Bhosari Election News: भोसरीत निवडणुकीच्या आखाड्यात लांडगे विरुद्ध लांडगे! जाळ अन् धूर संगटच निघणार
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, 2017 प्रभाग मध्ये शहरात भाजपाची मोठी लाट होती. नगरसेवक निवडून आले होते. या प्रभागातून भाजपाचे चारही प्रभागातील अ गटातून भाजपाच्या यशोदा बोईनवाड यांनी 12 हजार 628 मते मिळवत, राष्ट्रवादीच्या आशा सुपे यांचा पराभव केला होता.
ब- गटातून भाजपच्या तिकीटावर लढलेल्या सारिका लांडगे यांनी 9 हजार 240 मते मिळवली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुनिता गवळी आणि शिवसेनेच्या करिष्मा बढे यांचा पराभव केला होता. विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या त्यावेळी समर्थक असलेल्या सारिका लांडगे यांनी विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटात आणि त्यानंतर आता त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत.
क गटातून तत्कालीन भाजपाचे रवि लांडगे या प्रभागातून बिनविरोध निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रीय खेळाडू योगेश लांडगे यांनी माघार घेतली आणि रवि यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. मात्र, आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असलेले रवि लांडगे यांनी स्थायी समिती सभापती संधी न दिल्यामुळे नंतरच्या काळात महेश लांडगेंच्या विरोधात भूमिका घेतली. भाजपा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला.
भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण आम्ही थांबवले. कोविड काळात हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. बहुउद्देशीय सभागृह आणि रुग्णालयाचे आरक्षण विकसित झाले, प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात आहोत, सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. त्यामुळे विकासकामांच्या जोरावर आम्ही निवडणूक निश्चितपणे जिकणार आहोत.
– रवि लांडगे, माजी नगरसेवक,
गेल्या 8 वर्षांमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. लोकांसोबत आमचे एक विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. रेड झोन आणि प्राधिकरण हद्दीत विखुरलेल्या प्रभागात आम्ही पायाभूत सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला लोकांची साथ मिळेल आणि आमचे चारही नगरसेवक निवडून येतील.
राजेंद्र लांडगे, भाजपा
Latur Crime: पतीचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं, सततच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
प्रभागातील आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे :
प्रभाग अ : ओबीसी महिला
प्रभाग क : महिला
प्रभाग य : ओबीसी
प्रभाग उ : खुला (ओपन)
या प्रभागात एकूण ४१,२४८ मतदार आहेत. यामध्ये २३,५७५ महिला तर १७,६७१ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जोरदार तयारी केली. निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये त्यांना सधी मिळाली नाही. विधानसभा निवडणुकीत त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढवलेले अजित गव्हाणे यांच्यासाठी रवि लांडगे यांनी प्रचार केला. मात्र, या निवडणुकीत महेश लांडगे यांनी बाजी मारली. महेश लांडगे यांना मताधिक्य मिळाले.






