• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Marathi Breaking News Today Live Updates 12 June

Top Marathi News Today: अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात; एअर इंडियाचे AI 171 विमान अपघातग्रस्त

Marathi Breaking Live Marathi Headlines Update 12th June : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत राहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 12, 2025 | 07:59 PM
Top Marathi News Today Live : महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभरात काढले जाणार मशाल मोर्चे

Top Marathi News Today Live : महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभरात काढले जाणार मशाल मोर्चे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Marathi Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजप-युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून, या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून, लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस गुरुवारी राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे.

The liveblog has ended.
  • 12 Jun 2025 07:26 PM (IST)

    12 Jun 2025 07:26 PM (IST)

    अहमदाबाद दुर्घटनेत दहशतवादी हल्ल्याचा संशय? आर्मी अलर्ट तर ATS घटनास्थळी दाखल

    अहमदाबाद: आज अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईन विमान मेघानीनगर भागात कोसळले. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बीजे मेडिकल हॉस्टेलवर कोसळले. या विमानातील 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. त्यातच यह अपघात होता की घातपात अशी चर्चा सुरू झाली आहे. हा विमान अपघात लष्करी कॅन्टोन्मेंटच्या जवळपास घडल्याचे म्हटले जात आहे.

  • 12 Jun 2025 07:10 PM (IST)

    12 Jun 2025 07:10 PM (IST)

    WTC Final साऊथ आफ्रिकेचा डाव १३८ धावांवर समाप्त; पॅट कमिन्सचे ६ बळी, कांगारूकडे ७४ धावांची आघाडी..

    WTC Final : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना खेळला जात आहे.  पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा करू शकला.  साऊथ आफ्रिकेचा वेगवान रबाडाने अंतिम सामन्यात ५ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले.  पहिल्या दिवशीच साऊथ आफ्रिका फलंदाजीसाठी मैदानात आली होती. आता साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. आता ऑस्ट्रेलियाकडे ७४ धावांची आघाडी आहे.

  • 12 Jun 2025 06:55 PM (IST)

    12 Jun 2025 06:55 PM (IST)

    वारकऱ्यांसाठी खुशखबर! 'आषाढी एकादशी'साठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; कुठून सुटणार जादा गाड्या?

    पंढरपूर:  पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे चार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामुळे वारकऱ्यांची सोय होणार आहे. दरवर्षी मिरज रेल्वे स्थानकावरुन आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूरला जात असतात. या काळात रेल्वेच्या जादा गाड्यांची मागणी होत असते. त्यानुसार जादा गाड्यांना हिरवा कंदिल दाखविला आहे.

  • 12 Jun 2025 06:43 PM (IST)

    12 Jun 2025 06:43 PM (IST)

    उड्डाणानंतर अवघ्या सात मिनिटांत विमानाचा स्फोट; भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

    Viral News Marathi: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, तर कधी आश्चर्यकारक व्हिडिओ देखील सोशल मीडिया व्हायरल होत असतात. शिवाय अपघातांचे काही भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या नुकत्याच अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान अपघाताचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या भयावह दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 12 Jun 2025 06:27 PM (IST)

    12 Jun 2025 06:27 PM (IST)

    Ahmedabad Plane Crash: हृदयद्रावक! अहमदाबाद विमान दुर्घटनेत सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

    अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. हे प्रवासी विमान मेघानीनगर या रहिवाशी परिसरात कोसळले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांनी याबाबतची माहिती एका वृत्तसंस्थेला दिली आहे. सर्वच्या सर्व प्रवासी यांच्या मृत्यू झाला आहे.

  • 12 Jun 2025 05:37 PM (IST)

    12 Jun 2025 05:37 PM (IST)

    Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद प्लेन क्रॅश दुर्घटनेवर PM नरेंद्र मोदीचे ट्वीट

    अहमदाबादमधील अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. ते म्हणतात की अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेने आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना इतकी हृदयद्रावक आहे की जी शब्दांत सांगता येत आहे. या कठीण प्रसंगी यामध्ये प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आहेत. या घटनेत प्रभावित झालेल्या बंधितांना मदत करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे.

     

  • 12 Jun 2025 05:36 PM (IST)

    12 Jun 2025 05:36 PM (IST)

    Ahmedabad Plane Crash: अहमदाबादच्या विमान दुर्घटनेवर ब्रिटनच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया

    गुजरातमध्ये एक भीषण घटना घडली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे AI-171 विमानाचा अपघात झाला आहे. हे विमान अहमदाबाहून क्रू मेंबर्ससह २४२ प्रवाशांना घेऊन लंडनाला निघाले होते. यावेळी उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानाचा अपघात झाला. सध्य बचावकार्य सुरु आहे. याच वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या विमानात ब्रिटनच्या नागरिकांचाही समावेश होता.

    कीर स्टारमर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, ” ब्रिटिश नागरिकांना घेऊन लंडनला घेऊन जाणाऱ्या विमानाचा भारतातील अहमदाबाद येथे अपघात झाला. या दुर्दैवी अपघाताची दृश्ये धक्कादायक आहेत. मी संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून वेळेवेळी परिस्थितीची माहिती घेत आहे. अशा दुःखद प्रसंगी विमानातील प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत मी उभा आहे.

