Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

Marathi breaking live marathi headlines -जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 22, 2025 | 03:13 PM
LIVE
Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात
Follow Us
Close
Follow Us:
  • 22 Aug 2025 03:13 PM (IST)

    22 Aug 2025 03:13 PM (IST)

    ICC ने बदलले महिला विश्वचषकाचे वेळापत्रक, बेंगळुरूकडून हिसकावले यजमानपद

    भारताचा महिला संघ सध्या आगामी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करत आहेय बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे, यामध्ये भारताचा संघ हा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळणार आहे. तर या संघाची उपकर्णधार स्मृती मानधना असणार आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 22 Aug 2025 03:03 PM (IST)

    22 Aug 2025 03:03 PM (IST)

    आयपीएलचा ‘किंग’ MI आता ‘The Hundred’ लीगमध्येही करणार एंट्री, नव्या नावाने करणार ‘धमाल’!

    आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ, आता जगभरातील इतर क्रिकेट लीगमध्येही आपला दबदबा निर्माण करत आहे. अमेरिकेपासून ते यूएईपर्यंत, जिथे जिथे क्रिकेट लीग होतात, तिथे एमआयचा (MI) संघ दिसतो. नुकतेच, नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ लीगमध्ये (The Hundred) एक संघ खरेदी केला आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 22 Aug 2025 02:30 PM (IST)

    22 Aug 2025 02:30 PM (IST)

    कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात

    कल्याण पश्चिम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील इमारतींमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. गोविंदवाडी बायपास रोडवर असलेल्या इमारतीवर महापालिकेची कोणतेही परवानगी न घेता लग्नाचा हॉल उभारण्यात आला.

  • 22 Aug 2025 02:30 PM (IST)

    22 Aug 2025 02:30 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनची दहशत!

    पिंपरी : चिंचवड राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना दररोज उघडकीस येत आहेत. गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. पोलिसही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एका अज्ञात व्यक्तीने ‘मास्क मॅन’च्या रूपाने खळबळ उडवून दिली आहे. चेहऱ्यावर मास्क, आणि हातात धारदार चाकू घेऊन भरदिवसा रस्त्यावर वावरताना मास्क मॅन नागरिकांना दिसला आहे.

  • 22 Aug 2025 02:29 PM (IST)

    22 Aug 2025 02:29 PM (IST)

    पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..

    Thane News: माजी मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबार मालिकेत आज तिसरा जनता दरबार गडकरी रंगायतन येथे पार पडला. यापूर्वी पहिला दरबार खारकर आळी येथे आणि दुसरा डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. नागरिकांच्या विविध तक्रारी व अडचणी ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दरबारात बोलताना गणेश नाईक म्हणाले की, त्यांच्या समस्या नक्कीच सोडवल्या जातील. सामान्य माणसांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर ठोस कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले

  • 22 Aug 2025 02:21 PM (IST)

    22 Aug 2025 02:21 PM (IST)

    भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा

    Pune human skeleton on road : पुणे : अक्षय फाटक : शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वर्दळीच्या ठिकाणी एक विचित्र प्रकार घडलेला दिसून आला आहे. लोकांची गर्दी असलेल्या नगर रस्त्यावर भरदुपारी एका ठिकाणी मानवी सांगाडा पडला असल्याचे दिसून आले. सांगाडा असल्याची माहिती वाऱ्यासारखी येरवडा परिसरात समजली अन् एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव तर घेतली, पण यामुळे एक भीतीचं वातावरण पसरलं. गोंधळही उडाला.

  • 22 Aug 2025 02:21 PM (IST)

    22 Aug 2025 02:21 PM (IST)

    अखेर मुहूर्त ठरलाच! आगामी आयफोनची लाँच डेट Leak

    टेक जायंट कंपनीचा आगामी ईव्हेंट सप्टेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांची बहुप्रतिक्षित आयफोन 17 सिरीज लाँच करणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासूमन कंपनीच्या या ईव्हेंटची चर्चा सुरु आहे. हा ईव्हेंट सप्टेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे, हे सांगितलं असलं तरी देखील या ईव्हेंटची नेमकी तारीख काय असणार याबाबत अद्याप माहिती समोर आली नव्हती. किंवा कंपनीने देखील याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र आता कंपनीच्या एका चुकीमुळे या ईव्हेंटची तारीख लिक झाली आहे.

