Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं; अनेक ठिकाणी पाणीच पाणी

Marathi Breaking Live Marathi : कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 19, 2025 | 08:25 PM
Top Marathi News Today : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं; अनेक ठिकाणी पाणीच पाणी

Top Marathi News Today : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं; अनेक ठिकाणी पाणीच पाणी

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Live Updates : पुण्यासह परिसरात गुरुवारी (दि.19) पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचेही दिसून आले आहे. भारतीय हवामान विभागानेही पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, आता हा पाऊस होताना दिसत आहे.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि कोकण प्रदेशात तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असल्याचं घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

The liveblog has ended.
  • 19 Jun 2025 05:51 PM (IST)

    19 Jun 2025 05:51 PM (IST)

    Raigad Rain News: रायगडमध्ये पावसाचा कहर; पुढील काही तासांत...; शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर

    रायगड: आज सकाळपासूनच राज्यभरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. रायगडमधील काही नद्यांनी धोका पातळी गाठली आहे. नागोठणे बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याची माहिती समोर येत आहे. तर रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • 19 Jun 2025 05:31 PM (IST)

    19 Jun 2025 05:31 PM (IST)

    इराण-इस्रायल तणावामुळे शेअर बाजार तिसऱ्या दिवशीही कमकुवत, सेन्सेक्स ८३ अंकांनी घसरला, निफ्टी २४,७९३ वर बंद

    गुरुवारी शेअर बाजार चढ-उतारातच राहिला. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स ८३ अंकांनी घसरून बंद झाला. निफ्टी-५० देखील १९ अंकांनी कमकुवत झाला. गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आणि त्यांचे डोळे इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावावर, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या प्रत्युत्तरात्मक शुल्काची अंतिम मुदत यावर स्थिर राहिले.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 19 Jun 2025 05:20 PM (IST)

    19 Jun 2025 05:20 PM (IST)

    सिवूडयेथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेचा कोसळला स्लॅप

    सिवूडमध्ये शाळा क्रं 30 भूखंड क्रं 8 येथे नवीन शाळेची इमारत बांधून तयार होती.   गावातील महानगरपालिका शाळा क्र 6 या शाळेचे वर्ग स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यातील 6 वी वर्ग अ चा स्लॅपचा काही भाग कोसळला असून शिक्षिकेस किरकोळ दुःखापत झाली आहे. यात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नसून विद्यार्थी थोड़क्यात बचावले आहेत.

  • 19 Jun 2025 04:26 PM (IST)

    19 Jun 2025 04:26 PM (IST)

    त्यांची शिवसेना आता राहिलेली नाही, त्यांचे दुकान आता बंद झालंय : नारायण राणे

    ओरिजनल शिवसेना कायदेशीरदृष्ट्या एकनाथ शिंदेकडे गेली आहे. त्यांची शिवसेना आता राहिलेली नाही, त्यांचे दुकान बंद झालेले आहे. बाळासाहेब ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यांंनी पद आणि पैशासाठी कधीही तडजोड केलेली नाही. पण, या लोकांनी पदासाठी तडजोड केली. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची विचारधाराही सांभाळली नाही. आजही ते सांभाळत नाही. शिवसेना तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे, त्यामुळे त्यांचा कसला वर्धापनदिन. मी एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे प्रमुख म्हणून वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन करतो, अशी कडवट टीका खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

  • 19 Jun 2025 04:01 PM (IST)

    19 Jun 2025 04:01 PM (IST)

    नेरळ येथील दगडी शाळेसमोर साचलं पाणी;अंगणवाडी आणि उर्दु शाळेतील विद्यार्थ्यांची कसरत

    नेरळ गावात असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेच्या समोर असलेल्या पटांगणात पाण्याचे डबके साचले आहे.या दगडी शाळेच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाळेच्या आवारात दोन अंगणवाड्या असून त्या ठिकाणी येणारं लहान बालके यांना देखील त्या डबक्यातील पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

  • 19 Jun 2025 03:58 PM (IST)

    19 Jun 2025 03:58 PM (IST)

    अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

    १२ जून रोजी अहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत २४१ पैकी २४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी सुखरूप बचावला आहे. आता या घटनेनंतर एअर इंडियाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया कंपनी जुलै महिन्याच्या मध्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानांच्या उड्डाणामध्ये १५ टक्के कपात करणार आहे.