    The scenes emerging of a London-bound plane carrying many British nationals crashing in the Indian city of Ahmedabad are devastating.

    I am being kept updated as the situation develops, and my thoughts are with the passengers and their families at this deeply distressing time.

    — Keir Starmer (@Keir_Starmer) June 12, 2025

  • 12 Jun 2025 05:15 PM (IST)

    12 Jun 2025 05:15 PM (IST)

    भारतीय नौदलाने कॅडेट एंट्री योजनेसाठी अधिसूचना केली जाहीर

    भारतीय नौदलाने 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री योजनेअंतर्गत जानेवारी 2026 सत्रासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही योजना कायमस्वरूपी आयोग (Permanent Commission) मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. या अंतर्गत कार्यकारी व तांत्रिक (Executive & Technical) शाखांमध्ये निवड होणार आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 12 Jun 2025 05:09 PM (IST)

    12 Jun 2025 05:09 PM (IST)

    मिचेल स्टार्कने रचला इतिहास; मोहम्मद शमीचा विक्रम मोडून दिला मोठा झटका..

    : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या दिवशी स्टिव स्मिथ आणि ब्यू वेबस्टर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सर्वबाद २१२ धावा करू शकला. साऊथ आफ्रिकेचा वेगवान रबाडाने अंतिम सामन्यात ५ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले. सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशीच साऊथ आफ्रिकेवर फलंदाजी करण्याची वेळ आली. आता साऊथ आफ्रिका फलंदाजी करत आहे. त्यांचे ५ फलंदाज माघारी गेले आहेत. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीच्या एका विक्रमाला मागे टाकले आहे.

  • 12 Jun 2025 04:45 PM (IST)

    12 Jun 2025 04:45 PM (IST)

    'प्रत्येक सेकंद, प्रत्येक जीव महत्त्वाचा'; अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

    अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाचा अपघात वेदनादायक आहे. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ज्या वेदना आणि चिंता वाटत असतील त्या अकल्पनीय आहेत. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या प्रत्येकासोबत आहेत. प्रशासनाकडून तातडीने बचाव आणि मदतकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे - प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वती मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

  • 12 Jun 2025 04:13 PM (IST)

    12 Jun 2025 04:13 PM (IST)

    विमान दुर्घटनेनंतर बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केले दुःख, पीडित कुटुंबासाठी केली प्रार्थना

    गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. या बातमीने सगळेच धक्क झाले आहेत. या विमानात २४२ प्रवासी होते. हा अपघात इतका भयानक होता की एका सेकंदात सर्व काही जळून खाक झाले. सामान्य लोकांपासून ते चित्रपटातील कलाकारांपर्यंत सर्वजण या अपघातावर दुःख व्यक्त करत आहेत. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा, सनी देओल आणि ब्रिटिश गायिका जास्मिन वालिया यांच्यासह अनेकांची नावे आहेत. हे सगळे कलाकार पीडित कुटुंबासाठी प्रार्थना देखील करत आहेत.

  • 12 Jun 2025 04:12 PM (IST)

    12 Jun 2025 04:12 PM (IST)

    ‘तुम्ही पहिले अहमदाबाद गाठा’; Air India चे विमान कोसळताच पंतप्रधान मोदींचे शहांना निर्देश

    अहमदाबाद: गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान एअर इंडियाचे प्रवासी विमान आहे. या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. हे विमान रहिवाशी भागात कोसळले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सविस्तर माहिती घेतली आहे. तसेच घटनास्थळी सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या घटनेची माहिती घेतली. तसेच त्यांनी अमित शहा यांना तातडीने अहमदाबादला जाण्याचे निर्देश दिले आहेत.

  • 12 Jun 2025 03:54 PM (IST)

    12 Jun 2025 03:54 PM (IST)

    अहमदाबाद विमान अपघात; विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक

    अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप जखमी किंवा जीवितहानीबाबत कोणताही माहिती देण्यात आलेली नाही. विमानातील २ क्रू मेंबर मराठी असल्याचीही माहिती आहे. घटनास्थळी बचावकार्यही युद्धपातळीवरू सुरू असून जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे.

    #WATCH | Gujarat | Row of ambulances arrive at the Civil Hospital following the Air India plane crash in Ahmedabad pic.twitter.com/l0C2phj3GY

    — ANI (@ANI) June 12, 2025

  • 12 Jun 2025 03:39 PM (IST)

    12 Jun 2025 03:39 PM (IST)

    एअर इंडियाचे विमान कोसळताच शेअर बाजारात भूकंप, टाटा ग्रुपचे शेअर्स कोसळले

    २४२ प्रवाशांना घेऊन अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान आज ७०० फूटांवरून कोसळलं. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. दरम्यान घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जखमींना हास्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर शेअर मार्केटमध्ये भूकंप आला असून टाटा ग्रुपचे शेअर्स कोसळले आहेत. टाटा समूहाच्या या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

  • 12 Jun 2025 03:24 PM (IST)

