Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 18 वर्षीय कॅडेटचा मृत्यू

Marathi breaking live marathi- सकाळी राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये नियमित प्रशिक्षण होत असे. मात्र शुक्रवारी अंत्रीक्ष प्रशिक्षणासाठी गैरहजर होता. त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शोधले. तेव्हा तो खोलीत बेडशीटला लटक

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 13, 2025 | 06:36 PM
#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : पुण्याजवळील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये एका १८ वर्षीय कॅडेटचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्य झालेल्या तरुणाचे नाव पहिला टर्म कॅडेट अंत्रीक्ष कुमार सिंग असे असून तो मूळचा लखनऊ, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह शुक्रवारी पहाटे हॉस्टेलमधील आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर मृत कॅडेटच्या कुटुंबीयांनी थेट रॅगिंगचा आरोप केला आहे. यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. ही घटना अतिशय गंभीर असून संपूर्ण राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये याचे पडसाद उमटले आहेत.

The liveblog has ended.
  • 13 Oct 2025 06:36 PM (IST)

    13 Oct 2025 06:36 PM (IST)

    Nilesh Ghaywal: निलेश घायवळचा गेम ओव्हर; पोलिसांनी परदेशात लावली फिल्डिंग, आता थेट…

    पुणे/Crime News: कुख्यात निलेश घायवळ याला थेट आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना (इंटरपोल) मार्फत ’ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ बजावण्यात आली आहे.  भारत सरकारशी समन्वय साधून घायवळला ब्लु कार्नर नोटीस बजावण्यात आली आहे. घायवळ सातत्याने पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याचा ठावठिकाणा निश्चित होत नसल्यामुळे, अखेरीस तपास यंत्रणांनी इंटरपोलकडे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी धाव घेतली आहे. त्या मागणीनुसार इंटरपोलने ही महत्त्वपूर्ण ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

  • 13 Oct 2025 06:28 PM (IST)

    13 Oct 2025 06:28 PM (IST)

    IND vs WI 2nd Test : चौथ्या दिवसाचा खेळ संपला! भारत विजयापासून 58 धावा दूर; वेस्ट इंडिजला देणार क्लीन स्वीप?

    IND vs WI 2nd Test :  वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दूसरा कसोटी दिल्ली येथे अरुण जेटली स्टेडियमवर दूसरा कसोटी सामना  खेळला जात आहे.  या सामन्यात फॉलोऑन लागलेल्या वेस्ट इंडिजने ३९० धावा उभ्या करून भारतासमोर १२१ धावांचे टार्गेट दिले. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या शेवटच्या जोडी मैदानावर चांगली खेळत ७९ भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुजवले. वेस्ट इंडिजविरुद्ध विजयासाठी १२१ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने चौथ्या दिवसाच्या खेळाअखेर एका विकेटच्या मोबदल्यात ६३ धावा केल्या असून आता वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्यापासून भारत फक्त ५८ धावा दूर आहे.

  • 13 Oct 2025 06:12 PM (IST)

    13 Oct 2025 06:12 PM (IST)

    Priyanka Gandhi criticized RSS:आरएसएस कॅम्पमध्ये तरुणांचे लैंगिक शोषण? सुसाईड नोटवरून प्रियांका गांधींचा हल्लाबोल

    Priyanka Gandhi Controversial Remark on RSS: केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॅम्पमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे RSSच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. त्याचवेळी या प्रकारामुळे राजकारणही तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 13 Oct 2025 05:58 PM (IST)

    13 Oct 2025 05:58 PM (IST)

    असा मृत्यू नकोच रे बाबा! ट्रॅकवर अडकलेली बाईक उचलायला गेला, मागून Railway आली अन्...; Video Viral

    दिल्ली जवळ असणाऱ्या ग्रेटर नोएडा येथे एक भीषण घटना घडली आहे. सोशल मिडियावर रोज आपण असे अनेक व्हिडिओ पाहत असतो जे आनंद, दु:ख देणारे असे व्हिडिओ येत असतात. सध्या ग्रेटर नोएडा येथील एक भयानक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

  • 13 Oct 2025 05:01 PM (IST)

    13 Oct 2025 05:01 PM (IST)

    दुसऱ्यांची नव्हे तर स्वतःचीच लोकं मारतोय पाकिस्तान! तीन तासांत 280 नागरिक ठार तर 1900…, विषय काय?

