
Top Marathi News Today Live : महापालिकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ असे अजितदादा म्हणाले होते; शशिकांत शिंदेंचं विधान
30 Jan 2026 12:53 PM (IST)
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा आगामी अर्थसंकल्प हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मांडण्याची शक्यता आहे. अर्थ खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता आहे. 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे.
30 Jan 2026 12:42 PM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता.28) त्यांचे विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्यावर गुरुवारी (ता.29) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. अजितदादांच्या निधनांतर राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. दरम्यान, सरकारने अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहे.
30 Jan 2026 12:32 PM (IST)
जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीचे मतदान ७ फेब्रुवारीला घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सीटीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या आणि इलेक्शन ड्यूटी (निवडणूक काम) असणाऱ्या शिक्षकांची अडचण झाली आहे. ते लक्षात घेऊन शासनाने ही परीक्षा देणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्यूटी रद्द करावी, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने केली.
30 Jan 2026 12:21 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.
30 Jan 2026 12:04 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात फसवणुकीच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना नाशिकमध्ये आता कमी गुंतवणुकीत अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी काही गुंतवणुकदारांची तब्बल ६५ लाख ४४ हजार ८३७ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
30 Jan 2026 11:54 AM (IST)
सध्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा निधनवार्ता समोर आली आहे. पुण्यातील आणखी एक नेता काळ्याच्या पडद्याआड झाला आहे. पुण्याचे (Pune News) माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज (दि.30) पहाटे दुःखद निधन झाले. पुणे शहराने एक अनुभवी, संयमी आणि अभ्यासू लोकनेता गमावला असून राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
30 Jan 2026 11:44 AM (IST)
युक्रेन आणि रशियामधील भीषण युद्धाला (Russia Ukraine war) आता एक नवे वळण मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये एका मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान खळबळजनक दावा केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनच्या राजधानीवर, म्हणजेच कीववर आणि इतर प्रमुख शहरांवर एका आठवड्यासाठी हल्ले न करण्याची विनंती केली आहे आणि पुतिन यांनी ती विनंती मान्य केली आहे.
30 Jan 2026 11:34 AM (IST)
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा अवस्थी कायदेशीर अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने तिच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. ३०० कोटी रुपये देण्याच्या बहाण्याने तिने ११.५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. व्यावसायिकाने पंत नगर पोलिस ठाण्यात आकांक्षा आणि तिचा पती विवेक सिन्हा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
30 Jan 2026 11:24 AM (IST)
२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्यातील वाद हा बराच चर्चेचा विषय होता. त्यांच्यात जवळपास तीन आठवडे स्थळावरून वाद सुरू होता. बांगलादेशने त्यांचे विश्वचषक सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी केली. भारत त्यांच्या गट टप्प्यातील चार सामने आयोजित करणार होता. सुरक्षेच्या कारणास्तव, बांगलादेशने त्यांचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्याची मागणी केली. मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून काढून टाकल्यानंतर हा वाद सुरू झाला. आता, बांगलादेश टी-२० विश्वचषकाचा भाग नाही.
30 Jan 2026 11:14 AM (IST)
आज ३० जानेवारी! कॅलेंडरवरची ही तारीख भारतीय इतिहासातील सर्वात दुःखद आणि तितकीच महत्त्वाची मानली जाते. आजचा दिवस संपूर्ण देश ‘हुतात्मा दिन’ (Shaheed Diwas) म्हणून साजरा करतो. आजच्याच दिवशी १९४८ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थना सभेला जात असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गांधीजींच्या अहिंसेच्या प्रवासाचा हा शेवट असला, तरी त्यांच्या विचारांची ज्योत आजही अखंड तेवत आहे.
30 Jan 2026 10:58 AM (IST)
गुरुवारी रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान मुंबई क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी मास्क घालून खळबळ उडवून दिली. मुंबई संघ एमसीए-बीकेसी मैदानावर दिल्लीविरुद्ध खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी, मुंबई संघाचे काही खेळाडू मैदानावर उतरताना तोंडावर मास्क घालून खेळताना दिसले. सामन्याच्या तिसऱ्या सत्रात मुंबईचे प्रमुख खेळाडू सरफराज खान, भारतीय संघाबाहेर असलेला फलंदाज, त्याचा भाऊ मुशीर खान आणि फिरकी गोलंदाज हिमांशू सिंग हे मास्क घालून खेळताना दिसले, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
30 Jan 2026 10:54 AM (IST)
टेकं कंपनी वीवोने पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवण्याची तयारी केली आहे. कंपनीने Vivo Y31d नावाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंबोडिया आणि वियतनामसह काही निवडक ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6s 4G Gen 2 चिपसेट पाहायला मिळत आहे. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये केवळ 4G नेटवर्क सपोर्ट दिला आहे. यासोबतच कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 16 वर बेस्ड OriginOS 6 आहे. ड्यूरेबिलिटीसाठी या फोनमध्ये IP69+ रेटिंग दिला आहे.
30 Jan 2026 10:47 AM (IST)
युक्रेन आणि रशियामधील भीषण युद्धाला (Russia Ukraine war) आता एक नवे वळण मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये एका मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान खळबळजनक दावा केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनच्या राजधानीवर, म्हणजेच कीववर आणि इतर प्रमुख शहरांवर एका आठवड्यासाठी हल्ले न करण्याची विनंती केली आहे आणि पुतिन यांनी ती विनंती मान्य केली आहे.