    12 Jun 2025 03:24 PM (IST)

    एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादकडे रवाना

    नागरी विमान वाहतूक मंत्रालयात झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादला रवाना झाले आहेत. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग ओटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • 12 Jun 2025 03:16 PM (IST)

    12 Jun 2025 03:16 PM (IST)

    एअर इंडियाचं विमान थेट रुग्णालयावर कोसळलं, १५ डॉक्टर जखमी

    २४२ प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान आज अहमदाबादमधील एका इमारतीवर कोसळलं. यात १५ डॉक्टर जखमी झाले आहेत. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. गुजरातचे माझी मुख्यमंत्रीही याच विमानात असल्याची खात्री पटली आहे. दुर्घटनेनंतर परिसरात प्रचंड धुराचे लोट उठले होते. कित्येक किलोमीटरवर याचे धक्के जाणवलं. परिसरातील इमारतीही कोसळल्याची माहिती आहे.

  • 12 Jun 2025 03:00 PM (IST)

    12 Jun 2025 03:00 PM (IST)

    पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ बंद

    अमहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान आज दुपारी कोसळलं. विमानात जवळपास २४२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ बंद करण्यात आलं आहे. तोपर्यंत कोणतही उड्डाण विमानतळावरून होणार नाही.

  • 12 Jun 2025 02:51 PM (IST)

    12 Jun 2025 02:51 PM (IST)

    Karjat News : पावसामुळे भाताच्या पिकाचे नुकसान; पंचनामे होत नसल्याने बळीराजा संकटात

    कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यात अजूनही गावकरी भाताची शेती करतात. भाताच्या शेतीचे उत्पन्न मिळण्याची वेळ आणि मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे दुबार शेती वाया गेली आहे. दुबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान भाताचं पीक पाण्यात भिजल्याने झाले . अशा या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करुन शासन दरबारी नुकसान भरपाई दिली जाते. मात्र नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांच्या जमिनीचा पंचनामे होताना दिसत नाहीत. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर मे अखेरपर्यंत अवकाळी पाऊस सुरु होता आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील भाताची सर्व शेत पाण्याने भरली असून अजूनही त्या भाताची लागवड करायच्या शेतात पाणी आणि गवत असल्याने बियाण्याची पेरणी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • 12 Jun 2025 02:51 PM (IST)

    12 Jun 2025 02:51 PM (IST)

    संध्याकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी sprouts chat, वजन राहील कायमच नियंत्रणात

    वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा सतत काहींना काही करत असतात. आहारात बदल करणे, जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे, प्रोटीनशेक इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र आहारात कोणत्याही पदार्थांचे आणि प्रोटीनशेकचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. प्रोटीनशेक पिणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. यामुळे किडनीला इजा होण्याची जास्त शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात कडधान्य किंवा चाटचे सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्प्राउट्स चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यामध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तसेच संध्याकाळच्या नाश्त्यात चाट खाल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया स्प्राउट्स चाट बनवण्याची सोपी रेसिपी.

  • 12 Jun 2025 02:50 PM (IST)

    12 Jun 2025 02:50 PM (IST)

    कशा प्रकारे होते RAW मध्ये भरती? प्रक्रिया आहे जरा सीक्रेट… कशी? जाणून घ्या

    RAW देशाची सगळ्यात गुप्त असणाऱ्या यंत्रणांमधील एक आहे. ही यंत्रणा विदेशी सुरक्षा हालचालींवर नियंत्रण ठेवते. RAW च्या नियंत्रणाखाली असणाऱ्या सगळ्या मोहिमा अगदी गुप्त स्वरूपात असतात. RAW मध्ये करण्यात येणारे प्रत्येक कार्य अगदी गुप्त असते. महत्वाचे म्हणजे RAW मध्ये एजेंट पदी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांची भरती ही अगदी गुपित पद्धतीने केली जाते. मुळात, RAW च्या भरतीसाठी कोणत्याही संकेतस्थळावर जाऊन अर्जाचा फॉर्म भरण्याची गरज नसते. मुळात, ही भरती साधारण तरुणांसाठी नसतेच. या भरतीमध्ये नियुक्तसाठी विविध निकष पात्र करावे लागतात. हे निकष अतिशय कठीण आहेत, कारण याला पात्र शक्यतो एखादा सरकारी अधिकारीच करतो.

  • 12 Jun 2025 02:49 PM (IST)

    12 Jun 2025 02:49 PM (IST)

    Ahmedabad plane crash: अहमदाबाद-लंडन विमान कोसळले; प्रवाशांमध्ये माजी CM विजय रूपानी असण्याची शक्यता

    अहमदाबाद: Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळले आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार हे विमान एअर इंडियाचे असल्याचे म्हटले जात आहे. हे विमान कुठून कुठे जात होते हे समजू शकलेले नाही. हे विमान रहिवाशी परिसरात कोसळले आहे.

     

    TRAGIC NEWS!

    Passenger plane CRASH just meters away from Ahmedabad airport.#Ahmedabad #Airplanecrash #crash pic.twitter.com/Deok0xrTg9

    — Perlina Trump (@perlinaino) June 12, 2025

  • 12 Jun 2025 02:48 PM (IST)

    12 Jun 2025 02:48 PM (IST)

    आयसीसी T20 क्रमवारीत तिलक वर्माचा दबदबा! पाकिस्तानच्या Babar Azam सह ‘या’ भारतीय फलंदाजाला टाकले मागे..

