Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News today Live : भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला

Marathi breaking live marathi headlines update Date : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 07, 2025 | 07:20 AM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी काल (दि.06)  शनिवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री साडे अकराच्या सुमारास शासकीय निवासस्थानी स्वतःवर रिव्हॉल्वर मधून गोळ्या झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार निघून गेली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सह्याद्री हॉस्पिटल सूत्रांनी सांगितले. ही घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. रात्री जेवण करून आयुक्त मनोहरे स्वतःच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्यानंतर झाडलेल्या गोळ्यांचा आवाज ऐकून सुरक्षारक्षक धावत आले.

The liveblog has ended.
  • 06 Apr 2025 06:25 PM (IST)

    06 Apr 2025 06:25 PM (IST)

    दमट हवामानाने नागरिकांना घामाच्या धारा

    पूर्ण आठवडाभर राज्यातील हवामान ढगाळ राहिले. राज्याला यलो अलर्ट देखील देण्यात आला होता. यानंतर काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यानंतर आता तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून नागिरक गरमीने हैराण झाले आहेत.

  • 06 Apr 2025 06:12 PM (IST)

    06 Apr 2025 06:12 PM (IST)

    सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत

    सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी माजी सहकार व पणन मंत्री तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनलने तब्बल चार हजारांची आघाडी घेतली. वाचा सविस्तर 

  • 06 Apr 2025 05:18 PM (IST)

    06 Apr 2025 05:18 PM (IST)

    कर्जतमध्ये 30 फुटी श्री रामांची भव्य मूर्ती

    रामनवमीनिमित्त देशामध्ये मोठा उत्साह आहे. रामनवमी निमित्त कर्जतमध्ये प्रभू श्री रामांची भव्य मूर्ती बसवण्यात आली आहे. प्रभू रामांच्या 30 फुटी भव्य मूर्तीचे अनावरण झाले असून ती लक्षवेधी ठरत आहे.

  • 06 Apr 2025 05:16 PM (IST)

    06 Apr 2025 05:16 PM (IST)

    संविधान हाती घेऊन कॉग्रेस प्रदेशाध्यक्षांचा काळाराम मंदिरात प्रवेश

    रामनवमीनिमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये राजकीय नेत्यांची मांदियाळी सुरु आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश केला आहे.

  • 06 Apr 2025 05:12 PM (IST)

    06 Apr 2025 05:12 PM (IST)

    शिवसेना हीच भाजपाला सिनियर - राऊत

    खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "भाजप पक्षाची स्थापना आमच्या समोर झाली आहे. मूळ शिवसेना हीच भाजपाला सिनियर आहे. तेव्हा एका उदात्त हेतूने यांचा जन्म झाला. मात्र ज्यांनी जन्म घातला ते (लालकृष्ण अडवाणी सारखे) नेते तुरुंगात आहेत.आताची भाजप मूळ भाजप नाही," असा घणाघात संजय राऊत यांनी भाजपवर स्थापनादिनी केला आहे.

  • 06 Apr 2025 03:39 PM (IST)

    06 Apr 2025 03:39 PM (IST)

    वादग्रस्त विधानानंतर कृषीमंत्र्यांची दिलगिरी

    कर्जमाफीच्या पैशांतून लग्न केली जातात असे वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. यासाठी राज्यभरातून टीका झाल्यानंतर कृषीमंत्र्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. वक्तव्य मस्करीमधून केले असून यातून शेतकऱ्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असे मत माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले आहे.

  • 06 Apr 2025 02:41 PM (IST)

    06 Apr 2025 02:41 PM (IST)

    रामनवमीनिमित्त साईदरबारी भाविकांची गर्दी

    देशभरामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. यामुळे शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी देखील भाविक नतमस्तक होत आहे. भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

    Shirdi | शिर्डी श्री साई समाधी मंदिरात रामनवमीच्या उत्सवास सुरुवात !#Shirdi #SaiTemple #RamNavamiCelebrations #MarathiNews pic.twitter.com/zF6kD0d71P

    — Navarashtra (@navarashtra) April 6, 2025

  • 06 Apr 2025 02:40 PM (IST)

    06 Apr 2025 02:40 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांकडून रामनवमीच्या खास शुभेच्छा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रीराम नवमीच्या खास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करुन फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 06 Apr 2025 02:38 PM (IST)

    06 Apr 2025 02:38 PM (IST)

    आयोध्येतील रामलल्लाला सूर्यतिलक

    रामनवमीनिमित्त श्री रामजन्मभूमी असलेल्या अयोध्यानगरीमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. अयोध्येतील राम मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी देखील झाली आहे. रामलल्लाच्या मूर्तीवर सुर्यकिरणांनी सूर्यतिलक करण्यात आले आहे.