    पाकिस्तान हा भारताच्या कायमच कुरापती काढत असतो. मात्र आता दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान स्वतःच अडचणीत आला आहे. पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. पाकिस्तानने आपल्याच नागरिकांचा जीव घेतला आहे. पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांनी आज मोठा नरसंहार केला आहे. यामध्ये 280 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

  • 13 Oct 2025 05:00 PM (IST)

    13 Oct 2025 05:00 PM (IST)

    कर्नाटक मध्ये संघ बंदीची मागणी करणाऱ्यांना महत्व देत नाही- देवेंद्र फडणवीस

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा येथील भाजप पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • 13 Oct 2025 04:55 PM (IST)

    13 Oct 2025 04:55 PM (IST)

    भाजपा पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

    उल्हासनगर कॅम्प 4 येथील श्रीरामनगर परिसरातील नागरिक गेल्या पाच दिवसांपासून पाण्याविना त्रस्त आहेत. पाणीपुरवठा विभागामार्फत शुक्रवारी 24 तासांचा शटडाउन घेण्यात आला होता, मात्र त्यानंतरही 9 ऑक्टोबरपासून सोमवार पर्यंत परिसरातील नागरिकांना पाण्याचा थेंबही मिळालेला नाही. या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आज संतप्त नागरिकांनी प्रभात गार्डन येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

  • 13 Oct 2025 04:50 PM (IST)

    13 Oct 2025 04:50 PM (IST)

    सप्टेंबर 2025 मध्ये 7 सीटर कारची जोरदार डिमांड

    भारतीय बाजारात महिंद्रा स्कॉर्पिओ ही एक लोकप्रिय कार आहे. कंपनीच्या या सात-सीटर एसयूव्हीला गेल्या महिन्यात मोठी मागणी आहे. आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात या सात-सीटर एसयूव्हीच्या 18372 युनिट्स विकल्या गेल्या, गेल्या वर्षी याच कालावधीत 14438 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

  • 13 Oct 2025 04:40 PM (IST)

    13 Oct 2025 04:40 PM (IST)

    करमाळा तालुक्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा

    सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळी सणामध्ये हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले होते. यानंतर जगताप यांच्या वक्तव्याचे राज्यभर वेगवेगळ्या पडतात पाहायला मिळाले. दरम्यान विधानसभा निवडणुका नंतर संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे वेळोवेळी पक्षाला टीकेला सामोरे जावे लागले आहे. यापूर्वी देखील पक्षाने आमदार जगताप यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी पक्षाची पक्ष सहमत नसल्याचे सांगत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगितले आहे.

  • 13 Oct 2025 04:40 PM (IST)

    13 Oct 2025 04:40 PM (IST)

    मोनिका राजळेंच्या दुर्लक्षावर वंचितचा संताप; 'काळया दिवाळी' चा थेट इशारा

    वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव संपर्क कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे राज्य सचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सकाळी अकराच्या सुमारास शेवगाव शहरातील आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. तर मोर्चा दुपारी दोन वाजता संपला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपा सरकार तसेच आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी ऊसाचा दर निश्चित करावा, कापसाला हमीभाव मिळावा, पोट खराब्याच्या दुरुस्त करून नोंदी लावण्यात याव्यात , भूमि अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवावा, अशा प्रमुख मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या.

  • 13 Oct 2025 04:35 PM (IST)

    13 Oct 2025 04:35 PM (IST)

    शिरपूर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत पारदर्शकपणे पार पडली

    शिरपूर पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षण सोडत आज शिरपूर तहसील कार्यालयात पारदर्शकपणे पार पडली. या सोडतीस उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र महाजन, निवासी तहसीलदार पंकज मगर, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. आरक्षण सोडतीच्या वेळी कार्तिक या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

  • 13 Oct 2025 04:30 PM (IST)

    13 Oct 2025 04:30 PM (IST)

    भाईंदरमध्ये कबुतर खाद्य विक्रेत्याने केली मारहाण, नागरिकावर चाकू हल्ला

    भाईंदर पश्चिम ६० फूट रस्त्यावर जैन मंदिराजवळ कबुतरांना खाद्य विकणाऱ्या दुकानदाराने चेतन दवे नावाच्या नागरिकावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार त्या वेळी घडला, जेव्हा दवे यांनी दुकानदाराला प्लास्टिकची ताडपत्री काढण्याची विनंती केली होती. सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य पदार्थ टाकण्यास बंदी घातली असतानाही मीरा-भायंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. जखमी चेतन दवे यांच्या मते, भाईंदर पश्चिमेच्या ६० फूट रस्त्यावर ज्या ठिकाणी कबुतरांना खाद्यपदार्थ टाकला जातो, त्या ठिकाणी दररोज ८ ते १० कबुतरांवर मांजर हल्ला करून त्यांना ठार मारते. त्यामुळे दवे यांनी दुकानदाराला सांगितले की, ज्या प्लास्टिकच्या आडोशात मांजर लपून कबुतरांवर हल्ला करते, ती ताडपत्री काढावी. मात्र, दुकानदाराने त्यांची विनंती न मानता उलट त्यांच्या वर चाकूने हल्ला केला. जखमी चेतन दवे यांच्या तक्रारीनंतर भायंदर पोलिसांनी दुकानदाराविरुद्ध एनसी दाखल केली आहे.