    भारतीय T20 क्रिकेटमध्ये  तिलक वर्मा हा नेहमीच चांगला खेळताना दिसून आला आहे. आता त्याच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. तिलक वर्मा गेल्या काही काळापासून मर्यादित क्रिकेट स्वरूपात शानदार कामगिरी करताना दिसत आहे. या दरम्यान, त्याने विरोधी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या T20 फलंदाजांच्या क्रमवारीत तिलक वर्माने आता हरकती दाखवल्या आहेत. या दरम्यान, तिलकने  पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम आणि भारताचा T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघा मातब्बर फलंदाजांना मागे टाकले आहे.

  • 12 Jun 2025 02:44 PM (IST)

    12 Jun 2025 02:44 PM (IST)

    Ahmedabad plane crash : Air India च्या ऑफिशियल अकाऊंटने केली अपघाताची पुष्टी

    अहमदाबाद-लंडन गॅटविक या विमानाने उड्डाण घेतलेली फ्लाइट AI171 याचा अपघात झाला आहे. याबाबत एअर इंडियच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन अपघाताची पुष्टी करण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण अपघाताची माहिती दिली जाईल असे एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

    Flight AI171, operating Ahmedabad-London Gatwick, was involved in an incident today, 12 June 2025. At this moment, we are ascertaining the details and will share further updates at the earliest on https://t.co/Fnw0ywg2Zt and on our X handle (https://t.co/Id1XFe9SfL).

    -Air India…

    — Air India (@airindia) June 12, 2025

  • 12 Jun 2025 02:39 PM (IST)

    12 Jun 2025 02:39 PM (IST)

    Ahmedabad Plane Crash : टेक ऑफ होताच सात मिनिटांत विमानाचा अपघात

    गुजरातमधील अहमदाबादमध्ये 242 प्रवासी एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले आहे. या विमानाने 1.31 मिनिटांनी टेक ऑफ केले होते. अवघ्या सात मिनिटांमध्ये या विमानाचा अपघात झाला आहे. केवळ 700 फूट उंच गेलेल्या या विमानाचा अपघात झाला.

  • 12 Jun 2025 02:37 PM (IST)

    12 Jun 2025 02:37 PM (IST)

    Ahmedabad Plane Crash : माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा समावेश असण्याची शक्यता

    गुजरातमधील अहमदाबाद विमान अपघातामध्ये 242 प्रवासी लंडनला घेऊन जाणारे विमान कोसळले आहे.  यामध्ये मृतांची आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. या प्रवाशांमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा समावेश असण्याची शक्यता  वर्तवली जात आहे.

  • 12 Jun 2025 02:36 PM (IST)

    12 Jun 2025 02:36 PM (IST)

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलची ICC ने केली घोषणा, वाचा 9 संघाचे संपूर्ण वेळापत्रक

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ चा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये सुरू आहे. काल या सामन्याचा पहिला दिवस पार पडला या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली. भारताच्या संघाला आठ सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवायचा होता आणि फायनलमध्ये स्थान पक्के झाले असते पण भारताच्या संघाला फक्त एक सामन्यात विजय मिळाला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली आणि फायनलमध्ये स्थान पक्के केले.

  • 12 Jun 2025 02:35 PM (IST)

    12 Jun 2025 02:35 PM (IST)

    Housefull 5: रोज चित्रपटाच्या नावावर नवा रेकॉर्ड; आता अक्षयने स्वतःच्याच ‘या’ चित्रपटाला टाकले मागे!

    बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या स्वतःचेच रेकॉर्ड तोडण्यात व्यस्त आहे. २०२५ मध्ये, मोठ्या स्टार्सचे चित्रपट सरासरी कामगिरी करत असताना, अक्षयने एक नाही तर दोन मोठे हिट चित्रपट दिले आहेत. ताज्या माहितीनुसार, त्याचा विनोदी चित्रपट ‘हाऊसफुल ५’ ने बॉक्स ऑफिसवर देशभक्तीपर अ‍ॅक्शन चित्रपट ‘स्काय फोर्स’ ला मागे टाकून वर्षातील तिसरा सर्वात मोठा हिट हिंदी चित्रपट होण्याचा विक्रम केला आहे. म्हणजेच, जर असे म्हटले गेले की अक्षयने स्वतःच्याच चित्रपटाला मागे टाकले आहे, तर काहीही चुकीचे ठरणार नाही.

  • 12 Jun 2025 02:35 PM (IST)

    12 Jun 2025 02:35 PM (IST)

    Dinvishesh : हास्यसम्राट पु.ल. देशपांडे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन; जाणून घ्या 12 जूनचा इतिहास

    आपल्या लेखणी, वकृत्व आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये हक्काचे घर निर्माण करणारे कलाकार म्हणजे पु.ल.देशपांडे. मराठी साहित्यामध्ये ज्यांनी अमूल्य असे योगदान दिले त्या पु.ल.देशपांडे यांचा आजच्या दिवशी म्हणजे 12 जून 2000 रोजी मृत्यू झाला. स्टॅन्ड अप कॉमेडी हा सादरीकरणाचा प्रकार आता लोकप्रिय झाला असला तरी त्यांनी यामध्ये पूर्वीच प्रभूत्व मिळवले होते. पु. ल. देशपांडे यांचे वयाच्या  ८० व्या वर्षी निधन झाले होते. हा दिवस म्हणजे त्यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस होता.

