Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger News: अजित पवारांची ‘शेवटची इच्छा’ पूर्ण होणार; निकटवर्तीयांचा खळबळजनक दावा

अजित पवारांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील. पुढचे १०-११ दिवस पवार कुटुंब या विषयावर बोलणार नाही पण लवकरच दोन्ही पक्ष विलीन होऊ शकतात

  • By anuradha sagar
Updated On: Feb 02, 2026 | 02:14 PM
NCP Merger News, Ajit Pawar NCP, NCP Politics, Maharashtra Politics,

NCP Merger News, Ajit Pawar NCP, NCP Politics, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय किरण गुजर यांचा मोठा दावा
  • अजित पवारांची अंतिम इच्छा लवकरच पूर्ण होईल
  • दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील
NCP Merger News: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात निर्माण झालेला पेच आता सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते  शरद पवारांनी दाखवलेली अनभिज्ञता आणि त्यातून निर्माण झालेली अस्वस्थता, या पार्श्वभूमीवर आता एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी बारामतीतील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबाशी सविस्तर चर्चा केली होती. या भेटीत नेमके काय घडले, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय किरण गुजर यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

BMC Election 2026: BMCमध्ये भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी

कुटुंब एकत्र येण्याचे संकेत

दिवंगत अजित पवारांची अंतिम इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील,’ असे सूचक विधान अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी दिली. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण व्हावे अशी अजित पवार यांची इच्छा होती. त्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चाही सुरू होत्या १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणाही करायची होती. पण यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांमध्ये चढाओढ सुरू आहे. या सगळ्या घटनाक्रमावर किरण गुजर यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवारांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील. पुढचे १०-११ दिवस पवार कुटुंब या विषयावर बोलणार नाही पण लवकरच दोन्ही पक्ष विलीन होऊ शकतात. अजित पवार यांनी मला २१ जानेवारीलाच, ‘राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विलीनीकरण केलं पाहिजे. त्यासाठी चर्चाही सुरू आहे,’ असं सांगितलं होतं.

गुजर म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा एकत्रीकरणाचा निर्णय पक्का झाला आहे. अजित पवारांच्या इच्छेनुसार दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होईल. पण या प्रक्रियेसाठी थोडासा वेळ लागेल आणि याबद्दलची अधिकृत घोषणा पक्षाच्या नेतृत्त्वाकडून केली जाईल.” यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बारामतीत शरद पवार, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, पार्थ पवार, राजेंद्र पवार आणि रणजित पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती. असंही गुजर यांनी नमुद केलं.

Sunetra Pawar Satara Visit : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला शासकीय दौरा; साताऱ्यामध्ये घेणार जाधव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे संकेत आणि ‘गोविंदबाग’ भेट

विलीनीकरणाबाबत सकारात्मकता: विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले आहे. यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय परिसरात दिवंगत नेते अजित पवार यांचे स्मारक उभारण्याबाबत शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण एकत्र राहतील, अशी ग्वाही गुजर यांनी दिली. पार्थ पवार यांनी गोविंदबागेत जाऊन शरद पवारांची घेतलेली भेट आणि तेथील सविस्तर चर्चेचा ‘सस्पेन्स’ अखेर समोर आला आहे. ही भेट कौटुंबिक आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

Web Title: Ncp merger news ajit pawars last wish will be fulfilled sensational claim by his close associates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • NCP Politics

संबंधित बातम्या

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, पैशांची होणार वसुली
1

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, पैशांची होणार वसुली

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
2

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
3

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’
4

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.