  • 19 Jun 2025 03:37 PM (IST)

    19 Jun 2025 03:37 PM (IST)

    २१ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या, तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी

    मुंबईतील प्रसिद्ध साठ्ये कॉलेजमध्ये एका विद्यार्थींनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साठ्ये कॉलेज हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले परिसरात आहे. गुरुवारी सकाळी या मुलीने साठ्ये महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

  • 19 Jun 2025 03:36 PM (IST)

    19 Jun 2025 03:36 PM (IST)

    चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून; मुलांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न

    पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत पतीने मध्यरात्री पत्नीवर कुऱ्हाडीच्या धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. दरम्यान, पत्नीला मारहाण करताना आईला वाचवण्यासाठी आलेल्या दोन मुलांवरही वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 19 Jun 2025 03:06 PM (IST)

    19 Jun 2025 03:06 PM (IST)

    खडकवासला धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, पुण्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

    पुण्यात पावसाचा जोर वाढला असून खडवासला धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून 2000 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठी सायरन वाजवून नदीपात्रात येऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे.

  • 19 Jun 2025 02:45 PM (IST)

    19 Jun 2025 02:45 PM (IST)

    ईव्ही पेक्षा सीएनजीला पसंती! नोमुराच्या अहवालात धक्कादायक खुलासा

    जागतिक गुंतवणूक बँक नोमुराने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अलीकडील अहवालात म्हटले आहे की, भारतातील ऑटो इंधन म्हणून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) वाढत राहू शकतो, जरी प्रमुख राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा (ईव्ही) वापर वाढत असला तरी. एएनआयच्या वृत्तानुसार, नोमुराने अहवालात म्हटले आहे की, वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकारे, विशेषतः दिल्ली आणि मुंबई, आक्रमक ईव्ही धोरणे लागू करतील अशी अपेक्षा आहे. यामुळे सीएनजीच्या वाढीवर काही दबाव येऊ शकतो, परंतु विश्लेषकांचा असा विश्वास आहे की येत्या काही वर्षांत दोन्ही प्रकारचे इंधन एकत्र राहू शकतात.

  • 19 Jun 2025 02:44 PM (IST)

    19 Jun 2025 02:44 PM (IST)

    इंग्लंडविरुद्ध मालिकेत भारतीय संघाला दिलासा! भारत-इंग्लंड स्पर्धेत अँडरसनचे नाव नाही

    20 जूनपासून भारत आणि इंग्लंड या दोन संघात पाच सामन्याची कसोटी मालिका सुरू होणार आहे. अशातच  शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील तुलनेने अल्प अनुभवी भारतीय फलंदाजी क्रमाला इंग्लंड संघात जेम्स अँडरसनचे नाव नसताना दिलासा मिळाला. कारण हा वेगवान गोलंदाज गेल्या दोन दशकांपासून भारत-इंग्लंड स्पर्धेत सतत सहभागी होत आला आहे. 2006 मध्ये अँडरसनच्या भारताविरुद्धच्या पहिल्या मालिकेपासून ते 2024 मध्ये त्याच्या शेवटच्या मालिकेपर्यंत, या महान वेगवान गोलंदाजाने नेहमीच भारतीय फलंदाजांना त्रास दिला आहे. 2000 च्या दशकाच्या उत्तरार्धात महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी त्याची टक्कर असो किंवा गेल्या दशकात विराट कोहलीशी झालेली अधिक रोमांचक स्पर्धा असो, या सर्व आठवणी लोकांच्या मनात ताज्या आहेत. कोहली आणि अँडरसन दोघेही आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

  • 19 Jun 2025 02:44 PM (IST)

    19 Jun 2025 02:44 PM (IST)

    हैदराबाद आणि दिल्लीत ‘या’ कारणांमुळे फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग

    नवी दिल्ली आणि हैद्राबादमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सकाळच्या सुमारास दिल्लीतून आणि हादरबाडवरून दोन विमानांनी टेक ऑफ केले होते. मात्र काही कारणांमुळे या दोन्ही विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या दोन्ही विमानातून सुमारे २६० प्रवासी प्रवास करत होते. दिल्ली एअरपोर्टवरून लेहला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे समजते आहे.