  • 13 Oct 2025 04:25 PM (IST)

    13 Oct 2025 04:25 PM (IST)

    आम्हाला टार्गेट केल्याशिवाय मजा येत नाही, चव्हाणांचा विरोधकांना टोला

    नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “वडीलांची पुण्याई म्हणजे त्यांच्या कार्याची महानता — त्यांना कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही,” असं सांगत त्यांनी आमदार चिखलीकरांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं.

  • 13 Oct 2025 04:23 PM (IST)

    13 Oct 2025 04:23 PM (IST)

    कल्याण-शीळ रस्त्यावरील कोंडीला तोडगा

    कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने  ही कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोडचे सात टप्प्यात काम करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कामाला गती मिळत असल्याचं  भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यांनी सांगितलं आहे.

  • 13 Oct 2025 04:18 PM (IST)

    13 Oct 2025 04:18 PM (IST)

    मतांची चोरी केल्याप्रकरणी आरोप प्रत्यारोपांची सरबत्ती

    मीरा भाईंदरमध्ये मतचोरी प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांची सरबत्ती सुरु आहे.  काँग्रेसच्या माजी नगरसेविका गीता परदेशी यांचे स्वतःचे नावसुद्धा दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार यादीत आहे. मात्र आम्ही त्यावर आरोप करत नाही, कारण अशा चुका निवडणूक आयोगाच्या तांत्रिक त्रुटीमुळे घडू शकतात.”भाजप नगरसेवकांनी काँग्रेसवर टीका करत सांगितले की, “काँग्रेसकडे जनतेसाठी दाखवण्यासारखे कोणतेही विकासकाम नाही. त्यामुळे त्यांनी खोटे आरोप करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.”

  • 13 Oct 2025 04:05 PM (IST)

    13 Oct 2025 04:05 PM (IST)

    21 वर्षांच्या अशनूरला सलमान खाननं खडसावलं, आई-वडील झाले भावूक

    ‘बिग बॉस १९’ची स्पर्धक असलेली अशनूर कौरला ‘वीकेंड का वार’च्या शेवटच्या आठवड्यात सलमान खानकडून बोलणं सहन करावे लागलं. या घटनेनंतर प्रेक्षकांनी सलमान खान आणि शोच्या निर्मात्यांवर पक्षपात केल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर टीका केली. अशनूरचे वडील गुरमीत सिंग आणि आई अवनीत कौर यांनी एका मुलाखतीत त्या भागाबद्दल मोकळेपणाने काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले, ”या भाग पाहिल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं, ते दोघेही रात्रभर झोपलं नाहीत. त्यांना या घटनेचा मानसिक दृष्ट्या खूप त्रास झाला”

  • 13 Oct 2025 03:52 PM (IST)

    13 Oct 2025 03:52 PM (IST)

    SBI PO मेन्स निकाल 2025 लवकरच जाहीर

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लवकरच SBI PO मेन्स परीक्षा 2025 चा निकाल जाहीर करणार आहे. देशभरातील हजारो उमेदवार या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मेन्स परीक्षा 13 सप्टेंबर 2025 रोजी देशभरात घेण्यात आली होती. उमेदवार आपला निकाल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in येथे पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असेल.

  • 13 Oct 2025 03:30 PM (IST)

    13 Oct 2025 03:30 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी रोहित आणि विराटची आकडेवारीच पुरेशी

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. बऱ्याच महिन्यानंतर क्रिकेटच्या त्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली एकत्र खेळताना दिसणार आहे. कसोटी क्रिकेट मधून आणि t20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर आता भारताचा संघ एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचाही संघात समावेश आहे. पण रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार नसणार आहे तो एक सीनियर प्लेयर म्हणून टीम इंडियामध्ये खेळताना दिसेल.

  • 13 Oct 2025 03:21 PM (IST)

    13 Oct 2025 03:21 PM (IST)

    ‘कांतारा चॅप्टर 1’मधील चूक सोशल मीडियावर झाली व्हायरल

    सगळीकडे कौतुक होत असताना आता चित्रपटातील एक मोठी चूक प्रेक्षकांच्या नजरेस पडली आहे. ही चूक कळताच तुम्ही डोक्याला हात लावाल. एवढ्या मोठ्या चित्रपटात अशी गफलत कशी झाली, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.सोशल मीडियावर प्रेक्षकांनी एका सीनमधील चूक दाखवून तिचा स्क्रीनशॉट व्हायरल केला आहे. ही चूक इतकी बारीक आहे की सहसा कुणाच्या लक्षात येणार नाही, पण प्रेक्षक काहीही सोडत नाहीत!