  • 22 Aug 2025 02:21 PM (IST)

    22 Aug 2025 02:21 PM (IST)

    क्रीडा मंत्रालयाकडून नवीन नियमावली!

    BCCI elections to be held under new Sports Ministry law :  सप्टेंबरमध्ये बीसीसीआयची निवडणूक होणार आहे. बीसीसीआयकडून  सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याच्या नवीन नियमांनुसार निवडणुका घेण्यात याव्यात अशी क्रीडा मंत्रालयाचा मानस आहे. जर बीसीसीआयने या नवीन कायद्याच्या नियमांची अधिसूचना तोपर्यंत जारी केली नाही, तर मात्र सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मंजूर केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार निवडणुका घेण्यात येऊ शकतात.

  • 22 Aug 2025 02:15 PM (IST)

    22 Aug 2025 02:15 PM (IST)

    रंगारी बदक सार्वजनिक गणपती मंडळ

    Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव म्हटलं की मुंबईकरांना आठवतं ते ती सार्वजनिक गणपती. लालबागच्या राजापासून ते तेजुकाया आणि खेतावाडीचा राजा असो प्रत्येक मुंबईकर हा गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाने सामील होत असतो. पण तुम्हाला माहितेय का मुंबईतील या सावर्जनिक गणपती मंडळापैकी असं एक मंडळ आहे जे एका क्रांतीकारकाच्या विचारांनी प्रेरित झालेलं आहे.

  • 22 Aug 2025 02:15 PM (IST)

    22 Aug 2025 02:15 PM (IST)

    Parliament Security Breach: ‘लोकशाही’च्या मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर? इसम आला, भिंतीवरून उडी मारली अन्…

    नवी दिल्ली: भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. लोकसभा आणि लोकसभा हे देशाच्या लोकशाहीचे मंदिर आहे. मात्र हेच लोकशाहीचे मंदिर म्हणजे संसद भवन सुरक्षित आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण देखील असेच आहे. कारण एक व्यक्ती संसदेची सुरक्षा व्यवस्थेला चकवून गरुड द्वारापर्यन्त पोहोचल्याचे समोर आले आहे. संसद भवन परिसरात नेमके काय घडले? ते जाणून घेऊयात.

  • 22 Aug 2025 01:50 PM (IST)

    22 Aug 2025 01:50 PM (IST)

    ऑनलाइन गेमशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स घसरले

    रिअल मनी गेमशी संबंधित कंपन्या आणि त्यांचे गुंतवणूकदार सरकारच्या ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ मुळे घाबरले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यापासून त्यांचे शेअर्स घसरत आहेत. नजरा टेकचा शेअर फक्त तीन दिवसांत तो १८% पेक्षा जास्त घसरला आहे, तर डेल्टा कॉर्पपासून ऑन-मोबाइल ग्लोबलपर्यंत या क्षेत्राशी संबंधित इतर कंपन्यांचे शेअर्स देखील विखुरलेले दिसत आहेत.

  • 22 Aug 2025 01:45 PM (IST)

    22 Aug 2025 01:45 PM (IST)

    “फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये", खासदार राऊतांचे टीकास्त्र

    देशामध्ये उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी जोरदार राजकारण रंगले असून नेत्यांच्या भेटीगाठी आणि फोन सुरु झाले आहेत. येत्या 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना तर इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतदानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांना फोन केले आहेत. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

  • 22 Aug 2025 01:40 PM (IST)

    22 Aug 2025 01:40 PM (IST)

    महाराष्ट्र, उत्तराखंडसह अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट

    गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे आणि नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मुसळधार पावसामुळे, आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनेक लोकल ट्रेन सेवा रद्द करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

     

  • 22 Aug 2025 01:37 PM (IST)

    22 Aug 2025 01:37 PM (IST)

    छगन भुजबळांच्या पालकमंत्रीपदाला सुहास कांदेंचा विरो

    नाशिक जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतल वाद अद्यापही काय आहे. १५ ऑगस्टला ध्वजारोहणावरूनही मंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यातील नाराजीनाट्य समोर आले होते. त्यातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे दिसत आहे. पण त्याचवेळी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मात्र भुजबळ यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध केला आहे.