  • 19 Jun 2025 02:43 PM (IST)

    19 Jun 2025 02:43 PM (IST)

    त्वचेच्या असंख्य समस्यांपासून आराम मिळवून देईल तांदूळ तुरटीचा फेसमास्क

    वर्षाच्या बाराही महिने त्वचा आणि केसांसंबधीत समस्या उद्भवू लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर टॅन वाढते तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जाते. याशिवाय हिवळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज वाटू लागते. प्रत्येक ऋतूंमध्ये त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक कारणामुळे त्वचेवर रॅशेज, जळजळ, पिगमेंटेशन आणि टॅनिंग इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेवर पिंपल्स किंवा रॅश आल्यानंतर त्वचा निस्तेज आणि खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता हळूहळू खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेच्या असंख्य समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तांदूळ तुरटीचा फेसमास्क बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • 19 Jun 2025 02:42 PM (IST)

    19 Jun 2025 02:42 PM (IST)

    दत्तसंप्रदयाची निर्मिती कशी झाली ?

    संपूर्ण सृष्टीचे पालहान म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि महेश असल्याचं हिंदू धर्मात सांगितलं जातं. ब्रम्हा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार म्हणजे श्री दत्तगुरु होय. हिंदू धर्मातील दत्त संप्रदाय अत्यंत मोठा आहे. नवनाथ देखील श्रीदत्तगुरुंचाच अंश असल्याचं म्हटलं जातं. गुरुदेव दत्तांना मानणारा भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याच दत्तगुरुंचा कसे अतरले याबाबत आख्यायिका सांगितली जाते ती जाणून घेऊयात.

  • 19 Jun 2025 02:25 PM (IST)

    19 Jun 2025 02:25 PM (IST)

    किती टेपा मारता राव ! Skoda Kylaq चा दावा 19.05kpl मायलेजचा

    भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यात ग्राहकांकडून सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना मिळते. हीच डिमांड पाहता, अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये अनेक उत्तम आणि हाय परफॉर्मन्स एसयूव्ही ऑफर करत असतात. Skoda ने देखील मार्केटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. सध्या मार्केटमध्ये कंपनीच्या Kylaq एसयूव्हीला दमदार मागणी मिळताना दिसत आहे. तसेच कंपनीने या कारच्या मायलेजबाबत काही महत्वाचे दावे केले होते. Kylaq ने दावा केला होता की MT व्हेरिएंटचा मायलेज 19.05 किलोमीटर प्रति लिटर तर AT व्हेरिएंटचा मायलेज19.68 किलोमीटर प्रति लिटर आहे.

  • 19 Jun 2025 02:19 PM (IST)

    19 Jun 2025 02:19 PM (IST)

    Amazon भारतात करणार २,००० कोटींची मोठी गुंतवणूक! फ्लिपकार्ट, जिओमार्ट, टाटाला देईल टक्कर

    जगातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी Amazon ने भारतात आपला व्यवसाय आणखी मजबूत करण्यासाठी २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५ मध्ये भारतातील विविध शहरांमध्ये कंपनीच्या डिलिव्हरी, वेअरहाऊस आणि सॉर्टिंग सेंटरचा विस्तार आणि सुधारणा करण्यासाठी हे पैसे खर्च केले जातील. याद्वारे, Amazon केवळ त्यांची डिलिव्हरी जलद आणि सुरक्षित करणार नाही तर त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि डिलिव्हरी भागीदारांसाठी कामाच्या परिस्थितीतही सुधारणा करेल.

  • 19 Jun 2025 02:19 PM (IST)

    19 Jun 2025 02:19 PM (IST)

    हेडिंग्ले कसोटी पावसामुळे वाया जाईल का? पाचही दिवस पावसाची शक्यता

    भारत विरुद्ध इंग्लड हवामानाचा अहवाल : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात 20 जून पासून होणार आहे. यासाठी टीम इंडिया हे इंग्लंडला कसून मेहनत करत आहे. बीसीसी आणि अनेक सरावाचे फोटोज त्याचबरोबर सराव सामन्यांचे देखील आयोजन केले होते. भारताचे अनेक युवा खेळाडू आहे पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट इंग्लंडमध्ये खेळताना दिसणार आहेत त्यामुळे भारतीय खेळाडू हे आयपीएल संपल्यानंतर लगेचच इंग्लंडला रवाना झाले होते. पहिल्या सामन्यांमध्ये लीड्समधील हवामान कसे असणार आहे त्यासंदर्भात सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत हवामानाचा परिणाम हा नक्कीच खेळपट्टीवर देखील होतो.