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 13 Oct 2025 03:14 PM (IST)

    13 Oct 2025 03:14 PM (IST)

    RSS Ban होणार? देशातील ‘हे’ राज्य मोठ्या निर्णयाच्या तयारीत मुख्यमंत्र्यांनी दिले थेट कारवाईचे आदेश

    CM Siddaramaiah: यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. या वर्षभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक उपक्रम, समाजपयोगी योजना राबवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संघाच्या शताब्दीनिमित नाणे, तिकीट जारी केले आहे. देशभरात संघ शताब्दी वर्ष साजरे करत असताना कर्नाटक सरकार आरएसएसवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. याला लरण ठरले आहे ते म्हणजे प्रियंक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यान लिहिलेले पत्र.

  • 13 Oct 2025 02:55 PM (IST)

    13 Oct 2025 02:55 PM (IST)

    जॉन कॅम्पबेलने दिल्ली जिंकली! विवियन रिचर्ड्स आणि कपिल देव या दिग्गज जोडीच्या यादीत झाला सामील…

    John Campbell joins special list : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियवर खेळला जात आहे. या समान्यत  जॉन कॅम्पबेलने १९९ चेंडूत ११५ धावा केल्या आहेत. कॅम्पबेलचे हे पहिले कसोटी शतक असून त्याने  रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले.

  • 13 Oct 2025 02:50 PM (IST)

    13 Oct 2025 02:50 PM (IST)

    महायुतीला रवींद्र धंगेकर पडणार भारी? युतीच्या पक्षातील नेत्याची करतायेत पोलखोल

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आलेल्या असताना पुण्यामध्ये राजकीय वांदग निर्माण झाला. महायुतीमध्ये अंतर्गत कलह वाढला असून जोरदार वाद-विवाद सुरु आहे. निलेश घायवळ प्रकरणामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेल्या रवींद्र धंगेकर यांनी विकासाच्या मुद्द्यावरुन अनेकदा भाजप नेत्यांवर निशाणा साधला. मात्र आता शिवसेना शिंदे गटामध्ये असताना देखील रवींद्र धंगेकर टीका करत असल्यामुळे धंगेकर हे महायुतीला पुण्यात भारी पडत असल्याच्या चर्चा आहेत.

  • 13 Oct 2025 02:46 PM (IST)

    13 Oct 2025 02:46 PM (IST)

    धाकधूक वाढली! कर्जत पंचायत समितीचे आरक्षण सोडत

    कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत पंचायतीत निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. कर्जत पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणमुळे गेली दोन ते अडीच वर्षे पुढे ढकलली गेलेली आरक्षण सोडतीमुळे तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

  • 13 Oct 2025 02:44 PM (IST)

    13 Oct 2025 02:44 PM (IST)

    ‘बिग बॉस’च्या घरात पाणीपुरीमुळे पुन्हा सुरु झाला राडा

    ‘बिग बॉस १९’ च्या आगामी नॉमिनेशन टास्कमध्ये सर्व स्पर्धकांमध्ये जबरदस्त भांडण होताना दिसणार आहे. कारण अमाल मलिक आणि अभिषेक बजाज पुन्हा एकदा एकमेकांशी भिडणार आहेत. नॉमिनेशन टास्कमधील भांडणानंतर घरातील सदस्यांमध्ये तणाव वाढला आहे. दोघांमध्ये अनेक वेळा भांडणे झालेली दिसून आली आहेत. आता, ते पुन्हा एकदा एकमेकांसमोर येऊन भिडताना दिसणार आहेत. शिवाय, मालती चहर आणि मृदुल तिवारी यांच्यात देखील वाद होताना दिसणार आहे. दरम्यान, गौरव खन्ना आणि बसीर अली यांच्यातही हाणामारी झाली. बिग बॉस सीझन १९ चा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

  • 13 Oct 2025 02:25 PM (IST)

    13 Oct 2025 02:25 PM (IST)

    बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ केल्यानंतर ‘Lokah Chapter 1’ ओटीटीवर सज्ज, कधी आणि कुठे होणार प्रदर्शित?

    मल्याळम चित्रपट सध्या खूप लोकप्रिय होत आहेत. त्यांच्या अनोख्या कथानकांमुळे लोकांना हे चित्रपट खूप आवडत आहेत. अलिकडेच कल्याणी प्रियदर्शिनी यांचा ‘लोका चॅप्टर १ चंद्रा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट लगेचच हिट झाला आणि त्याने कोट्यवधी रुपये कमावले. थिएटरमध्ये हिट झाल्यानंतर, ‘लोका चॅप्टर १ चंद्रा’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्याची ओटीटी रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे.