  • 12 Jun 2025 02:34 PM (IST)

    12 Jun 2025 02:34 PM (IST)

    आश्चर्यकारक! चक्क, सॅमसंग फोनने वाचवले सैनिकाचे प्राण, युद्धात बनले बुलेटप्रूफ कवच

    स्मार्टफोनची बिल्ड क्वालिटी सतत मजबूत होत आहे पण तुम्हाला माहिती आहे का की कधीकधी ते आपले जीव देखील वाचवू शकतात? हो, बुलेटप्रूफ जॅकेटप्रमाणे, फोन धोकादायक परिस्थितीत देखील तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. युक्रेनमधून अशीच एक घटना समोर आली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यामध्ये Samsung Galaxy S25 Ultra हिरो बनला आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, सॅमसंगच्या या फ्लॅगशिप फोनने एका सैनिकाचा जीव वाचवला.

  • 12 Jun 2025 02:34 PM (IST)

    12 Jun 2025 02:34 PM (IST)

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबादच्या अपघाती विमानात 242 प्रवासी

    गुजरातमध्ये प्रवासी विमानाचा अपघाता झाला आहे. नुकतेच टेक ऑफ केलेल्या विमानामध्ये 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे विमान अपघातामध्ये मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

  • 12 Jun 2025 02:33 PM (IST)

    12 Jun 2025 02:33 PM (IST)

    Karjat News : वाहतूक कोंडीच्या समस्येवर नागरिक आक्रमक; तातडीने आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी

    कर्जत/ संतोष पेरणे :  शहरात सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे तसंच अरुंद रस्ते आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहनांच्या लांब लांब रांगा लागत असल्याने वाहन चालक आणि रहदारी करणाऱ्य़ा नागरिकांना देखील दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या डोकेदुखी होत चाललेली आहे. शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर, कर्जत शहर बचाव समिती आक्रमक झाली असून कर्जत बचाव समितीच्या वतीने वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर निवेदन दिले.कर्जत शहरातील प्रमुख वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तातडीने आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 12 Jun 2025 02:32 PM (IST)

    12 Jun 2025 02:32 PM (IST)

    Mangal Gochar: मंगळ ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश

    ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यातील ग्रहांचे संक्रमण विशेष असणार आहे. जून महिन्यामध्ये बुध, सूर्य आणि शुक्र ग्रह आपले राशी बदलणार आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांवर होणार आहे. मंगळ ग्रहाला ज्योतिषशास्त्रात ऊर्जा, शौर्य आणि शक्तीचा कारक मानला जातो. कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचा शुभ प्रभाव असल्यास व्यक्ती ऊर्जावान बनतो, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. यामुळे मंगळ ग्रहाच्या नक्षत्र बदलामुळे काही राशीच्या लोकांना याचा सकारात्मक बदलाला सामोरे जावे लागू शकते. याशिवाय या लोकांना आर्थिक गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो. जाणून घ्या मंगळ ग्रहाच्या नक्षत्र संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.

  • 12 Jun 2025 02:32 PM (IST)

    12 Jun 2025 02:32 PM (IST)

    Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाचे ड्रीमलायनर 787 विमान कोसळले

    गुजरातमधील विमान अपघातामधील विमान हे एअर इंडियाचे विमान आहे. एअर इंडियाचे ड्रीमलायनर 787 या विमानाचा अपघात झाला आहे. विमानाच्या टाक्या इंधनाने पूर्ण भरलेल्या असल्यामुळे मोठी हानी झाली आहे.

  • 12 Jun 2025 02:32 PM (IST)

    12 Jun 2025 02:32 PM (IST)

    पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर अमेरिकेचे अणुबॉम्ब होते का? पाहा अमेरिकेच्या ‘Atomic Bomb Host’ करणाऱ्या देशांची यादी

    Pakistan Nur Khan Air Base : पाकिस्तानमधील नूर खान एअरबेसवर अमेरिकेचे अणुबॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा समोर येत आहे. विशेष म्हणजे, या दाव्याला बळ देणारी माहिती काही पाकिस्तानी संरक्षण तज्ज्ञांकडूनही दिली जात आहे. भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळांवर कारवाई केली होती, ज्यामध्ये नूर खान एअरबेसवर हल्ला केल्याचेही सांगण्यात आले होते. त्यानंतरच हा संपूर्ण वाद निर्माण झाला आहे.