  • 19 Jun 2025 02:14 PM (IST)

    19 Jun 2025 02:14 PM (IST)

    बच्चू कडूंच्या जिल्हा बँक अपात्रतेची 24 जूनला पुढील सुनावणी

    बच्चू कडूंच्या जिल्हा बँक अपात्रतेची 24 जूनला पुढील सुनावणी असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आजची सुनावणी पूर्ण झाली. बच्चू कडूंना विभागीय सबनिबंधकांनी अपात्र केल्याचे प्रकरण आहे.

  • 19 Jun 2025 01:55 PM (IST)

    19 Jun 2025 01:55 PM (IST)

    इस्रायलचा इराणच्या अणुभट्टीवर तीव्र हल्ला

    सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्ध अधिक पेटले आहे. नुकतेच इस्रायलने इराणच्या अणु भट्टीवर तीव्र हल्ला केला आहे. इराणमधील अरक हेवी वॉटर रिॲक्टरवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इराणचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे, मात्र अद्याप इराणकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

  • 19 Jun 2025 01:48 PM (IST)

    19 Jun 2025 01:48 PM (IST)

    वरूणराजाने जोरदार सलामी देत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला दिली साद

    राज्यामध्ये आषाढी वारीला सुरुवात झाली आहे आज (दि.19) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यामुळे आळंदी सजली असून वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये आणि राम कृष्ण माऊलीच्या गजराने अलंकापूरीमध्ये प्रसन्नमय वातावरण निर्माण झाले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. वारकऱ्यांचा मेळा आळंदीमध्ये जमा झाला असून आषाढी वारीचा मोठा उत्साह वारकऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसून येत आहे.

  • 19 Jun 2025 01:45 PM (IST)

    19 Jun 2025 01:45 PM (IST)

    मोदींची मॅक्रोन यांना कानपिचकी; इमॅन्युएल यांनीही हसून दिली दाद

    मंगळवारी कॅनडामध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी देखील सहभाग घेतला होता. भारत हा या परिषदेचा सदस्य नाही, परंतु कॅनडाचे पंतप्रधाने इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रण दिले होते. त्यांच्या आमंत्रणावरुन G7 परिषदेसाठी पंतप्रधान मोदींनी उपस्थित दर्शवली. यावेळी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची देखील भेट घेतला. यावेळी दोन्ही एकमेकांना मिठी मारली आणि विनोदही केला.

  • 19 Jun 2025 01:40 PM (IST)

    19 Jun 2025 01:40 PM (IST)

    जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा

    पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील यांच्या हस्ते इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्या हस्ते पादुकांचे पाद्य पूजन करून आरतीही झाली.

  • 19 Jun 2025 01:38 PM (IST)

    19 Jun 2025 01:38 PM (IST)

    या खेळाडूंचा टीम इंडीयाला करावा लागणार सामना

    टीम इंडिया इंग्लंडचा काही तासात सामना करणार आहे. भारताचा संघ हा शुभमन गीलच्या नेतृत्वाखाली खेळत तर इंग्लंडचा संघ हा बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यामध्ये होणाऱ्या सामनामध्ये भारतीय संघाचे प्लेइंग इलेव्हन काय असणार आहे यावर अजूनही बीसीसीआयने माहिती दिलेली नाही. सामन्याला एक दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेटने इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन शेअर केली आहे. यामध्ये अनेक अनुभवी त्याचबरोबर नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे.

  • 19 Jun 2025 01:30 PM (IST)

    19 Jun 2025 01:30 PM (IST)

    ‘Meesho ची दीपिका…’, अनन्याचा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांचा संताप

    बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन लवकरच ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सेटवरून एक फोटो लीक झाला आहे ज्यामध्ये दोघांचा लूक पाहायला मिळाला आहे. रेडिटवर हा फोटो पाहिल्यानंतर अनेक प्रकारच्या गोष्टीही बोलल्या जात आहेत. काही जण म्हणत आहेत की अनन्या पांडेचा लूक पूर्णपणे वेगळा झाला आहे, तर काही जण म्हणत आहेत की ती ‘दिशा पटानी’ सारखी कशी दिसते.