  • 13 Oct 2025 02:20 PM (IST)

    13 Oct 2025 02:20 PM (IST)

    Vaibhav Suryavanshi नव्या भूमिकेत! या संघाचे सांभाळणार उपकर्णधारपद, रणजी ट्रॉफीचे खेळणार सामने

    भारताचा अंडर 19 संघ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. यामध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी एकदिवसीय मालिकेमध्ये धुमाकूळ घालून मालिका जिंकले होते. टीम इंडियाच्या अंडर 19 संघामधील असे काही खेळाडू आहेत जे आयपीएल देखील खेळतात. आयपीएलमध्ये आता नव्या नियम तयार करण्यात आला आहे. आयपीएल मध्ये खेळण्यासाठी कमीत कमी दोन देशांतर्गत सामने खेळणे गरजेचे आहे. आता लवकरच रणजी ट्रॉफीचा हंगाम सुरू होणार आहे आणि त्यामध्ये अनेक स्टार खेळाडू हे सामील होताना दिसणार आहेत.

  • 13 Oct 2025 02:15 PM (IST)

    13 Oct 2025 02:15 PM (IST)

    Vi चा नवा AI गार्ड, स्पॅम आणि फ्रॉड कॉल्सपासून मिळणार पूर्ण संरक्षण

    जर तुम्हाला स्पॅम आणि फसव्या कॉल्सचा त्रास होत असेल आणि काय करावे हे माहित नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. व्होडाफोन आयडियाने व्ही प्रोटेक्ट नावाचा एआय-संचालित उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश स्पॅम आणि सायबर हल्ल्यांपासून सुरक्षा सुधारणे आहे. ही घोषणा इंडिया मोबाइल काँग्रेस २०२५ (आयएमसी २०२५) मध्ये करण्यात आली. चला त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • 13 Oct 2025 01:59 PM (IST)

    13 Oct 2025 01:59 PM (IST)

    शेतीच्या वादातून ७२ वर्षीय महिलेला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, तीन पुतणे आणि सुनांना अटक

    बीड येथून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव छबू देवकर असे आहे. तीन पुतण्यांनी व त्यांच्या सुनांनी मिळून कोयता आणि लोखंडी पाइपने छबू देवकर यांच्यावर हल्ला केला. ही घटना आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गावात शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता घडली. यांनतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

  • 13 Oct 2025 01:55 PM (IST)

    13 Oct 2025 01:55 PM (IST)

    BSNL युजर्सची समस्या संपली! इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी हि आहे बूस्टर ट्रिक! 100 पैकी 80 लोकांना माहिती नाही….

    सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन प्लॅन लाँच करत असते. या प्लॅनची खासियत म्हणजे कमी किंमतीत जास्त फायदे. BSNL च्या रिचार्ज प्लॅनची किंमती अत्यंत कमी असते. मात्र त्यांच्या फायद्यांमध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. म्हणजेच BSNL त्यांच्या युजर्सना परवडणाऱ्या किंमतीत उत्तम फायदे देते. त्यामुळे रिचार्ज प्लॅनच्या किंमती आणि फायद्यांच्या बाबतीत BSNL युजर्स सहसा कोणतीही तक्रार करत नाहीत. पण जेव्हा BSNL च्या नेटनर्कबाबत विचारलं जात, युजर्स तक्रारींता पाढा वाचायला सुरुवात करतात.

  • 13 Oct 2025 01:50 PM (IST)

    13 Oct 2025 01:50 PM (IST)

    आयआयटी जॅम एक्झामसाठी नोंदणी तारीखमध्ये वाढ, आता 20 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

    इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने पदव्युत्तर पदवीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (JAM) २०२६ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अंतिम मुदतीपर्यंत अर्ज भरता आला नाही ते आता jam2026.iitb.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.IIT ने याबाबत आता महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे २० तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करून फॉर्म भरू शकता आणि त्यानंतर परीक्षा देऊ शकता.

  • 13 Oct 2025 01:40 PM (IST)

    13 Oct 2025 01:40 PM (IST)

    NDAचं जागावाटप निश्चित; कुणाला मिळाल्या किती जागा? महाआघाडीचं घोडं कुठे अडलं?

    बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए’चं जागावाटप निश्चित झाल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री आणि बिहारचे भाजप प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी जागावाटपासंदर्भात घोषणा केली आहे. एनडीएच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, भाजप आणि जेडीयू दोन्ही प्रत्येकी १०१ जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपी (आर) २९ जागांवर निवडणूक लढवेल. जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाला ०६ जागा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) लाही ०६ जागा देण्यात आल्या आहेत.

