दरम्यान, आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत माणिकराव कोकाटे प्रकरणावर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, कोकाटेंकडील मंत्रिपद कोणाकडे द्यायचे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचेही वृत्त आहे.
याचवेळी माणिकराव कोकाटे यांचा फोन बंद असून ते आजच्या कॅबिनेट बैठकीलाही गैरहजर राहणार असल्याचे समोर आले आहे. कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम असून, निवडणुकीपूर्वी अटक झाली तर राष्ट्रवादी काँग्रेससमोर अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.