  • 19 Jun 2025 01:25 PM (IST)

    19 Jun 2025 01:25 PM (IST)

    ठाकरेंनंतर आता राणे बंधुंमध्येही फूट

    महाराष्ट्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र आमने-सामने आले आहेत. भाजप नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार निलेश राणे यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिगणी पडली आहे. याआधी निलेश राणे यांनी नितेश राणेंना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता नितेश राणे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत सल्ला दिला आहे.

  • 19 Jun 2025 01:10 PM (IST)

    19 Jun 2025 01:10 PM (IST)

    दोन शिवसेनेचे दोन वर्धापन मेळावे

    राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर पालिका आणि जिल्हापरिषदेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मागील 25 वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. ती कायम ठेवण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट प्रयत्नशील आहेत. शिवसेना आज वर्धापन दिन आहे. दोन्ही गटाकडून वेगवेगळे वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 19 Jun 2025 01:05 PM (IST)

    19 Jun 2025 01:05 PM (IST)

    वारकऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेचे महत्त्वपूर्ण पाऊल

    पालखी सोहळा २०२५ दरम्यान आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा विशेष ई-‘टॉयलेट सेवा’ नावाच्या मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. आषाढी वारी मार्गावर विविध ठिकाणी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आली आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर १ हजार ८०० शौचालये, श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर १ हजार २०० शौचालये, श्री संत सोपान महाराज पालखी मार्गावर ३०० शौचालये उभारण्यात आली आहेत.

  • 19 Jun 2025 12:58 PM (IST)

    19 Jun 2025 12:58 PM (IST)

    इराणवर राज्य करू शकतात राजघराण्यातील ‘या’ 3 कन्या

    इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील सत्तास्थिती ढासळताना दिसत आहे. देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची सत्ता धोक्यात आली असून, आता जगभरात एकच प्रश्न चर्चेत आहे.  यांच्यानंतर इराणवर कोण राज्य करणार? या प्रश्नाचे संभाव्य उत्तर म्हणजे इराणच्या माजी शाह रेझा पहलवी यांच्या तीन कन्या, ज्या सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • 19 Jun 2025 12:52 PM (IST)

    19 Jun 2025 12:52 PM (IST)

    शिवसेनेने व्यंगचित्रातून ठाकरे गटाची उडवली खिल्ली

    शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षांकडून आज (19 जून) वर्धापन दिन साजरा केला जात आहे. याचदरम्यान, शिवसेनेचा आजचा ५९ वा वर्धापन दिन भव्य मेळावा वरळीतील एनएससीआय डोम येथे पार पडणार आहे. तर, ठाकरे गटही आज वर्धापन दिन साजरा करत असल्याचे समजते आहे. याचीच शिवसेनेने व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे.

  • 19 Jun 2025 12:45 PM (IST)

    19 Jun 2025 12:45 PM (IST)

    फेडच्या निर्णयामुळे अमेरिका आणि आशियातील बाजारपेठा विखुरल्या

    अमेरिकन फेडने बुधवारी पॉलिसी रेटबाबत मोठा निर्णय घेतला आणि व्याजदर स्थिर ठेवले. दोन दिवसांच्या अमेरिकन सेंट्रल बँकेच्या बैठकीनंतर फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. कमकुवत आर्थिक वाढ, बेरोजगारी आणि जलद किमती वाढ या आव्हानात्मक परिस्थितीमुळे दर कमी करता येणार नाहीत असे त्यांनी सांगितले. म्हणजेच फेडचा बेंचमार्क रात्रभरचा दर ४.२५%-४.५०% वर स्थिर आहे.

