Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांना धक्का! ‘या’ बड्या नेत्यांचा अजित पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष समाधान कदम आणि बावधन गणातीत दरेवाडी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 28, 2025 | 05:27 PM
शरद पवारांना धक्का! 'या' बड्या नेत्यांचा अजित पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवारांना धक्का! 'या' बड्या नेत्यांचा अजित पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:
  • आगामी निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी
  • अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का
  • वाईतील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

वाई : आगामी निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी दौरेदेखील वाढवले आहेत. अशातच आता वाई तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष समाधान कदम आणि बावधन गणातीत दरेवाडी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी फुटीनंतर ॲड. विजयसिंह पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. परंतु स्थानिक नेतृत्वाकडून कोणतीही पक्षीय ताकद आणि पाठबळ मिळत नसल्याची खदखद गेले अनेक दिवस तरुणाच्या मनामध्ये होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावली. दुर्दैवाने त्यांच्या प्रयत्नांना पुरेसे यश न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाराजी पसरली होती. निवडणुकीनंतर शरद पवार गटाचे स्थानिक नेते कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील अशी आशा कार्यकर्त्यांना वाटत होती. परंतु त्यानंतर सर्व कार्यकर्ते ओस पडले होते, अशी माहिती यावेळी समाधान कदम, मनोहर शिंदे यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी तालुक्यातील शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष समाधान कदम तसेच दरेवाडी गावचे सरपंच मनोहर शिंदे, उपसरपंच सिंधू राजपुरे, ग्रामपंचायत सदस्य विजय राजपुरे, उषा थोपटे, अनुसया राजपुरे, वृषाली राजपुरे, भगवान थोपटे, कणुर-दरेवाडी विकास सोसायटी माजी संचालक चंद्रकांत राजपुरे,शंकर राजपुरे, सुधीर थोपटे, दादासाहेब भोसले, संपत राजपुरे, शामराव यादव, मधुसूदन यादव, राजेंद्र यादव, चंद्रकांत यादव, मारुती राजपुरे, बाळासाहेब राजपुरे, संतोष राजपुरे, हरी राजपुरे, बळीबा थोपटे, गजानन थोपटे, घनश्याम यादव, रामचंद्र येवले, पोपटराव राजपुरे, रवींद्र राजपुरे, किसन शिंदे, भिकू पिसाळ, सुरेश थोपटे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नितीन पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. हा प्रवेश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ॲड. विजयसिंह पिसाळ यांना अडचणीचा ठरणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अनेक मान्यवर व पदाधिकाऱ्यांची घरवापसी

यावेळी गेल्या काही दिवसांपूर्वी दरेवाडी गावचे सरपंच मनोहर शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष समाधान कदम यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मदन भोसले, दिलीप पिसाळ– पाटील, राजेंद्र कदम, विक्रम पिसाळ – पाटील, प्रणित पाटील यांच्याशी संवाद साधून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आमदार मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा सन्मानाने घरवापासी करण्याचा निर्णय घेतला. तसेच येणाऱ्या काळात भाजपच्या देखील अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे प्रणित पाटील यांनी सांगितले.

Web Title: Many leaders from sharad pawars party have joined ajit pawars party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • BJP
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

माळशिरसमध्ये ‘या’ नेत्याच्या नेतृत्वात होणार निवडणुका; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
1

माळशिरसमध्ये ‘या’ नेत्याच्या नेतृत्वात होणार निवडणुका; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल; निलेश राणेंचा ३२ जागांवर दावा!
2

Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल; निलेश राणेंचा ३२ जागांवर दावा!

सगळं सत्य बाहेर येत आहे, रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही…; फलटणमधून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल
3

सगळं सत्य बाहेर येत आहे, रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही…; फलटणमधून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल

Khed Politics: शरद पवारांना धक्का; खेड तालुक्यातील बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर
4

Khed Politics: शरद पवारांना धक्का; खेड तालुक्यातील बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.