  • 22 Aug 2025 01:25 PM (IST)

    22 Aug 2025 01:25 PM (IST)

    पुण्यात पावसाचा जोर ओसरला

    पुण्यात गेले चोवीस तासांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे.काल दिवसभर ढगाळ वातावरण आणि ऊन असा लपंडाव सुरू होता. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. शहरामध्ये तीन दिवस झालेल्या पावसाने काही ठिकाणी वाहतूक कोंडी, काही ठिकाणी पूर परिस्थिती तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आलेले पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे भरली आणि विसर्ग सुरू झाल्याने ओढ्या-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली. मात्र,मागील २४ तासांत पावसाचा जोर ओसरला आणि दिवसभर उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळी तुरळक ठिकाणी पावसाची अतिहलक्या सरी पडल्या.

  • 22 Aug 2025 01:15 PM (IST)

    22 Aug 2025 01:15 PM (IST)

    भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

    भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये टाकण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचा आदेश बदलला असून, कुत्र्यांना वैक्सीन दिली जाईल आणि पुन्हा त्याच क्षेत्रात सोडले जाईल. परंतु सार्वजनिक ठिकाणी अन्न दिलं जाणार नाही. अन्न देण्यासाठी वेगळी सोय करावी. नसबंदी करून पुन्हा कुत्र्यांना सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना, या केसचा पॅन इंडिया विस्तार केला आहे. भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना 25 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. प्राणीप्रेमी कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी एमसीडीकडे अर्ज करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

  • 22 Aug 2025 01:05 PM (IST)

    22 Aug 2025 01:05 PM (IST)

    'ओबीसी'मध्ये फूट पाडणे, हा षडयंत्राचा भाग; लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया

    लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे." ओबीसीमध्ये फूट पाडणे, हा षडयंत्राचा भाग आहे. मी अशा पद्धतीने बोलणं म्हणजे एवढा, पण लक्ष्मण हाके मूर्ख नाही किंवा माझी एवढी पण वैचारिक दिवाळखोरी नाहीये. ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे, यापुढे अशा पद्धतीने प्रयोग होणार आहेत, या अगोदर देखील असे प्रयोग झालेले आहेत. माझी गाडी देखील फोडण्यात आली आहे. मला मारहाणीचा देखील प्रयत्न झालेला आहे. ओबीसी चळवळीमध्ये फूट पडेल किंवा ओबीसी चळवळ डॅमेज करण्याचा प्रयत्न होत असेल तर, ओबीसी बांधवांनी ते करू नये," असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

  • 22 Aug 2025 12:50 PM (IST)

    22 Aug 2025 12:50 PM (IST)

    गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळेत वाढ

    गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मेट्रो या काळात सकाळी 6 वाजता ते रात्री 2 वाजेपर्यंत चालणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे

  • 22 Aug 2025 12:40 PM (IST)

    22 Aug 2025 12:40 PM (IST)

    रामदास आठवलेंचा टोला

    'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती', मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांची फक्त सभा घेण्यापूर्वी ताकद, त्यांना मत पडत नाहीत, त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट फक्त जमत, असे म्हणत आठवलेंनी डिवचलं आहे. रामदास आठवले धाराशिव दौऱ्यावर आहेत.

  • 22 Aug 2025 12:30 PM (IST)

    22 Aug 2025 12:30 PM (IST)

    पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन

    पुरंदर विमानतळ बाबत राज्य सरकारने हा विमानतळ करण्याचे निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. काही गावांमध्ये १२८५ एकर जमीन भूसंपादन सहमती पत्र सादर करण्याकरिता सूचना देऊन अंमलबजावणी सुरू करतील.काही लोकांचा विरोध आहे चर्चेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू, असे पवार म्हणाले.

  • 22 Aug 2025 12:20 PM (IST)

    22 Aug 2025 12:20 PM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात मास्क मॅन ची दहशत

    निगडी येथील बजाज ऑटोमोबाईल समोरील पेट्रोल HP पंपाजवळ काही वेळापूर्वी मास्क मॅन हातात धारदार चाकू घेऊन रस्ता क्रॉस करत असताना दिसत आहे. मास्क मॅन गुन्हेगाराने आपल्या चेहऱ्यावर मास्क घालून आपली ओळख लफविल्याने, तसेच हातात धारदार चाकू घेऊन वावरत असल्याने रस्त्या वरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये मास्क मॅनची मोठी दहशत निर्माण झाली आहे. आता या हातात चाकू घेऊन पिंपरी चिंचवड शहरात वावरणाऱ्या मास्क मॅन च्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलीस कधी आवडणार..... याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