30 Jan 2026 10:39 AM (IST)
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा अवस्थी कायदेशीर अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने तिच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. ३०० कोटी रुपये देण्याच्या बहाण्याने तिने ११.५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. व्यावसायिकाने पंत नगर पोलिस ठाण्यात आकांक्षा आणि तिचा पती विवेक सिन्हा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
30 Jan 2026 10:30 AM (IST)
भारतासोबत टी-२० विश्वचषक सह-यजमानपद भूषवत असूनही, श्रीलंका या वादात पूर्णपणे गप्प आहे. बांगलादेश क्रिकेट सचिव बंदुला दिसानायके यांनी अखेर या वादाबद्दल एएफपीशी संवाद साधला. ते म्हणाले, “आम्ही भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वादावर भाष्य करत नाही कारण सर्व देशांचे आमच्याशी चांगले संबंध आहेत.” दिसानायके यांनी असेही सांगितले की ते भविष्यात वेगवेगळ्या संघांमधील सामने आयोजित करण्यास तयार आहेत.
30 Jan 2026 10:21 AM (IST)
टेक कंपनी सॅमसंग भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन Galaxy A07 5G या नावाने लाँच केला जाणार असून, त्याचे काही फीचर्स देखील जाहीर करण्यात आले आहेत. मात्र अद्याप कंपनीने या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल कोणतीही घोषणा केली नाही. हा आगामी स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला जाणार आहे. तसेच याचे फीचर्स देखील अतिशय दमदार आहेत. त्यामुळे बजेट सेगमेंटमध्ये स्मार्टफोन शोधणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सॅमसंगचा आगामी स्मार्टफोन ए-सीरीजमधील एक बजेट डिव्हाईस आहे. या फोनमध्ये मोठी बॅटरी आणि डिस्प्लेसह 50 मेगापिक्सेलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप ऑफर केला जाणार आहे.
30 Jan 2026 10:13 AM (IST)
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने WPL 2026 च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. प्लेऑफसाठी आधीच पात्र ठरलेल्या RCB ने लीग स्टेजच्या 18 व्या सामन्यात UP वॉरियर्सचा 8 विकेट्सने पराभव करून त्यांचा सहावा विजय नोंदवला. या विजयाने RCB चे अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. आता, उर्वरित दोन प्लेऑफ स्थानांसाठी चार संघांमध्ये लढाई सुरू आहे. WPL मध्ये, एकूण तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतात. टेबल टॉपरला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ एलिमिनेटरमध्ये खेळतात.
30 Jan 2026 10:05 AM (IST)
गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही देशांत युद्ध अद्यापही सुरुच आहे. त्यातच आता युक्रेनियन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांदरम्यान रशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांना शांतता चर्चेसाठी मॉस्कोला आमंत्रित केले आहे.
30 Jan 2026 09:55 AM (IST)
पीडितेचा विवाह ११ जून २०२३ रोजी असद अय्युब खान (वय 28, रा. सैलाबनगर, नांदेड) यांच्याशी झाला होता. विवाहनंतर सुरुवातीला दोन ते तीन महिने सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली होती. मात्र त्यांनतर पती असद आणि सासरे अय्युब यांनी हुंड्याचे उरलेले पाच लाख रुपये माहेरून आणण्याची मागणी सुरू केली.
30 Jan 2026 09:45 AM (IST)
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ने साधारणता दररोज दहा ते अकरा लाख प्रवासी प्रवास करतात.यात मोबाईल ॲप,आणि स्कॅनरच्या माध्यमातून दररोज १ लाख १० हजार प्रवाशी ऑनलाईन तिकिट काढत आहेत. यावरून ऑनलाईन तिकिट काढण्याचा प्रवाशांचा कल हा वाढलेला दिसून येतो.
30 Jan 2026 09:35 AM (IST)
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला. या मालिकेचा पहिला विजय पाकिस्तानच्या नावावर झाला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिकेचा पहिला सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम येथे हा सामना खेळवण्यात आला. मालिकेतील पहिला सामना २९ जानेवारी रोजी खेळवण्यात आला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने हा सामना २२ धावांनी जिंकला. या सामन्यात केकेआरचा २५.२ कोटींचा खेळाडू अपयशी ठरला.
30 Jan 2026 09:25 AM (IST)
सोशल मीडियावरुन अल्पवयीन मुलीचे फोटो कॉपी केल्यानंतर ते एडीट करुन बदनामी करण्यात आली. त्यानंतर मुलीचा हात पकडून ‘तू माझ्याशी लग्न न केल्यास, तुला कोणाची होऊ देणार नाही. माझ्यासोबत लग्न नाही केलस तर मारुन टाकीन’ अशी धमकी देण्यात आली. अरबाज (रा. चेलीपुरा) असे तरुणीचा विनयभंग करुन धमकी देणाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Marathi Breaking News Updates : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. असे असतानाच, अजित पवारांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासमोर नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात या गटाची दिशा, निर्णयप्रक्रिया आणि राजकीय रणनीती काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले होते. निवडणूक आयोगाने दिवंगत अजित पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह देऊ केले होते. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आमची वाटचाल असेल, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बारामती येथे केले.