Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात; ‘या’ प्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

शिक्षा झाल्यानंतर मंत्री कोकाटे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणे अपेक्षित होते. आता त्यांना जामीन मिळू नये म्हणून हायकोर्टातत कागदपत्रे सादर करून प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 17, 2025 | 10:13 AM
Manikrao Kokate Conviction, Government Flat Scam

Manikrao Kokate Conviction, Government Flat Scam

Follow Us
Close
Follow Us:
  • बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून कोट्यातील सदनिका बळकावली
  • दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने मंत्रीपद धोक्यात
  • उच्चभ्रू परिसरात कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली
Nashik News: बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांना झालेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांची आमदारकी व पर्यायाने मंत्रिपद धोक्यात आले आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे आणि शासकीय त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना न्यायालयाने २ वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. याविरोधात त्यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायालयाने शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटेंवर अटकेची तलवार आहे.

कोकाटे यांना जामीन मिळू नये म्हणून हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांनी हायकोर्टात कागदपत्रे सादर केल्याचे म्हटले आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची शिक्षा झाली तर त्यांना पदावर राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे कायद्यातील नियमाप्रमाणे कोकाटे यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे.

शासनाची फसवणूक

सत्र न्यायालयाने अभिलेखाचे अवलोकन स्पष्ट निरीक्षण नोंदविले की, ज्या सदनिका कोकाटे यांनी घेतल्या. त्या निकषानुसार नाहीत. यात शासनाची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले, शिक्षा झाल्यानंतर मंत्री कोकाटे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणे अपेक्षित होते. आता त्यांना जामीन मिळू नये म्हणून हायकोर्टातत कागदपत्रे सादर करून प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

अल्प उत्पन्न गटातून मिळवली सदनिका

नाशिक शहरातील सर्वात महागड्या आणि उच्चभ्रू परिसरात कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. तसेच, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धन वा तीन जणांनी कॅनडा कॉर्नर भागात का अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवल्या होत्या. परंतु, दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली. त्यात कोकाटे यांनी जास्तीचे उत्पन्न असताना ते कमी दाखविल्याचे उघड झाले होते.

 

Web Title: Manikrao kokates ministerial position is at risk due to his two year prison sentence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Politics
  • Manikrao Kokate
  • Nashik Politics

संबंधित बातम्या

Manikrao Kokate News:  माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल?
1

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल?

आचारसंहिता लागताच पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; एकाच दिवसात 4819 अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई
2

आचारसंहिता लागताच पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; एकाच दिवसात 4819 अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

Bhosari Election News: भोसरीत निवडणुकीच्या आखाड्यात लांडगे विरुद्ध लांडगे! जाळ अन् धूर संगटच निघणार
3

Bhosari Election News: भोसरीत निवडणुकीच्या आखाड्यात लांडगे विरुद्ध लांडगे! जाळ अन् धूर संगटच निघणार

‘…म्हणून आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही’; ऐन महापालिका निवडणुकीतच आशिष शेलारांचं मोठं विधान
4

‘…म्हणून आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही’; ऐन महापालिका निवडणुकीतच आशिष शेलारांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.