  • 22 Aug 2025 12:10 PM (IST)

    22 Aug 2025 12:10 PM (IST)

    एस टी कर्मचाऱ्यांना मिळणार गणेशोत्सवामुळे आगाऊ पगार

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आगामी गणेशोत्सवामध्ये लवकरच पगार दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील पुढील महिन्याचा पगार गणपती आधी मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले आहेत. वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाइल सादर करण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

     

  • 22 Aug 2025 12:00 PM (IST)

    22 Aug 2025 12:00 PM (IST)

    कारगाडी कालव्यात पडून दोघा जिवलग मित्रांचा मृत्यू

    वेगात वाहने चालवल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पिंपळनेर (ता.माढा) हद्दीतील कालव्यात जाऊन पलटी झाली. यामध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि.21) रात्री साडेअकराच्या सुमारास कुर्डुवाडी-टेंभुर्णी रस्त्यावरील पिंपळनेर येथील कालव्यात घडली.

  • 22 Aug 2025 12:00 PM (IST)

    22 Aug 2025 12:00 PM (IST)

    ठाकरे बंधूंच्या युतीवर रामदास आठवलेंची मिश्किल कविता

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची शक्यता आहे. यावर रामदास आठवले यांनी त्यांच्या शैलीमध्ये खास कविता केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती, मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती, अशी रामदास आठवलेंची कविता राजकीय वर्तुळात गाजते आहे.

  • 22 Aug 2025 11:50 AM (IST)

    22 Aug 2025 11:50 AM (IST)

    जे पक्ष फोडले त्यांच्याकडे मतं का मागता? - संजय राऊत

    खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विरोधी नेत्यांना फोन केल्यामुळे टीका केली आहे. तुम्ही जे पक्ष फोडले त्यांच्याच नेत्यांना फोन करुन मतं का मागता असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.

  • 22 Aug 2025 11:40 AM (IST)

    22 Aug 2025 11:40 AM (IST)

    कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते - सुनेत्रा पवार

    दिल्लीमधील आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली जात आहे. याबाबत सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील.

  • 22 Aug 2025 11:30 AM (IST)

    22 Aug 2025 11:30 AM (IST)

    गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

    गणेशोत्सव काळामध्ये पुण्यामध्ये मोठी गर्दी असते. मोठ्या संख्येने भाविक हे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये येत असतात. यामुळे पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या असून याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली आहे. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी याबाबत पोलीस आयुक्तांसह आढावा घेतला आहे.

  • 22 Aug 2025 11:22 AM (IST)

    22 Aug 2025 11:22 AM (IST)

    दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांबद्दल महत्त्वाचा निर्णय

    सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांबद्दल एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ११ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आधीच या कुत्र्यांना कायमचे श्वान आश्रयस्थानात पाठवण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर न्यायालयाने आज अंतिम निर्णय दिला. या निर्णयानुसार, नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडले जाईल, परंतु हिंसक कुत्र्यांना सोडले जाणार नाही. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला देऊ नये असे आदेश दिले.

  • 22 Aug 2025 11:20 AM (IST)

    22 Aug 2025 11:20 AM (IST)

    पुण्यातील रस्ते वाहतूक कोंडीने जाम

    पुणे शहरामध्ये तुफान पावसामुळे रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत. तसेच नदीला पाणी आल्यामुळे नदी पात्रातील रस्ते बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर सणांच्या काळामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठी गर्दी होत असून वाहतूक कोंडी होत आहे. जंगली महाराज रस्ता, बाजीराव रस्ता हे पूर्णपणे कोंडीने जाम झाले असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

  • 22 Aug 2025 11:07 AM (IST)

    22 Aug 2025 11:07 AM (IST)

    अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी घेतला जगाचा निरोप

    केले त्यापैकीच एक म्हणजे अभिनेते सूर्यकांत. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेते, चित्रकार सूर्यकांत मांढरे यांनी २२ ऑगस्ट १९९९ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘सूर्यकांत’ या नावाने चित्रपटसृष्टीत त्यांनी नायकाच्या भूमिकेने चित्रपटसृष्टी गाजवली.  त्यांचे भाऊ चंद्रकांत मांढरे हे देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. सूर्यकांत मांढरे यांनी सुमारे १०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांना १९७३ मध्ये ‘पद्मश्री’ तर १९९० मध्ये ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे चित्रपटाची आजही लोकप्रियता दिसून येते