  • 13 Oct 2025 01:35 PM (IST)

    13 Oct 2025 01:35 PM (IST)

    फक्त फोटोशूट नव्हे, अभिनेत्री अश्विनी महांगडे शेतात राबली सुद्धा! नेटकऱ्यांकडून कौतुक… पहा फोटो

    सिनेविश्वातील ग्लॅमर, प्रसिद्धी आणि झगमगाटापासून दूर राहून आपली माती आणि मूळाशी नातं टिकवणारी अभिनेत्री म्हणून ओळख मिळवणारी अश्विनी महांगडे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मराठी मालिकेत ‘अनघा’ ही भूमिका साकारणारी अश्विनी खऱ्या आयुष्यात मात्र एक शेतकऱ्याची लेक आहे. आणि ती ही ओळख अत्यंत अभिमानाने जपत आहे. अश्विनी महांगडे ही सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी कोणत्याही मालिकेमुळे नव्हे, तर तिच्या साधेपणा आणि मातीवरील प्रेमामुळे.

  • 13 Oct 2025 01:25 PM (IST)

    13 Oct 2025 01:25 PM (IST)

    टाटा कॅपिटलच्या आयपीओची फ्लॅट लिस्टिंग; शेअर्स 330 वर सुरू, गुंतवणूकदारांनी काय करावे?

    टाटा समूहाची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी असलेल्या टाटा कॅपिटलच्या ₹१५,५०० कोटींच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगमधील शेअर्स सोमवारी (१३ ऑक्टोबर) शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. कंपनीचे शेअर्स बीएसईवर ₹३३० वर सूचीबद्ध झाले. हे ₹३२६ च्या इश्यू किमतीपेक्षा १.२३% किंवा ₹४ ची वाढ दर्शवते. दरम्यान, कंपनीचे शेअर्स एनएसईवर ₹३३० वर सूचीबद्ध झाले. टाटा कॅपिटलच्या आयपीओ लिस्टिंगने ग्रे मार्केटमध्ये अपेक्षा पूर्ण केल्या.

  • 13 Oct 2025 01:15 PM (IST)

    13 Oct 2025 01:15 PM (IST)

    घाटरस्ते सुधारण्याचं काम युद्धपातळीवर सुरु ; पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु

    पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानला  जाण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्यावर मागील पाच महिने सुरु असलेल्या पावसाने दुरवस्था केली होती. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी वाहून नेणारी गटारे बंद झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी हे डांबरी रस्त्याने वाहत जात असते आणि त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. दरम्यान नेरळ माथेरान घाटरस्त्याची दुरुस्ती रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून भरले जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे सुरु असून आगामी काही दिवसांनी माथेरान येथील पर्यटन हंगाम सुरु होत असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल नेरळ माथेरान टॅक्सी संघटना यांच्याकडून बांधकाम खात्याचे आभार मानले जात आहेत.

  • 13 Oct 2025 01:09 PM (IST)

    13 Oct 2025 01:09 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊतांची प्रकृती बिघडली; तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट

    शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या तब्येत अचानक बिघडली आहे. भांडुप मधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना उपचारासाठी ॲडमिट करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टीज हॉस्पिटल मध्ये आपली रक्त तपासणी केली होती. त्यांना घशाचा त्रास होत असल्याची माहिती आहे. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

  • 13 Oct 2025 01:00 PM (IST)

    13 Oct 2025 01:00 PM (IST)

    मुंडकं नसलेल्या मृतदेहासोबत 3 महिने राहिली महिला

    एक महिला तिच्या घरात रूममेटचा मृतदेहा मुंडकं नसलेल्या मृतदेहासोबत 3 महिने राहिल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण फ्रान्सच्या कार्पेंट्रास शहरातील आहे. तिच्या शेजाऱ्यांना कुजलेला वास आल्यानंतर हा प्रकरण समोर आला. साठ वर्षीय पास्कल बी. असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

  • 13 Oct 2025 12:52 PM (IST)

    13 Oct 2025 12:52 PM (IST)

    संजय राऊतांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट

    संजय राऊत यांच्या तब्येत अचानक बिघडली आहे. भांडुप मधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना उपचारासाठी अॅडमिट करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टीज हॉस्पिटल मध्ये आपली रक्त तपासणी केली होती. त्यांना घशाचा त्रास होत असल्याची माहिती आहे

  • 13 Oct 2025 12:45 PM (IST)

    13 Oct 2025 12:45 PM (IST)

    पबच्या बाथरूममध्ये आढळला बँक मॅनेजरचा मृतदेह

    बंगळुरूच्या पब मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पबच्या बाथरूममध्ये एका ३१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. मृत तरुण हा बँक मॅनेजर म्हणून कार्यरत होता. ही घटना गुरुवारी (9 ऑक्टोबर) बंगळुरूच्या राजराजेश्वरी नगर परिसरात घडली आहे.