  • 06 Apr 2025 02:15 PM (IST)

    06 Apr 2025 02:15 PM (IST)

    पुण्यात आता समान पाणी योजना; आता मीटरद्वारे आकारले जाणार पाणीपट्टीचे बिल

    पुणे शहराच्या पालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून आता मीटरद्वारे पाणीपट्टीचे बिल आकारले जाणार आहे. या पाणीपट्टीची बिलाने सुरुवात केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. शहरात महापालिकेला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आता पाणी वापरा नियंत्रण आणण्यासाठी तसेच आवश्यक तेवढेच पाणी वापरावे यासाठी मोटरद्वारे पाणीपट्टीचे बील आकारले जाणार आहे.

  • 06 Apr 2025 02:12 PM (IST)

    06 Apr 2025 02:12 PM (IST)

    कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस

    महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांना सवाल करत शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केला. ‘कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस आहे. राज्याचा कृषिमंत्री अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे’, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

  • 06 Apr 2025 02:10 PM (IST)

    06 Apr 2025 02:10 PM (IST)

    काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय; ‘या’ बड्या नेत्यावर दिली पुण्याची जबाबदारी

    लाडकी बहीण योजनेच्या लाटेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीला मोठं बहुमत मिळालं. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसने या पराभवाची गंभीर दखल घेतली असून नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपादवरून उचलबांगडी करण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशातचं आता आणखी एक मोठा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

  • 06 Apr 2025 01:41 PM (IST)

    06 Apr 2025 01:41 PM (IST)

    पालखी मार्गाची देवस्थानाकडून पाहणी

    पालखी मार्गावरील सर्वात मोठा मुक्काम असलेल्या सासवडमधील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची देवस्थानकडून पाहणी करण्यात आली आहे. रंदरमधील पालखी मुक्कामाची व्यवस्था, दुपारचा विसावा आदी ठिकाणांची पाहणी करून तिथे मिळणाऱ्या विद्युत, पाणी, स्वच्छता, सुरक्षा या गोष्टींचा आढावा, देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा, अडचणी जाणून घेण्यात आल्या.

  • 06 Apr 2025 01:20 PM (IST)

    06 Apr 2025 01:20 PM (IST)

    रामनवमीनिमित्त हडपसरमध्ये गीतरामायण सोहळा

    रामनवमीनिमित्त देशभरामध्ये मोठा उत्साह आहे. पुण्यातील हडपसरमध्ये ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा मिलाफ असलेल्या गीतरामायण संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

  • 06 Apr 2025 01:18 PM (IST)

    06 Apr 2025 01:18 PM (IST)

    गोखले इन्स्टिट्यूट आर्थिक अनियमितता प्रकरणात अटक

    गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आर्थिक अनियमितता प्रकरणात दोषी आढळलेल्या सर्व्हंट्स सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद देशमुख यांना अटक झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी अपहार प्रकरणी डेक्कन पोलिसांनी केली कारवाई

  • 06 Apr 2025 01:16 PM (IST)

    06 Apr 2025 01:16 PM (IST)

    पुण्यात हिरकणी रन- वुमेन्स हाफ मॅरेथॉन

    पुण्यात महिला सुरक्षित, निर्भय, सक्षम व आत्मनिर्भर व्हावी, त्यांच्यामध्ये फिटनेसचे महत्व वाढावे, या उद्देशाने हजारो 'हिरकणी' पुण्याच्या रस्त्यावर धावल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासह 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपटाच्या टीमने महिलांना प्रोत्साहन दिले. 'आम्ही सुरक्षित व सक्षम आहोत', असा संदेश महिलांनी यावेळी दिला.