  • 22 Aug 2025 10:55 AM (IST)

    22 Aug 2025 10:55 AM (IST)

    एल्विशच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक

    २२ ऑगस्ट २०२५ रोजी हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील एल्विश यादवच्या घरावर गोळीबार झाला होता. रात्री उशिरा २.३० वाजता सेक्टर-५३ मधील एल्विशच्या घराबाहेर ३ ते ४ तरुणांनी गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तरुण गोळीबार करताना दिसत होते. तसेच, हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही आणि कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही, परंतु एल्विशने म्हटले आहे की कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. आणि म्हणून पोलिसांनी ताबोडतोब तपास सुरु केला. बातमी सविस्तर वाचा

  • 22 Aug 2025 10:45 AM (IST)

    22 Aug 2025 10:45 AM (IST)

    टेंबा बवुमा दुसऱ्या सामन्यातून बाहेर!

    दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय कर्णधार टेम्बा बावुमा दुसरा एकदिवसीय सामना खेळत नाहीये. वर्कलोड व्यवस्थापन लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. जूनमध्ये झालेल्या WTC फायनल दरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास सहन करावा लागला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला कोणतीही समस्या आली नाही, परंतु वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. तो तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात परतेल. त्याच्या जागी एडेन मार्कराम आज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद भूषवत आहे.

  • 22 Aug 2025 10:35 AM (IST)

    22 Aug 2025 10:35 AM (IST)

    महिला विश्वचषकासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला

    आयसीसी महिला विश्वचषकासाठी इंग्लंड संघ:-

    एम आर्लॉट, टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, अ‍ॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, सारा ग्लेन, एमी जोन्स, हीदर नाइट, एम्मा लॅम्ब, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), लिन्सी स्मिथ, डॅनी व्याट-हॉज.

  • 22 Aug 2025 10:25 AM (IST)

    22 Aug 2025 10:25 AM (IST)

    बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets

    बॅटग्राऊंड गेम फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्ससाठी आजचे म्हणजेच 22 ऑगस्टचे रेडिम कोड्स जारी करण्यात आले आहेत. या रेडिम कोड्सच्या मदतीने आज प्लेअर्सना वेगवेगळ्या आऊटफिट्सच्या मदतीने त्यांचा लूक एन्हांस करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच पेट्सची ताकद वाढवण्याची संधी देखील आज प्लेअर्सना मिळणार आहे. जर तुम्ही देखील फ्री फायर प्लेअर्स असाल आमि तुम्हाला आऊटफिट आणि पेट्स मोफत जिंकायचे असतील तर तुम्ही आजच्या रेडिम कोड्सचा वापर करू शकता. बातमी सविस्तर वाचा...

  • 22 Aug 2025 10:14 AM (IST)

    22 Aug 2025 10:14 AM (IST)

    आशिया कप 2025 आधी रिंकुने केला कहर! झळकावले शतक

    आजकाल भारतात अनेक वेगवेगळ्या लीग खेळल्या जात आहेत, त्यापैकी एक म्हणजे यूपी टी२० लीग २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये मेरठ मॅव्हेरिक्स आणि गौर गोरखपूर लायन्स यांच्यात ९ वा सामना खेळला गेला. या सामन्यात मेरठ मॅव्हेरिक्सकडून फलंदाजी करताना कर्णधार रिंकू सिंगने शतक झळकावले. फलंदाजीदरम्यान रिंकूने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ज्यामुळे मेरठ मॅव्हेरिक्सने ६ विकेट्सने सामना जिंकला.

