Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil reservation protest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत, २९ ऑगस्टच्या अंतरवाली सराटी आंदोलनात मराठा समाज आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचे म्हटले. रद्द झालेली प्रमाणपत्रे सुधारण्याची मागणी करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आणि आरक्षणासाठी आपली संपूर्ण

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 12, 2026 | 08:35 PM
मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील
Follow Us
Follow Us:
  • सगळी ताकद व माझा जीव पणाला लावेन
  • मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
  • मराठा समाजाच्या वतीने सभा आयोजित
मायणी : बावनकुळे आम्ही ९६ कुळी मराठा आहोत. २९ ऑगस्टला तुझी काय सरकारी ताकद लावायची असेल ती अंतरवाली सराटा आंदोलनाच्या वेळी लाव. हे संपूर्ण साडेसहा कोटी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही .शासन जाणून-बुजून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री व बावनकुळे रद्द केलेल्या नोंदी प्रमाणपत्रा बाबत कोणता निर्णय घेतात ते पाहू कारण त्यांच्यावर आता विश्वास राहिला नाही. रद्द केलेली प्रमाणपत्रे सुधारण्याची चूक दुरुस्त करा. मराठ्यांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही हे मराठ्यांना दाखवावे लागेल.मराठ्यांच्या आरक्षणासाठी मी सगळी ताकद व माझा जीव पणाला लावेन असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर UPSTDC कडून ‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेज; मथुरा-वृंदावनसह ब्रजभूमीची सफर

मायणी ता. खटाव येथे सातारा जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने आयोजित पहिल्या सभेत ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले,मंत्री बावनकुळे यांनीच कुणबी नोंदी रद्द केल्या असून या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.यावेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवर तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.

जरांगे पाटील पुढे म्हणाले,बावनकुळे यांनी नोंदी रद्द केले नाहीत असे दाखविण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देऊन पत्र काढायला लावले. मात्र या नोंदी बावनकुळे यांनीच रद्द केले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही मंत्र्याच्या दबावाखाली किंवा राजकीय आदेशानुसार काम करताना आपण कोणाच्या हातचे बाहुले होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. चुकीचे निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम अधिकाऱ्यांना भोगावे लागू शकतात असा इशारा त्यांनी दिला.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या ताकदीने मराठा समाज कधीच उठला नाही. आता पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज सावध झाला आहे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊस आहे, बागायती जमीन आहे त्यामुळे त्यांना कशाची गरज नाही असा जो समज आहे तो समज दूर करून हा लागलेला डाग पश्चिम महाराष्ट्राने पुसून काढणे गरजेचे आहे. जाणून बुजून प्रमाणपत्र रद्द करण्याची ही भूमिका शासनास धोक्याची घंटा ठरू शकते.

यावेळी जि. प. सदस्या मनीषा फडतरे, जि. प . सदस्य सुरज पाटील, संदीप मांडवे, सरपंच सौ सोनाली माने,मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख,हिंमत देशमुख, रणजीत माने, स्वप्निल घाडगे ,हेमंत जाधव ,मराठा समाजाचे समन्वयक अरुण काकडे ,दीपक कणसे , कृष्णात सोमदे आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन सयाजी देशमुख यांनी केले.

Satara News: अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी

Web Title: Manoj jarange patil maratha reservation protest kunbi records maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Manoj Jarang patil
  • Maratha Arakshan

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग
1

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
2

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
3

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.