  • 12 Jun 2025 02:31 PM (IST)

    12 Jun 2025 02:31 PM (IST)

    शिकारी खुद यहां शिकार हो गया! चक्क बेडकाने सापाला गिळले; VIDEO तुफान व्हायरल

    Viral News Marathi: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, तर कधी आश्चर्यकारक असे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक अद्भुत व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, अगदी छोट्याशा किटकापासून ते मोठ्या प्राणी पक्ष्यांच्या जीवनशैलीबाबत अनेक रहस्यमयी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा निसर्ग आपल्याला अशा अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या घटनांचे दर्शन घडवतो. सध्या असाच एक अचंबित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

     

     

    View this post on Instagram

     

    A post shared by NavaRashtra (@navarashtra)

  • 12 Jun 2025 02:30 PM (IST)

    12 Jun 2025 02:30 PM (IST)

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात

    गुजरातमधील अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात झाला आहे. एअर इंडियाचे हे विमान असून यामध्ये मृतांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे.

  • 12 Jun 2025 02:27 PM (IST)

    12 Jun 2025 02:27 PM (IST)

    कर्जतमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येवर नागरिक आक्रमक

    शहरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहेत. त्यामुळे  बाजारपेठ, श्रीराम पूल आणि चारफाटा परिसरातील नो-एंट्रीचे उल्लंघन, ट्राफिकचे अकार्यक्षम नियमन आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे होणाऱ्या तणावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचसाठी बचाव समितीने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.

  • 12 Jun 2025 02:10 PM (IST)

    12 Jun 2025 02:10 PM (IST)

    2 दिवसात 50000 रूपयांचे झाले 710000, सिगरेटपेक्षा कमी किमतीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ; 40% पेक्षा अधिक रिटर्न

    गेल्या दोन दिवसांत जीटीपीएल इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये ४२% ची मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी, बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) वर हा शेअर १८.७% वाढून २.१६ रुपयांवर पोहोचला. असे दिसते की गुंतवणूकदार या पेनी स्टॉकवर जोरदार सट्टा लावत आहेत, तर कंपनीकडून कोणतीही विशेष बातमी आलेली नाही. जर तुम्ही दोन दिवसांपूर्वी त्यात ५०,००० रुपये गुंतवले असते तर त्यांची किंमत ७१,००० रुपये झाली असती अशी सध्याची स्थिती आहे

  • 12 Jun 2025 02:09 PM (IST)

    12 Jun 2025 02:09 PM (IST)

    ‘The Great Indian Kapil Show’ मध्ये पुन्हा का परतले सिद्धूपाजी? अर्चना पूरण सिंगबद्दल केला खुलासा!

    विनोदी कलाकार कपिल शर्माने अलीकडेच नवजोत सिंग सिद्धूच्या शोमध्ये परतण्याची घोषणा करून चाहत्यांना आनंद दिला. त्यांच्या ताज्या व्हीलॉगमध्ये, सिद्धू यांनी या पुनरागमनाला “घरी परतलो” असं म्हटले आणि १३ वर्षांपूर्वी कपिलला त्याचा शो सुरू करण्यास मदत केल्याचे उघड केल आहे. तसेच त्यांनी या व्हीलॉगमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच ते नक्की काय काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.

    ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये परत येण्याबद्दल सिद्धूची प्रतिक्रिया
    सिद्धू पाजी म्हणाले की, “मी जिथे जिथे गेलो तिथे लोक मला विचारायचे की मी कपिलच्या शोमध्ये परत का येत नाही. नंतर कठोर परिश्रम आणि नशिबाने मला साथ दिली आणि मी पुन्हा शोमध्ये परत आलो. ज्या एपिसोडमध्ये मी दिसलो त्या एपिसोडसाठी मला जितके प्रेम मिळाले, ते पाहून असे वाटले की मी पुन्हा घरी परतलो आहे.” तसेच ते अर्चना पूरण सिंगबद्दल म्हणाले की, “मी अर्चना जी बद्दल देखील बोललो. मी माँ दुर्गेचा भक्त आहे, म्हणून मी कोणाला दुखावून कसे परत येऊ शकतो. मी तिच्याशी बोललो, तिनेही होकार दिला आणि आता ती देखील माझ्यासोबत शोमध्ये आहे. सर्वांचे प्रेम आणि आदर मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे.” असे त्याने म्हटले.

  • 12 Jun 2025 01:45 PM (IST)

    12 Jun 2025 01:45 PM (IST)

    फक्त नेते नाही तर प्रवक्त्यांची सुद्धा होतीये भेट

    राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीमध्ये मुंबी पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचूक टायमिंग साधलं आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असून त्यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे.

  • 12 Jun 2025 01:40 PM (IST)

    12 Jun 2025 01:40 PM (IST)

    जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर अपडेट!

    भारताचा संघ आता आयपीएल झाल्यानंतर इंग्लडविरुद्ध मालिका खेळताना दिसणार आहे. त्याआधी सध्या भारताचा संघ हा इंग्लडविरुद्ध मालिकेआधी सराव करत आहे. भारतीय संघासाठी हा दौरा फारच महत्वाचा असणार आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. शुभमन गिलच्या हाती भारतीय संघाची कमान असताना आता भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत याच्या फिटनेसवर मोठी अपडेट समोर आली आहे.