  • 22 Aug 2025 09:50 AM (IST)

    22 Aug 2025 09:50 AM (IST)

    जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा

    गोंदिया : जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.20) दुपारच्या सुमारास घडली. 10 ते 11 वयोगटातील मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 22 Aug 2025 09:44 AM (IST)

    22 Aug 2025 09:44 AM (IST)

    काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर आढळला पांढरा घुबड

    सोशल मीडियावर नेहमीच अनेक अनोखे आणि आपल्याला थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेकदा अशा काही दुर्लभ गोष्टीही शेअर केल्या जातात ज्या आपण याआधी कधीही पहिल्या नसतील. अशीच एक घटना आता इथे शेअर करण्यात आली आहे जिने सर्वांनाच थक्क करून सोडले आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात मंदिराच्या शिखरावर चिमुकला पांढरा घुबड विराजमान झाल्याचे दिसून आले. ‘श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्व भूषण मिश्रा यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून शेअर केले असून ते आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

  • 22 Aug 2025 09:39 AM (IST)

    22 Aug 2025 09:39 AM (IST)

    १०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीत खरेदी करा हे शेअर्स

    मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकादारांना एक्साइड इंडस्ट्रीज , कमिन्स इंडिया आणि एल अँड टी फायनान्सचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी आज गुंतवणूकादारांना १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये सेंट्रम कॅपिटल , डीसीडब्ल्यू आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस यांचा समावेश आहे.

  • 22 Aug 2025 09:33 AM (IST)

    22 Aug 2025 09:33 AM (IST)

    भारताची जर्सी आशिया कपआधी बदलणार!

    भारताच्या संघ पुढील स्पर्धा ही आशिया कप 2025 खेळणार आहे. टीम इंडियासाठी ही स्पर्धा फार महत्वाची असणार आहे. बीसीसीआयने ही आशिया कपसाठी भारताच्या संघाची घोषणा केली होती. यामध्ये भारताच्या संघाचे नेतृत्व सुर्यकुमार यादव करताना दिसणार आहे. तर भारताच्या संघाचे उपकर्णधारपद हे शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून दुबई आणि अबू धाबी येथे सुरू होणार आहे.

  • 22 Aug 2025 09:28 AM (IST)

    22 Aug 2025 09:28 AM (IST)

    24 कॅरेट सोन्याच्या दरात पुन्हा वाढ

    22 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,076 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,231 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,553 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,760 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,530 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 116.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,16,100 रुपये आहे.

  • 22 Aug 2025 09:23 AM (IST)

    22 Aug 2025 09:23 AM (IST)

    आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड

    भारतच नव्हे तर जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक थायलँडला भेट देतात. भारतासह जवळपास 93 देशांच्या नागरिकांना थायलँडमध्ये व्हिसाशिवाय पर्यटनाची संधी उपलब्ध आहे. आता या सोयीबरोबरच थायलँड सरकार पर्यटकांसाठी आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे – मोफत देशांतर्गत विमान प्रवास योजना. थायलँडचे पर्यटन व क्रीडा मंत्री सोरावोंग थिएनथोंग यांनी आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मोफत देशांतर्गत विमानसेवेसाठी 700 मिलियन थाई बाट इतक्या निधीचा प्रस्ताव सादर केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे फक्त राजधानी व मुख्य पर्यटन शहरांपुरते न थांबता, पर्यटकांना देशातील इतर भागांमध्येही आकर्षित करणे.

  • 22 Aug 2025 09:18 AM (IST)

    22 Aug 2025 09:18 AM (IST)

    ऑस्ट्रेलियासमोर करो या मरो कि स्थिती!

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना खेळवण्यात आला होता यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली होती. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे या मालिकेची आघाडी आहे. संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज या मालिकेचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय यावेळी हा सामना नवीन स्थळ मॅके येथे होणार आहे.

  • 22 Aug 2025 09:13 AM (IST)

    22 Aug 2025 09:13 AM (IST)

    भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

    वर्धा : पुलगावमध्ये वाढत्या चोरीच्या घटना पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी हरिराम नगर येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात झालेल्या चोरीच्या घटनेत लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. असे असताना आता चक्क भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या घरी चोरी झाल्याचे गुरुवारी (दि. २१) उघडकीस आले.

  • 22 Aug 2025 09:07 AM (IST)

    22 Aug 2025 09:07 AM (IST)

    अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच दोन आठवड्यांपासून ते आजपर्यंत राज्यातील 19 जिल्ह्यातील 187 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

  • 22 Aug 2025 09:00 AM (IST)

    22 Aug 2025 09:00 AM (IST)

    पंतप्रधान मोदी बिहारमध्ये 8.15 किलोमीटर लांबीच्या औंटा-सिमरिया पुलाचे उद्घाटन करणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या जनतेसाठी मोठं गिफ्ट देणार आहेत. ते शुक्रवारी NH-31 वर 8.15 किलोमीटर लांबीच्या औंटा-सिमरिया पुल योजनेचे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पात पवित्र गंगानदीवरील 1.865 किलोमीटर लांबीचा सहा पदरी मार्गिकेचा पुल समाविष्ट आहे. या प्रकल्पाचे एकूण बजेट सुमारे 1,870 कोटी रुपये आहे. हा पुल मोकामा आणि बेगुसराय या दोन्ही शहरांना थेट जोडेल, ज्यामुळे वाहतुकीची सोय आणि स्थानिक संपर्क सुधारण्यास मदत होईल.