  • 19 Jun 2025 12:42 PM (IST)

    19 Jun 2025 12:42 PM (IST)

    रायगड, पुण्यात पावसाचा जोर वाढला, रायगडला रेड अलर्ट

    रायगड, पुण्यात पावसाचा जोर वाढला असून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • 19 Jun 2025 12:39 PM (IST)

    19 Jun 2025 12:39 PM (IST)

    AI मुळे झाली महिला गरोदर, सॉलिड टेक्नॉलॉजी

    कोलंबिया विद्यापीठात तयार केलेल्या AI आधारित प्रजनन उपकरणाने आश्चर्यकारक काम केले असल्याचे आता समोर येत आहे.  न्यूयॉर्कमधील एका जोडप्याची कहाणी आज जगभरात चर्चेचा विषय ठरते आहे. सुमारे 20 वर्षे बाळासाठी संघर्ष केल्यानंतर, त्यांना अखेर आनंदाची बातमी मिळाली आहे.

  • 19 Jun 2025 12:29 PM (IST)

    19 Jun 2025 12:29 PM (IST)

    ऑस्ट्रेलियन दिग्गज अ‍ॅडम गिलख्रिस्टने केली भविष्यवाणी

    आता क्रिकेटमधील महान यष्टीरक्षक-फलंदाजांपैकी एक असलेल्या अ‍ॅडम गिलख्रिस्टने तरुण भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वालचे कौतुक केले आहे. त्याने या तरुणाचे वर्णन भारताचा पुढचा मोठा सुपरस्टार म्हणून केले आहे. वाचा सविस्तर

  • 19 Jun 2025 12:16 PM (IST)

    19 Jun 2025 12:16 PM (IST)

    Karan Veer Mehra पुढच्या प्रोजेक्टसाठी सज्ज!

    बिग बॉस १८ चा विजेता करण वीर मेहरा बऱ्याच काळापासून पडद्यावरून गायब आहे. तो शेवटचा रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी १४ आणि सलमान खानच्या रिॲलिटी शोमध्ये दिसला होता. चाहते त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, करणवीरने चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची झलक दाखवली आहे, ज्यामुळे अभिनेत्याला आणखी आनंद झाला आहे. करणवीर मेहराने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि सांगितले आहे की त्याने पडद्यावर परतण्याची तयारी सुरू केली आहे.

  • 19 Jun 2025 12:10 PM (IST)

    19 Jun 2025 12:10 PM (IST)

    सुरूरकडून वाईकडे जाताय? तर थांबा…!

    रस्ता व पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाई-सुरूर रस्त्यावरील सुरूरकडून वाईकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे. सुरूर ते वाई राज्यमार्गावरील रस्त्याचे व पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस, तसेच रस्त्याचे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे १८ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे बाजूकडून येणाऱ्या वाहनांनी सुरूरमार्गे न जाता पाचवडमार्गे वाईकडे जायचे आहे. महाबळेश्वरवरून पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाई ते सुरूर रस्ता हा एकेरी वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.

  • 19 Jun 2025 12:02 PM (IST)

    19 Jun 2025 12:02 PM (IST)

    CSIS अहवालातून धक्कादायक उघड!

    खलिस्तानी चळवळीला ‘अतिरेकी’ स्वरूपात संबोधून त्यांना PMVE (Politically Motivated Violent Extremists) अर्थात राजकीय प्रेरित हिंसक अतिरेकी गटात वर्गीकृत करण्यात आले आहे. हे विधान भारतासाठी मोठे राजनैतिक यश मानले जात आहे, कारण नवी दिल्लीने अनेक वेळा कॅनडावर असा आरोप केला आहे की, खलिस्तान समर्थकांना तिथे मोकळे मैदान मिळते. वाचा सविस्तर

  • 19 Jun 2025 11:43 AM (IST)

    19 Jun 2025 11:43 AM (IST)

    मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

    मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. गोंदे फाटा येथे वाहतूक कोंडी झालीय एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला महामार्ग पोलिस केंद्र घोटीचे कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

  • 19 Jun 2025 11:28 AM (IST)

    19 Jun 2025 11:28 AM (IST)

    डोंबिवलीत रोशनी सोनघरेला अखेरचा निरोप

    12 जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीची रहिवासी असलेली 27 वर्षीय हवाई सुंदरी रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • 19 Jun 2025 11:24 AM (IST)

    19 Jun 2025 11:24 AM (IST)

    माऊलींच्या पालखी सोहळा प्रस्थान वेळेत बदल

    आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याच्या प्रस्थान वेशत वेळेत बदल करण्यात आला असून रात्री ८ वाजता पालखी प्रस्थान ठेवण्यात येणार आहे. प्रस्थान गुरुवारच्या दिवशी आल्याने आषाढी वारीचे पालखी सोहळा संजीवन समाधी मंदिरात रंगणार असून रात्री ८ वाजता माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान करेल.

