Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इचलकरंजीत महायुतीला बंडाळीचे ग्रहण; भाजपमधील निष्ठावंताची वेगळी चूल

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता आता उघडपणे समोर येऊ लागली असून, सत्ताधारी गटाला बंडाळीचे ग्रहण लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 27, 2025 | 12:30 AM
इचलकरंजीत महायुतीला बंडाळीचे ग्रहण; भाजपमधील निष्ठावंताची वेगळी चूल

इचलकरंजीत महायुतीला बंडाळीचे ग्रहण; भाजपमधील निष्ठावंताची वेगळी चूल

Follow Us
Follow Us:
  • इचलकरंजीत महायुतीला बंडाळीचे ग्रहण
  • भाजपातील निष्ठावंताची वेगळी चूल
  • उमेदवारी मिळणार नसल्यामुळे निर्णय
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता आता उघडपणे समोर येऊ लागली असून, सत्ताधारी गटाला बंडाळीचे ग्रहण लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. महायुतीतील ‘मोठा भाऊ’ असलेल्या भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत इचलकरंजीतील उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली. या बैठकीनंतर ज्या उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले, त्यांना थेट आता कामाला लागा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. मात्र, याच निर्णयामुळे अनेक प्रभागांतील इच्छुक भाजप नेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

दरम्यान, उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या भाजपच्या इच्छुकांनी आता महायुतीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. भाजपाचे निष्ठावंत आणि माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन यांनी प्रभाग क्रमांक १६ मध्ये उमेदवारी न मिळाल्याने शिवशाहू आघाडीत प्रवेश करून स्वत: व पत्नीला उमेदवारी पदरात पाडून घेतली. दीर्घकाळ भाजपाशी एकनिष्ठ राहूनही उमेदवारी नाकारल्यामुळे अनेकांनी उघडपणे बंडाचा झेंडा हाती घेतला. या घटनेमुळे भाजपच्या अंतर्गत गटबाजीची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. एकूणच, उमेदवारी निश्चितीच्या प्रक्रियेनंतर भाजप व महायुतीतील नाराज घटक उघडपणे मैदानात उतरू लागल्याने इचलकरंजीतील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीला खरोखरच बंडाळी लागते की नेतृत्व वेळेत परिस्थिती सावरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

‘एकनिष्ठ परिवर्तन आघाडी’चा उदय

माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते दीपक पाटील यांनाही उमेदवारी डावलण्यात आल्याने त्यांची नाराजी लपून राहिली नाही. दीपक पाटील भाजपाच्या संघटनात्मक कामात सक्रिय असूनही त्यांना संधी न मिळाल्याने अस्वस्थता वाढली आहे. त्यांच्या समवेत भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा एक गट आता उघडपणे विरोधी भूमिकेत जाताना दिसत आहे. या नाराज गटाने विरोधी ‘एकनिष्ठ परिवर्तन आघाडी’कडून निवडणूक लढवत महायुतीला धडा शिकवण्याचा निर्धार केल्याची चर्चा आहे.

अधिकृत उमेदवारांना बंडखाेरांचे आव्हान

केवळ अपक्ष उमेदवारीपुरते मर्यादित न राहता, संघटितपणे निवडणूक रणांगणात उतरण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याच अनुषंगाने नाराजांची फळी बांधण्याचे काम वेगाने सुरू झाले असून, प्रत्येक प्रभागात महायुतीविरोधी रणनीती आखली जात आहे. इचलकरंजीत पक्षांपेक्षा स्थानिक नेते, गट आणि व्यक्तिगत प्रभाव अधिक महत्त्वाचा ठरत असून, बंडखोरांच्या हालचाली महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अधिकृत उमेदवारांपुढे आता विरोधकांइतकाच अंतर्गत बंडखोरीचा धोका निर्माण झाला आहे. तिरंगी किंवा चौरंगी लढती झाल्यास महायुतीच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फटका निकालावर बसू शकतो.

Web Title: Many in the ichalkaranjit mahayuti are likely to rebel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • BJP
  • Ichalkaranji
  • Ichalkaranji Politics
  • shivsena

संबंधित बातम्या

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
1

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.