Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : पहलगाम येथे पर्यटकांना लक्ष्य करुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून यामध्ये लष्काराला आवश्य कारवाई करण्याची पूर्ण परवानगी देण्यात आली आहे. मात्र यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. जम्मू काश्मीर येथील नियंत्रण कक्षेवर पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार केला जात आहे.
02 May 2025 05:14 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यासंदर्भात आव्हाड यांनी स्वत: ही माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर पोस्ट करून पोलिसांनी हस्तक्षेप करावा, असेही त्यांनी सांगितले.
02 May 2025 05:07 PM (IST)
ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात काही शाळा शासनाची आवश्यक मान्यता न घेता अनधिकृतरीत्या शिक्षण संस्था चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची मान्यता व नोंदणी क्रमांक तपासावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या ललिता दहितुले यांनी केले आहे.
02 May 2025 04:49 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपातर्फे ठाणे शहरात जल्लोष व्यक्त करण्यात आला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी कार्यकर्त्यांसह रेल्वे स्टेशनबाहेर जल्लोष करून नागरिकांना लाडू वाटप करीत आनंद व्यक्त केला.
02 May 2025 04:36 PM (IST)
उत्तर प्रदेश: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना 'आक्रमण' युद्धाभ्यास करत आहेत. भारत पाकिस्तान सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या गेल्या आहेत. सीमेवर तैनाती वाढवली जात आहे.आज भारतीय वायुसेनेने थेट गंगा एक्सप्रेस वे वर लढाऊ विमानांचे लॅंडींग केले आहे.
02 May 2025 04:19 PM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातिनिहाय जनगणनेबाबत टीका करणाऱ्या कॉंग्रेसला सुनावले. ते म्हणाले की, “जनगणनेच्या बाबतीत विरोधक दबाव आणू शकतात का? देशाचे पंतप्रधान कुणाच्या दबावात येतील असं वाटतं का? जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कुठल्या घटकाची लोकसंख्या किती आहे, हे समोर येईल. काँग्रेसची इतकी वर्षे सत्ता होती, ती त्यावेळी का केलं नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
02 May 2025 04:15 PM (IST)
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानस्थित गटांच्या दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांचा बळी घेतला होता. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरक्षा अनेक पटींनी वाढवण्यात आली आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात हा हल्ला झाला. महामार्ग आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले. प्रमुख आस्थापना आणि पर्यटन स्थळांजवळ जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली होती. त्याच वेळी, पहलगाम घटनेनंतर, सैन्य दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी 'दहशतवादविरोधी कारवाया' राबवण्यात आल्या आहेत. तसेच, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्यांची घरे बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आली.
02 May 2025 03:49 PM (IST)
नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, तसेच इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्यासह इतर काही वरिष्ठ नेत्यांविरुद्ध राऊज अव्हेन्यू कोर्टात चार्जशीट दाखल केली होती. आता या प्रकरणी दिल्ली कोर्टाने राहुल आणि सोनिया गांधी यांना नोटिस जारी केली आहे.
02 May 2025 03:32 PM (IST)
आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. देवाची आळंदी येथून 19 जून रोजी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. तर 5 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
02 May 2025 03:29 PM (IST)
केरळममधील तिरुअनंतपुरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8,900 कोटी रुपयांचे 'विझिंजम आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय सीपोर्ट'चे लोकार्पण केले. केरळ सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) द्वारे सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत विकसित करण्यात आला आहे.
#WATCH | Thiruvananthapuram, Kerala: Prime Minister Narendra Modi dedicated to the nation 'Vizhinjam International Deepwater Multipurpose Seaport' worth Rs 8,900 crore
CM Pinarayi Vijayan and Adani Group Chairperson Gautam Adani were also present
This ambitious project of the… pic.twitter.com/R5Ndo1HmZT
— ANI (@ANI) May 2, 2025
02 May 2025 02:59 PM (IST)
श्रीनगर: गेल्या आठवड्यात टिआरएफच्या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए राष्ट्रीय तपास संस्था करत आहे. एनआयएच्या तपासात अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले आहे.
02 May 2025 02:56 PM (IST)
जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतावर आणखी नव्या हल्ल्यांचे सावट उभे राहिले आहे. या हल्ल्याला सायबर वॉरफेअर (सायबर युद्ध) असे म्हटले जात आहे. महाराष्ट्र सायबर सेलने 'इकोज ऑफ पहलगाम' या नावाने एक अहवाल तयार केला आहे. ज्यामध्ये 23 एप्रिलनंतर भारतावर जवळपास 10 लाख सायबर हल्ले झाल्याचे उघड झाले आहे.
02 May 2025 02:54 PM (IST)
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!” एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!”
एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला.“स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल… pic.twitter.com/SugY7T6RTe
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 1, 2025
02 May 2025 02:34 PM (IST)
"जातिनिहाय जनगणना याची पार्श्वभूमी पाहिली तर राहुल गांधी यांचा हा मोठा विजय आहे. सरकारचे अनेक जुमले आपण पाहिले तसा हा जमला असू नये," जातिनिहाय जनगणनेवरुन असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.
02 May 2025 01:48 PM (IST)
उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दल (IAF) फ्लायपास्ट करत आहे. येथे हवाई दल टेक-ऑफ आणि लँडिंग सराव करत आहे.
#WATCH | Shahjahanpur: The Indian Air Force (IAF) is carrying out a flypast on the Ganga Expressway in Uttar Pradesh. The Air Force is conducting take-off and landing exercises here.
