Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manikrao Kokate News : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये वाढ; न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा

नाशिकमधील अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांचे बंधु सुनील कोकाटे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 20, 2025 | 03:01 PM
Agriculture Minister Manikrao Kokate gave his first reaction after being sentenced to imprisonment

Agriculture Minister Manikrao Kokate gave his first reaction after being sentenced to imprisonment

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधु सुनील कोकाटे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास व ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या विमाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मागील काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे चर्चेत आले होते. आता त्यांच्या आमदारकीवर देखील टांगती तलवार आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर घरकुल घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.  १९९५ मध्ये तत्कालीन आमदार दिवंगत नेते तुकाराम दिघोळे यांनी केस केली होती.  या केसची आज (दि.20)  सुनावणी पार पडली. या केसचा निकाल हाती आला आहे. यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निकाल लागला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

कायद्यानुसार, कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली असेल तर त्यांचे पद रद्द होते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माणिकराव कोकाटे हे आमदार बरोबर ते राज्याचे कृषीमंत्री देखील आहेत. त्यामुळे अजित पवार गटाच्या आणखी एका मंत्र्याचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

राज्याच्या मुख्यमंत्री कोट्यातून कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे कमी दरात घरं उपलब्ध केली जाते. त्यासाठी इच्छुक व्यक्तीला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 मध्ये या योजनेंतर्गत सदनिका मिळवली होती. आवश्यक कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे तर, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन(कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिक कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून चार जणांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधु सुनील कोकाटे यांच्यावर सरकारची फसवणूक करुन सदानिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यासह आणखी दोघांवर आरोप करण्यात आला होता. मात्र पुराव्यांच्या अभावी त्यांचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. मात्र कोकाटे बंधूना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Web Title: Manikrao kokate sentenced to imprisonment by the district and sessions court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 01:37 PM

Topics:  

  • Manikrao Kokate
  • Nashik News
  • political news

संबंधित बातम्या

पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात गदारोळ; गैरवर्तन केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर कारवाईचा बडगा
1

पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात गदारोळ; गैरवर्तन केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर कारवाईचा बडगा

Samnapur News : “दारू दुकान बंद करा, अन्यथा…”; समनापूरच्या रणरागिणींनी प्रशासनाला झुकावले
2

Samnapur News : “दारू दुकान बंद करा, अन्यथा…”; समनापूरच्या रणरागिणींनी प्रशासनाला झुकावले

Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”
3

Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची  मोठी मागणी
4

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.