  • 19 Jun 2025 10:58 AM (IST)

    19 Jun 2025 10:58 AM (IST)

    पावसाचा जोर वाढला, शाळांना सुट्ट्या

    पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रायगड जिल्हामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आहे. हवामान खात्याच्या आतीवृष्टीच्या इशाऱ्यानंतर रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा सोडण्यात आल्या तर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली.

  • 19 Jun 2025 10:48 AM (IST)

    19 Jun 2025 10:48 AM (IST)

    वारकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

    आळंदीमधून आज संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे प्रस्थान होईल. मात्र सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. जाधववाडी ल पा तलाव 94.53% इतका भरलेला आहे. हा तलाव द्वारविरहित असल्याने पाऊस व धरणातील येणाऱ्या पाण्यामुळे हा तलाव ओव्हर प्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंद्रायमी काठी असलेल्या मौजे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू - आळंदी ते तुळापूर पर्यंतच्या सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत वारकऱ्यांना देकील सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • 19 Jun 2025 10:45 AM (IST)

    19 Jun 2025 10:45 AM (IST)

    राष्ट्रपतींनी दिला बहुमोल संदेश

    १९ जून रोजी ‘जागतिक सिकलसेल जागरूकता दिन’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातील ग्रामपंचायत तालुनच्या क्रीडा स्टेडियममध्ये भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांच्यासह अनेक मंत्री व वरिष्ठ लोकप्रतिनिधी सहभागी होत आहेत.

  • 19 Jun 2025 10:23 AM (IST)

    19 Jun 2025 10:23 AM (IST)

    BSNL ची आता दादागिरी, 5G नावाची घोषणा

    बीएसएनएलने आपली ५जी सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. कंपनीने सेवेचे नाव देखील जाहीर केले आहे. आता बीएसएनएलची 5G सेवा Q-5G म्हणून ओळखली जाईल, ज्याचे पूर्ण नाव Quantum 5G आहे. 

  • 19 Jun 2025 09:52 AM (IST)

    19 Jun 2025 09:52 AM (IST)

    गोंदिया हादरला! जादूटोणाच्या संशयावरून 60 वर्षीय वृद्धाची हत्या

    गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एका ६० वर्षीय वृद्धाची जादूटोण्याच्या संशयावरून धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा /हेटी येथे उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव आसाराम देऊ कांबळे (60) असे आहे. ते जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले असतांना त्यांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जादूटोण्याच्या संशयातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

  • 19 Jun 2025 09:52 AM (IST)

    19 Jun 2025 09:52 AM (IST)

    मुकेश कुमार कोच गौतम गंभीरवर नाराज?

    मुकेश कुमार बऱ्याच काळापासून कसोटी संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होता, पण यावेळीही त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान देण्यात आले नाही. आता इंग्लंडहून परतल्यानंतर मुकेश कुमारची इंस्टाग्राम स्टोरी समोर आली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की “कर्माला वेळ लागतो आणि तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागते. कर्माला क्षमा मिळत नाही, तो त्याचा बदला घेतो.” काही सोशल मीडिया वापरकर्ते त्याच्या या पोस्टला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरशी जोडत आहेत.

  • 19 Jun 2025 09:05 AM (IST)

    19 Jun 2025 09:05 AM (IST)

    आत्तापर्यंत केवळ 25 टक्के वाहनांवरच लागल्या HSRP नंबर प्लेट्स

    दुचाकी आणि चारचाकी वाहनाला नवीन म्हणजे एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. राज्य परिवहन विभागाने वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी यापूर्वी 31 मार्च 2025 ही तारीख दिली होती. त्यानंतर वेळोवेळी ही मुदत वाढवण्यात आली. असे असताना आता नवी मुदत 30 जून असूनही, राज्यात केवळ 25 टक्के वाहनांनाच एचएसआरपी नंबर प्लेट असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Marathi breaking news and today live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • Marathi News
  • navarashtra news update

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.