  • 13 Oct 2025 12:30 PM (IST)

    13 Oct 2025 12:30 PM (IST)

    IT सॉफ्टवेअर इंजीनिअरने संपवले जीवन

    केरळमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS वर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. बालपणापासून आतापर्यंत त्याच कसं लैंगिक शोषण झालं, या बद्दल त्याने सांगितले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणांचे नाव आनंदु अजी असे आहे. त्याचा मृतदेह तिरुवनंतपुरमच्या थंबानूर येथील एका लॉजमध्ये मिळाला.

  • 13 Oct 2025 12:20 PM (IST)

    13 Oct 2025 12:20 PM (IST)

    केमिकलने खोट्या 500 रुपयांच्या नोटा बनवायचे, ATS ला माहिती मिळताच लावला ट्रॅप

    राजस्थान पोलिसांच्या अजमेर एटीएस टीमने भिलवाडा येथे एका हायटेक फसवणुकीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपी तरुण हे केमिकलचा वापर करून ५०० रुपयांच्या खऱ्या नोटा बनवण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालत होते. याप्रकरणी एटीएसने शनिवारी रात्री उशिरा कारवाई करत तीन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 500−500 रुपयांच्या नोटांच्या आकाराचे कागदाचे तीन बंडल जप्त करण्यात आले आहेत.

  • 13 Oct 2025 12:10 PM (IST)

    13 Oct 2025 12:10 PM (IST)

    राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 18 वर्षीय कॅडेटचा मृत्यू

    पुण्याजवळील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये एका १८ वर्षीय कॅडेटचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्य झालेल्या तरुणाचे नाव पहिला टर्म कॅडेट अंत्रीक्ष कुमार सिंग असे असून तो मूळचा लखनऊ, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह शुक्रवारी पहाटे हॉस्टेलमधील आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर मृत कॅडेटच्या कुटुंबीयांनी थेट रॅगिंगचा आरोप केला आहे. यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. ही घटना अतिशय गंभीर असून संपूर्ण राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये याचे पडसाद उमटले आहेत.

  • 13 Oct 2025 12:03 PM (IST)

    13 Oct 2025 12:03 PM (IST)

    दुसऱ्या धर्मातील लोकांनी ज्ञान पाजळू नका - बागेश्वर धाम

    बागेश्वर धाम सरकार हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. बागेश्वर धाम यांनी दिवाळीमध्ये होणाऱ्या प्रदुषणावर टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, दिवाळीमध्ये सावधगिरी बाळगा. पण इतर कोणत्याही धर्मातील लोकांनी आम्हाला ज्ञान पाजळू नका. आम्ही तुमच्या बकरी ईदला ज्ञान द्यायला येत नाही. त्यामुळे तुम्ही दिवाळीमध्ये किती प्रदूषण होतं हे सांगायला येऊ नका. त्याचबरोबर इथे असणाऱ्या अभिनेता-अभिनेत्रींना सुद्धा मी सांगतो. दिवाळीमध्ये प्रदूषण होतं, फटाके कमी वाजवले पाहिजेत. पण आम्ही वाजवणारच, अशा शब्दांत बागेश्वर धाम यांनी प्रदूषण होते म्हणणाऱ्यांवर निशाणा साधला.

  • 13 Oct 2025 12:00 PM (IST)

    13 Oct 2025 12:00 PM (IST)

    'जंगल राज' परत हवे आहे का...? अजय आलोक यांचा सवाल

    बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए आघाडीकडून कोणतीही जागावाटप जाहीर करण्यात आलेले नाहीय. याबाबत भाजप नेते अजय आलोक म्हणाले की, "निवडणुकांना अजून २० दिवस शिल्लक आहेत; कठोर परिश्रम करा, लोकांचा विश्वास जिंका. भाजपने काय केले? नितीशने काय केले? स्वतःची काळजी करा... त्यांना बिहारमध्ये कोणते बदल करायचे आहेत? त्यांना 'जंगल राज' परत हवे आहे का..." अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

  • 13 Oct 2025 11:50 AM (IST)

    13 Oct 2025 11:50 AM (IST)

    कफ सिरप मृत्यू प्रकरणी ED ची छापेमारी

    संपूर्ण देशामध्ये अनेक मुलांचा मृत्यू करणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरप मृत्यू झाला. या प्रकरणाच्या संदर्भात कांचीपुरम जिल्ह्यातील सुंगुवरचत्रम येथील श्रीसन फार्मा येथे ईडीने छापा टाकला आहे.