  • 12 Jun 2025 01:30 PM (IST)

    12 Jun 2025 01:30 PM (IST)

    कागिसो रबाडाने जसप्रीत बुमराहचा मोडला विश्वविक्रम

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कालपासुन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकले होते आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या संघाला फायदेशी र ठरला त्याचे कारण म्हणजेच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची कमालीची कामगिरी.

  • 12 Jun 2025 01:25 PM (IST)

    12 Jun 2025 01:25 PM (IST)

    तुमचे WhatsApp अकाऊंट दुसरे कोणीतरी चालवत नाहीये ना?

    WhatsApp, हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. WhatsApp हा खाजगी चॅट, कॉल आणि महत्त्वाच्या संभाषणांसाठी वापरले जाते. कंपनी वापरकर्त्यांच्या सहभागासाठी अपडेट्स आणत राहते. त्याच्या लोकप्रियतेमुळे, गुन्हेगार देखील अ‍ॅपवर लक्ष ठेवतात. कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर अनऑथराइज्ड एक्सेस अनेक प्रकारे केला जाऊ शकतो, जो गोपनीयतेसाठी गंभीर धोका असू शकतो.

  • 12 Jun 2025 01:20 PM (IST)

    12 Jun 2025 01:20 PM (IST)

    वुटिपमुळे पूर आणि भूस्खलानाचा हवामान विभागाकडून इशारा

    एक मोठी बातमी समोर येते आहे. चीनच्या दक्षिण समुद्रात उष्णकटीबंधीय कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे वुटिप वादळाचे मोठे संकट चीनसमोर उभे राहिले आहे. या वादाळामुळे पुढील तीन दिवस चीनमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहणार असल्याचे चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने सांगितले आहे. यामुळे चीनच्या अनेक भागात विनाशाची भीती व्यक्त केली आहे.

  • 12 Jun 2025 01:15 PM (IST)

    12 Jun 2025 01:15 PM (IST)

    तब्बल 18.6 वर्षांनी पुन्हा अनुभवलं हे चित्तथराक दृश्य

    आकाशप्रेमींसाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरला. कारण आज रात्री आकाशात दिसला एक अत्यंत दुर्मीळ आणि रहस्यमय खगोलीय देखावा Strawberry Moon. ११ जूनच्या पौर्णिमेला आकाशात उमटलेला हा चंद्र, सामान्य चंद्रदर्शनापेक्षा वेगळा आणि खास ठरला.

  • 12 Jun 2025 01:12 PM (IST)

    12 Jun 2025 01:12 PM (IST)

    राज ठाकरेंच्या मनाचा ठाव काही लागेना…!

    राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसह इतर महत्त्वाच्या शहरांच्या पालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा होती. मात्र त्यापूर्वी मनसे नेते राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे.

  • 12 Jun 2025 12:49 PM (IST)

    12 Jun 2025 12:49 PM (IST)

    रबाडाच्या नावावर नवा विक्रम

    आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या फायनल सामन्याच्या पहिल्या  इंनिगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने धुव्वादार कामगिरी केली. ११ जून रोजी लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्याने ५ विकेट्स नावावर घेतले, त्यानंतर सोशल मिडीयावर त्याची मोठ्या प्रमाणात व्हा व्हा झाली. यादरम्यान कागिसो रबाडाने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा विश्वविक्रम मोडला. रबाडा आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम स्ट्राइक रेट असलेला गोलंदाज बनला आहे , ज्याने रेड बॉल क्रिकेटमध्ये २०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

  • 12 Jun 2025 12:41 PM (IST)

    12 Jun 2025 12:41 PM (IST)

    स्मार्ट टीव्हीची किंमत 11 हजारांपासून सुरु

    सध्या ई-कॉमर्स साइट Amazon वर Amazon Prime Savings on Smart TV सेल सुरू आहे, ज्यामध्ये स्मार्ट टीव्हीवर डिस्काउंट दिले जात आहे. या सेलमध्ये किंमत कपात आणि बँक ऑफरचा फायदा समाविष्ट आहे.  चला जाणून घेऊया Amazon वर डिस्काउंटमध्ये भेटणारे स्मार्ट टीव्हींच्या किंमती. वाचा सविस्तर 

  • 12 Jun 2025 12:30 PM (IST)

    12 Jun 2025 12:30 PM (IST)

    ENG vs IND सामन्यात कोणाला मिळणार प्लेइंग 11 मध्ये संधी?

    भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे, ही मालिका 20 जूनपासुन खेळवली जाणार आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघासाठी अष्टपैलु शार्दुल ठाकुर, नितिश कुमार रेड्डी त्याचबरोबर अनुभवी खेळाडू रविंद्र जडेजा देखील संघामध्ये आहे. प्लेइंग ११ मध्ये कोणत्या दोन संघाला संधी मिळणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. आता भारतीय संघाचे बॉलिंग कोच मॉर्न मॉर्केल याने प्लेइंग इलेव्हनमध्ये नितेश कुमार रेड्डी की शार्दुल ठाकूर या दोघांमधील कोणाला संधी मिळणार यासंदर्भात जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्याने कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला.

  • 12 Jun 2025 12:15 PM (IST)

    12 Jun 2025 12:15 PM (IST)

    राम चरणच्या ‘The India House’ चित्रपटाच्या सेटवर धमाका!