  • 06 Apr 2025 01:15 PM (IST)

    06 Apr 2025 01:15 PM (IST)

    पुण्यात आगीची घटना

    पुण्यात हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. खराडी बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन या इमारतीत एका हॉटेलमध्ये आगीची घटना घडली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची चार वाहने दाखल झाली असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

  • 06 Apr 2025 12:11 PM (IST)

    06 Apr 2025 12:11 PM (IST)

    पुणे पालिकेकडून समान पाणी योजना

    पुणे शहराच्या पालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून आता मीटरद्वारे पाणीपट्टीचे बिल आकारले जाणार आहे. या पाणीपट्टीची बिलाने सुरुवात केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

  • 06 Apr 2025 11:42 AM (IST)

    06 Apr 2025 11:42 AM (IST)

    पंतप्रधानांच्या हस्ते पंबन ब्रिजचे लोकार्पण

    रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर तमिळनाडूला मोठी भेट मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंबन ब्रिजचे लोकार्पण होणार आहे. पंबन ब्रिज हा भारतातील पहिला उभा लिफ्ट समुद्री पूल असणार आहे. उभा लिफ्ट सी ब्रिज म्हणजे असा पूल ज्याचा एक भाग वर-खाली होतो जेणेकरून जहाजांना अडथळा न येता जाता येईल.

  • 06 Apr 2025 11:04 AM (IST)

    06 Apr 2025 11:04 AM (IST)

    कोकाटे आणि भुजबळ एकाच मंदिरात

    रामनवमी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये राजकीय नेते दर्शनासाठी येत आहेत. यामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे दोघेही काळाराम मंदिरामध्ये येणार आहेत. यामुळे दोन्ही नेते एकाच मंदिरात दिसून येणार आहेत.

  • 06 Apr 2025 10:59 AM (IST)

    06 Apr 2025 10:59 AM (IST)

    काळाराम मंदिरात राजकीय भक्तांची वर्दळ

    नाशिकच्या लोकप्रिय काळाराम मंदिरामध्ये रामनवमी मोठा उत्साह दिसून येत आहे. सकाळपासून ऐतिहासिक मंदिरामध्ये राजकीय नेत्यांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. खासदार संजय राऊत, मंत्री माणिकराव कोकाटे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, छगन भुजबळ हे काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहेत.

  • 06 Apr 2025 10:54 AM (IST)

    06 Apr 2025 10:54 AM (IST)

    पुण्यात आगीची घटना

    कात्रज आणि भारती विद्यापीठ रुग्णालयात एका लॅबमध्ये आग लागल्याची घटना काल (दि.05) घडली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

  • 06 Apr 2025 10:51 AM (IST)

    06 Apr 2025 10:51 AM (IST)

    मुंबईला बसणार पाणीटंचाईची झळ

    मुंबई शहराला उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा देखील चटका बसणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या या सात तलावांमध्ये फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

  • 06 Apr 2025 10:50 AM (IST)

    06 Apr 2025 10:50 AM (IST)

    चक्क गृहराज्यमंत्र्यांचाच मोबाईल चोरीला

    संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्याती आली होती. यावरून संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता गृहराज्यमंत्री योगेश कदम हे बीड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांचा मोबाईल गायब झाल्याचा प्रकार घडला. खुद्द गृहराज्यमंत्र्यांच्या बाबतीत अशी घटना घडल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • 06 Apr 2025 10:49 AM (IST)

    06 Apr 2025 10:49 AM (IST)

    मुंबई लोकलचा आज मेगाब्लॉक

    मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

  • 06 Apr 2025 10:48 AM (IST)

    06 Apr 2025 10:48 AM (IST)

    कडून शेन वॉर्नचा विक्रम खालसा!

    आयपीएल 2025 च्या 18 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 50 धावांनी पराभव करत दुसरा विजय मिळवला. या सामन्यात पंजाब किंग्सला आयपीएल 2025 च्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थानने 205 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात पंजाबला 155 धावाच करता आल्या.

     

Web Title: Marathi breaking news today live updates add main events date 06 march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • marathi latest news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.