• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Many Big Leaders From Bjp And Ncp Have Publicly Joined The Congress Party

भाजप, राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षांतील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 16, 2025 | 03:04 PM
बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस 'अॅक्शन मोड'वर; 'या' बड्या नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी

बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस 'अॅक्शन मोड'वर; 'या' बड्या नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आगामी निवडणुकासाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी
  • जतमध्ये भाजप, राष्ट्रवादीला मोठा धक्का
  • बड्या नेत्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश
जत : जत शहराच्या राजकारणात रोज नवनवीन उलथापालथ होत आसल्याचे दिसून येत आहे. जतच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना आज घडली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षांतील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. दोन विद्यमान नगरसेवकांसह विविध पक्षांच्या प्रभावी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे हाती घेतलेले निशाण, आगामी जत नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षासाठी शुभ संकेत मानले जात आहेत.

आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे जत शहरात काँग्रेस पक्षाची ताकद गगनाला भिडल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक प्रकाश माने आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका जयश्री शिंदे यांचा समावेश आहे, ज्यामुळे विरोधी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षातील सलीम नदाफ (टपाले) दस्तगीर नदाफ (टपाले) यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रामराव नगर येथील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अनिल शिंदे, प्रमोद चव्हाण, अरबाज शेख, राजू नगारशी आणि जमीर अत्तार यांनीही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने, शहराच्या विविध भागांत काँग्रेस पक्षाची पकड मजबूत झाली आहे.

पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान प्रवेश करणाऱ्या सर्वांचे माजी आमदार सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी जतच्या विकासाच्या ध्येयावर भर दिला. सावंत म्हणाले, “जत शहराच्या विकासासाठी आता सर्वसमावेशक आणि भक्कम नेतृत्वाची अत्यंत गरज आहे. शहरातील प्रमुख नेत्यांनी आणि युवाशक्तीने आज माझ्या नेतृत्वावर आणि काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर जो विश्वास दाखवला आहे, तो केवळ राजकीय प्रवेश नसून, जतच्या जनतेचा विश्वास जिंकण्याच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे आणि निर्णायक पाऊल आहे. या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने आपण शहराचा विकास निश्चितच करु.”

या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आप्पाराया बिरादार, सभापती सुजय नाना शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, रामचंद्र सरगर तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन विद्यमान नगरसेवकांसह शहरातील प्रभावी युवा नेतृत्वाच्या काँग्रेसमधील प्रवेशामुळे आगामी जत नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढल्याचे स्पष्ट चित्र आहे. शहरातील राजकीय समिकरणे बदलली असून, यामुळे काँग्रेसला एक मोठी आणि नवी ऊर्जा मिळाली आहे. शहरात काँग्रेस पक्षाविषयी निर्माण झालेल्या या सकारात्मक वातावरणाला या प्रवेशामुळे अधिक गती मिळाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून आणि राजकीय विश्लेषकांतून उमटत आहे. काँग्रेस पक्षाच्या वाढलेल्या ताकदीमुळे निवडणुकीतील चुरस अधिक वाढणार असल्याचे दिसते.

Web Title: Many big leaders from bjp and ncp have publicly joined the congress party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

चाकण–शिक्रापूर मार्गावर धुळीचे लोट; खड्ड्यांचा रस्ता वाहतूकदारांसह नागरिकांसाठी डोकेदुखी
1

चाकण–शिक्रापूर मार्गावर धुळीचे लोट; खड्ड्यांचा रस्ता वाहतूकदारांसह नागरिकांसाठी डोकेदुखी

नवले पूल : मृत्यूचा उतार संपणार कधी? कागदोपत्री प्रक्रिया सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ
2

नवले पूल : मृत्यूचा उतार संपणार कधी? कागदोपत्री प्रक्रिया सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्कार; पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा बहुमताने निर्णय
3

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्कार; पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा बहुमताने निर्णय

मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती
4

मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एका झटक्यात Tata Sierra Diesel Variant होईल तुमची! Down Payment आणि EMI चा सोपा हिशोब समजून घ्या

एका झटक्यात Tata Sierra Diesel Variant होईल तुमची! Down Payment आणि EMI चा सोपा हिशोब समजून घ्या

Dec 09, 2025 | 06:15 AM
रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ चटणीचा समावेश! वाढत्या रक्तदाबाच्या त्रासापासून कायमची मिळेल सुटका, कधी येणार नाही हार्ट अटॅक

रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ चटणीचा समावेश! वाढत्या रक्तदाबाच्या त्रासापासून कायमची मिळेल सुटका, कधी येणार नाही हार्ट अटॅक

Dec 09, 2025 | 05:30 AM
“ऑपरेशन सिंदूर’मध्ये जगाने…”‘; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी काढले गौरवोद्गार

“ऑपरेशन सिंदूर’मध्ये जगाने…”‘; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी काढले गौरवोद्गार

Dec 09, 2025 | 02:35 AM
कोणी मुलींकडे लक्ष देतं का? बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान फक्त कागदावरच

कोणी मुलींकडे लक्ष देतं का? बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान फक्त कागदावरच

Dec 09, 2025 | 01:15 AM
Tasgaon Election : तासगावच्या निवडणुकीकडे नऊ हजार मतदारांनी फिरवली पाठ; उमेदवारांचा खर्च कोटीच्या घरात

Tasgaon Election : तासगावच्या निवडणुकीकडे नऊ हजार मतदारांनी फिरवली पाठ; उमेदवारांचा खर्च कोटीच्या घरात

Dec 09, 2025 | 12:30 AM
फातिमा जिना ते इम्रान खान… पाकिस्तानचे नेते ज्यांच्यावर लष्कराने लादला देशद्रोहाचा ठपका, जाणून घ्या

फातिमा जिना ते इम्रान खान… पाकिस्तानचे नेते ज्यांच्यावर लष्कराने लादला देशद्रोहाचा ठपका, जाणून घ्या

Dec 08, 2025 | 11:20 PM
Goa Nightclub Fire: 25 लोकांच्या मृत्यूला जबाबदार नाईट क्लबचा मालक भारत सोडून फरार, ‘या’ देशात आश्रय

Goa Nightclub Fire: 25 लोकांच्या मृत्यूला जबाबदार नाईट क्लबचा मालक भारत सोडून फरार, ‘या’ देशात आश्रय

Dec 08, 2025 | 10:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Dec 08, 2025 | 08:11 PM
Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Dec 08, 2025 | 08:08 PM
Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Dec 08, 2025 | 08:02 PM
उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

Dec 08, 2025 | 07:58 PM
Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Dec 08, 2025 | 07:42 PM
Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Dec 08, 2025 | 06:50 PM
Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Dec 08, 2025 | 02:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.