    ‘द इंडिया हाऊस’ सेटवरील पाण्याची टाकी अचानक फुटल्याने हा अपघात झाला, त्यानंतर सेटवर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. हैदराबादच्या बाहेरील शमशाबाद परिसराजवळ हा घटना घडली. सेटवर ‘द इंडिया हाऊस’ हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत अनेक क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत.

    హీరో నిఖిల్ సినిమా షూటింగ్లో భారీ ప్రమాదం

    ది ఇండియన్ హౌస్ సినిమా షూటింగ్లో ఘటన

    శంషాబాద్ సమీపంలో సముద్రం సీన్స్ తీసేందుకు ఏర్పాటు చేసిన భారీ వాటర్ ట్యాంక్ పగిలిపోవడంతో లొకేషన్ మొత్తం వరద

    అసిస్టెంట్ కెమెరామెన్ కు తీవ్ర గాయాలు.. మరికొంత మందికి గాయాలు https://t.co/x98xY5eaKE pic.twitter.com/yLewxQTiQ7

    — Telugu Scribe (@TeluguScribe) June 11, 2025

Web Title: Marathi breaking news today live updates 12 june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 08:38 AM

Topics:  

  • Breaking News
  • maharashtra update

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: ‘…तर तुमचं राजकीय करिअर बर्बाद होईल’; मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना दिला इशारा
1

Top Marathi News Today: ‘…तर तुमचं राजकीय करिअर बर्बाद होईल’; मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

पाकिस्तानच्या Jaffar Express मध्ये बॉम्ब ब्लास्ट, ट्रेनचे 6 डबे रूळावरून घसरले
2

पाकिस्तानच्या Jaffar Express मध्ये बॉम्ब ब्लास्ट, ट्रेनचे 6 डबे रूळावरून घसरले

Top Marathi News Today: चंद्रपूर जिल्हा बँकेवर भाजपची प्रथमच एकहाती सत्ता
3

Top Marathi News Today: चंद्रपूर जिल्हा बँकेवर भाजपची प्रथमच एकहाती सत्ता

Top Marathi News Today: राज ठाकरें म्हणाले ‘डुबे डुबे के मारेंगे’; निशिकांत दुबेंचं फक्त एका वाक्यात प्रत्युत्तर!
4

Top Marathi News Today: राज ठाकरें म्हणाले ‘डुबे डुबे के मारेंगे’; निशिकांत दुबेंचं फक्त एका वाक्यात प्रत्युत्तर!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फुरसूंगी अन् वानवडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले; खिडकीतून प्रवेश केला अन्…

फुरसूंगी अन् वानवडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले; खिडकीतून प्रवेश केला अन्…

जैशच्या दहशतवाद्यांनतर पाकिस्तान सुदानच्या लष्कराला पुरवणार शस्त्रे? भारताच्या हिंद महासागरातील सुरक्षेला आव्हान?

जैशच्या दहशतवाद्यांनतर पाकिस्तान सुदानच्या लष्कराला पुरवणार शस्त्रे? भारताच्या हिंद महासागरातील सुरक्षेला आव्हान?

RSS Chief Mohan Bhagwat: प्रत्येक भारतीयाने ३ अपत्ये जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे विधान चर्चेत

RSS Chief Mohan Bhagwat: प्रत्येक भारतीयाने ३ अपत्ये जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे विधान चर्चेत

NARI-2025 Report: महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? NARI च्या अहवालातून धक्कादायक खुलासे

NARI-2025 Report: महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? NARI च्या अहवालातून धक्कादायक खुलासे

गणेशोत्सवाच्या रंगात रंगली सोनाली कुलकर्णी; मराठमोळी साडीतील ‘हे’ फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा!

गणेशोत्सवाच्या रंगात रंगली सोनाली कुलकर्णी; मराठमोळी साडीतील ‘हे’ फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा!

Amol khatal Attack: शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…

Amol khatal Attack: शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…

Pune News : विद्यापीठाजवळील उड्डाणपुलाच्या कामात अनेक त्रुटी; वाहनचालकांची तीव्र नाराजी

Pune News : विद्यापीठाजवळील उड्डाणपुलाच्या कामात अनेक त्रुटी; वाहनचालकांची तीव्र नाराजी

व्हिडिओ

पुढे बघा
Amaravati : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, नवनीत राणा यांचा जरांगेंना सल्ला

Amaravati : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, नवनीत राणा यांचा जरांगेंना सल्ला

Sambhajinagar : मराठा समाजाने निवडणूक लढवली नाही म्हणून… काय म्हणाले जरांगे पाटील ?

Sambhajinagar : मराठा समाजाने निवडणूक लढवली नाही म्हणून… काय म्हणाले जरांगे पाटील ?

Sangli : प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसला सक्षम करेल, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास

Sangli : प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसला सक्षम करेल, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास

Amravati : वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची चाचपणी

Amravati : वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची चाचपणी

Kolhapur News : आता नाही माघार, शाहिरांचा जरांगेंना पाठिंबा

Kolhapur News : आता नाही माघार, शाहिरांचा जरांगेंना पाठिंबा

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.