The exercise is being organised to assess the expressway’s potential as an alternative runway… pic.twitter.com/0xu5cx54Rg
— ANI (@ANI) May 2, 2025
02 May 2025 01:35 PM (IST)
आयपीएल २०२५ च्या (28 एप्रिल ) ४७ व्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध शतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या वयाबद्दल एक दावा करण्यात आला आहे. त्या दाव्यात म्हटले आहे, की त्याचे खरे वय १४ वर्षे नसून १६ वर्षे आहे.
02 May 2025 12:59 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे. फटाके फोडून आणि मिठाई खाऊन हा आनंदोत्सव साजरा केला आहे.
Kalyan | केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयानंतर कल्याणमध्ये भाजपचा आनंदोत्सव#Kalyan #PoliticalNews #MarathiNews pic.twitter.com/EMZjySlC8R
— Navarashtra (@navarashtra) May 2, 2025
02 May 2025 12:49 PM (IST)
नवी मुंबईमध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहगाम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. नवी मुंबई परिसरातील सर्व काश्मिरी पंडितांकडून या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व नागरिकांकडून निषेध व्यक्त केला. हातामध्ये पोस्टर घेऊन पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे.
02 May 2025 12:26 PM (IST)
विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्र्यांच्या विभागांच्या कामकाजाचा अहवाल कार्ड जाहीर करण्यात आला. हे रिपोर्ट कार्ड सरकारने पहिल्या १०० दिवसांत निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या साध्यतेवर आधारित आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कोट्यातील मंत्री अदिती तटकरे यांना फडणवीस मंत्रिमंडळात पहिले स्थान मिळाले आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाने ८० टक्के गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत. त्याच्या विभागाचा गुण ७७.९५ टक्के होता. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृषी विभागाने तिसरे स्थान पटकावले आहे. त्याला ६६.१५ टक्के गुण मिळाले आहेत. मंत्री जयकुमार गोरे चौथ्या क्रमांकावर आहेत आणि प्रताप सरनाईक आणि नितेश राणे हे दोन मंत्री पाचव्या क्रमांकावर आहेत.
02 May 2025 12:01 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नट-नट्यांसोबत वेळ घालवत बसले. अशा प्रकारच्या हल्ल्यानंतर 15 दिवसातील असे कार्यक्रम रद्द केले पाहिजे होते. यावेळी फक्त देशाचा आणि देशाच्या सुरक्षेचा विचार करायला हवा होता. काश्मीरचा विचार करायला हवा होता. परंतू आपले नेतृत्व हे काहीही करत नाही. आणि आपले विरोधक सरकारला पाठिंबा देत आहेत." असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
02 May 2025 11:38 AM (IST)
माझ्यावर झालेले आरोप चुकीचे आहे. प्रमाणपत्र खोटं असल्याचे युपीएससीने कधीच म्हटले आहे. न्यायालयाकडून चुकीचे अर्थ काढले जाऊ शकतात त्यामुळेच मी वरील कोर्टात गेले, असे पुजा खेडकर म्हणाली.
02 May 2025 11:29 AM (IST)
पाकव्याप्त काश्मीरमध्ये हालचालींना वेग आला आहे. घाबरलेल्या पाकिस्तानने या भागातील मदरशांना सुट्टी जाहीर केली आहे. 100 हून अधिक मदरशांना 10 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
02 May 2025 10:55 AM (IST)
शिंदोडी (ता. शिरुर) येथील घोड धरण परिसरातून चक्क साडे सहा लाख रुपयांची माती चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, अशाप्रकारची घटना घडल्याने शिरुर पोलिसांत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
02 May 2025 10:49 AM (IST)
आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. या सामन्यात अनुभवी फलंदाज रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी ६००० धावा करून इतिहास रचला आहे.
02 May 2025 10:48 AM (IST)
मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अश्लील संदेश पाठवणे आणि त्रासदायक कॉल करणे या आरोपाखाली महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अमोल काळे (वय 25) याला अटक करण्यात आली.
02 May 2025 10:26 AM (IST)
अहिल्यानगर सामाजिक, राजकीय, क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे राज्यभर “काका” म्हणून सर्वांना परिचित असणारे विधान परिषदेचे माजी आमदार अरुण बलभीम जगताप यांची आज (दि.२) पहाटे प्राणज्योत मावळली. ते शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जात होते.
02 May 2025 10:21 AM (IST)
उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे आज भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. या सोहळ्यासाठी मंदिराला सुंदर अशी फुलांची आरास आणि सजवण्यात करण्यात आली. सकाळी ७.०० वाजता मंदिराचे दरवाजे उघडले आहेत.
#WATCH | Uttarakhand | Shri Kedarnath Dham is beautifully decorated ahead of its portals opening for devotees today.
The portals of the dham will open at 7.00 am.
(Drone visuals from Shri Kedarnath Dham) pic.twitter.com/pi046Hyy1v
— ANI (@ANI) May 2, 2025
02 May 2025 10:16 AM (IST)
दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून यामुळे मोठे नुकसान होत आहे. या अवकाळी पावसामुळे शहरामध्ये पाणी साठले आहे. तसेच दिल्ली टर्मिनलमधील 3 मधील छत देखील कोसळले आहे.
02 May 2025 10:15 AM (IST)
राजधानी दिल्लीला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपले आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे दिल्लीकडे जाणारी 40 विमाने इतर शहरांकडे वळवण्यात आली आहेत. अनेक परिसर हे जलमय झाले असून एका घरावर झाड पडल्यामुळे चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.