    #WATCH | Tamil Nadu: ED raid underway at Sreesan Pharma in Sunguvarchatram, Kancheepuram district, in connection with the case of Coldrif cough syrup, which caused the death of several children. pic.twitter.com/8s24FgOcSA

    — ANI (@ANI) October 13, 2025

  • 13 Oct 2025 11:40 AM (IST)

    13 Oct 2025 11:40 AM (IST)

    नोएडामध्ये 550 किलो बनावट चीज नष्ट

    उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील अन्न सुरक्षा विभागाने ५५० किलो चीज नष्ट केले आहे. या बनावट चीजचा वास खूप वाईट होता. अशा चीजचा पुरवठा दररोज एनसीआरला केला जात असे. सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे अन्न व सुरक्षा विभाग सतर्क झाला असून बनावट खाद्यपदार्थांपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले जात आहे.

    यूपी– नोएडा में फूड सेफ्टी विभाग ने 550 KG पनीर नष्ट कराया, इससे बदबू आ रही थी। ऐसा पनीर रोजाना NCR में सप्लाई होता था। pic.twitter.com/obbp25rQDt

    — Sachin Gupta (@SachinGuptaUP) October 12, 2025

  • 13 Oct 2025 11:25 AM (IST)

    13 Oct 2025 11:25 AM (IST)

    हातात हात घालून दिवाळी पार्टीत पोहोचले तारा सुतारिया आणि वीर पहाडिया

    बॉलिवूडमध्ये दिवाळीपूर्वीच्या पार्ट्या सुरू झाल्या आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने काल दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अनेक बी-टाउन सेलिब्रिटी आकर्षक लूकमध्ये दिसले. बॉलिवूडमधील नवीन रोमँटिक कपल, तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 13 Oct 2025 11:20 AM (IST)

    13 Oct 2025 11:20 AM (IST)

    बिहार निवडणुकांसाठी NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

    बिहारमध्ये अनेक दिवसांच्या चर्चे आणि विचारविनिमयानंतर, एनडीएने रविवारी (१२ ऑक्टोबर २०२५) जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला, तर विरोधी महाआघाडी अद्याप अनिर्णित आहे. नितीश कुमार यांचा पक्ष, जेडीयू आणि भाजप प्रत्येकी १०१ जागा लढवतील, तर ४० जागा चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एनडीएचा भाग असलेले जेडीयू आणि भाजप समान संख्येने जागा लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे. नामांकनाच्या पहिल्या टप्प्याच्या अंतिम मुदतीपूर्वी एक आठवड्यापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना एनडीएमधील जागावाटपाची घोषणा करण्यात आली आहे.

  • 13 Oct 2025 11:12 AM (IST)

    13 Oct 2025 11:12 AM (IST)

    स्वामी विवेकानंदांच्या शिष्या समाजसेविका भगिनी निवेदिता यांची पुण्यतिथी

    मूळच्या भारतीय नसून भारताच्या समाजासाठी पूर्ण जीवन समाजकार्य करणाऱ्या भगिनी निवेदिता यांची आज पुण्यतिथी. भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट नोबल असे होते. या स्वामी विवेकानंदांच्या आयरिश शिष्या होत्या, ज्यांनी शिक्षण, समाजसेवा आणि भारतीय संस्कृतीच्या प्रचारासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी कोलकाता येथे मुलींसाठी शाळा उघडली आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्येही योगदान दिले. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा दिली आणि ‘निवेदिता’ हे नाव दिले, ज्याचा अर्थ “देवाला समर्पित” असा होतो. स्वामी विवेकानंद यांच्या निधनानंतर त्या श्री अरबिंदो यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक बनल्या.

  • 13 Oct 2025 11:10 AM (IST)

    13 Oct 2025 11:10 AM (IST)

    निवडणुकीच्या तोंडावर लालू आणि तेजस्वींना घेरण्याची तयारी

    बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीच्या विविध न्यायालयांमध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अनेक खटल्यांची सुनावणी आज (१३ ऑक्टोबर) होणार आहे. यापैकी काही प्रकरणांमध्ये त्यांना प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे, तर काही प्रकरणांमध्ये त्यांच्या गैरहजेरीतही सुनावणी होऊ शकते.

  • 13 Oct 2025 10:48 AM (IST)

    13 Oct 2025 10:48 AM (IST)

    ‘कोकण कोहिनूर’ ची घरवापसी!

    सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमीच चर्चेत असते. या शोमधील अनेक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे ओंकार भोजने. ‘अगं अगं आई…’ असो किंवा ‘साइन कॉस थिटा’ ओंकारने अनेक भूमिकाकरून स्किट्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि त्यांच्या मनात घर केलं आहे. कोकण कोहिनूर ही ओळख त्याला हास्यजत्रेमुळे मिळाली. तसेच जेव्हा जेव्हा तो स्किट्समध्ये दिसला आहे तेव्हा ते गाजलं आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates political national crime sports international entertainment lifestyle breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 09:11 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
2

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
3

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.