  • 22 Aug 2025 08:55 AM (IST)

    22 Aug 2025 08:55 AM (IST)

    संग्राम महाराज भंडारे-थोरात वाद: धमकीनंतर  संगमनेरमध्ये शांती मोर्चा

     काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांच्यावर आरोप  केले आहेत. “हा जो कोणी महाराज आहे त्याला मी महाराज असं म्हणणार नाही. कीर्तनकार भंडारे तालुक्याचं नुकसान करतोय.” संगमनेरमध्ये घेतलेल्या सभेत थोरत यांनी भंडारे यांचे थेट व्हिडीओ दाखवले आणि त्यांचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटोही जनतेलाही दाखवले. थोरात यांच्या या वक्तव्यानंतर भंडारे यांनी सोशल मीडियावरून बाळासाहेब थोरात यांना धमकी दिली, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल.” या धमकीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. यामुळे आज संगमनेरमध्ये शांती मोर्चा काढण्यात आला. यापूर्वी, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहादरम्यान झालेल्या वादाच्या प्रकरणी आठ ते दहा कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • 22 Aug 2025 08:45 AM (IST)

    22 Aug 2025 08:45 AM (IST)

    अनुभवी गोलंदाज गोहर सुल्ताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

    भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी गोलंदाज गोहर सुल्ताना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यचा निर्णय जाहीर केला आहे. 37 वर्ष वयाच्या गोहरने हा निर्णय घेतला असून, गेल्या 11 वर्षांपासून टीम इंडियापासून दूर असल्यामुळे निवृत्ती अपेक्षित होती. गोहरने ही घोषणा इंस्टाग्रामवरून केली. याआधी भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही त्यांच्या निवृत्तीची माहिती इंस्टाग्रामवरून दिलेली आहे.

  • 22 Aug 2025 08:35 AM (IST)

    22 Aug 2025 08:35 AM (IST)

    आयटी क्षेत्रात नोकरकपातीची लाट; 2025 मध्ये 80 हजारांहून अधिक कर्मचारी बेरोजगार

    आयटी क्षेत्रात नोकरकपातीची चिंताजनक लाट सुरूच आहे. 2025 मध्ये आतापर्यंत तब्बल 176 कंपन्यांनी 80 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. भारतामध्ये सध्या 73 लाखांहून अधिक आयटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार लटकतेय. 2024 मधील आकडेवारीदेखील या क्षेत्रातील नोकरकपातीची दाहकता स्पष्ट करत आहे. तज्ज्ञांच्या मते, बदलते बाजारपेठेचे स्वरूप, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर आणि कंपन्यांच्या खर्चकपातीच्या धोरणांमुळे रोजगारावर मोठं संकट ओढवलं आहे.

  • 22 Aug 2025 08:30 AM (IST)

    22 Aug 2025 08:30 AM (IST)

    पुण्यात रस्त्यावर "मानवी सांगाडा"; पोलिसांची धावपळ

    शहरातील येरवडा परिसरात गुरुवारी संध्याकाळी अनोखा प्रकार घडला. शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मध्यभागी "मानवी सांगाडा" पडलेला दिसताच परिसरात खळबळ उडाली. रहदारीच्या गजबजाटामुळे काही वाहनं थेट सांगाड्यावरून गेली, तरीही अनेकांनी हा प्रकार पाहून तातडीने पोलिसांना कळवले.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सांगाडा ताब्यात घेतला. सुरुवातीला तो खरा मानवी सांगाडा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र तपासाअंती पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. हा सांगाडा प्रत्यक्षात प्लास्टर ऑफ पॅरिस आणि तारेचा वापर करून तयार केलेला बनावटी सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणामुळे काही वेळ पोलिसांची धांदल उडाली होती. अखेर खरा मानवी सांगाडा नसल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

  • 22 Aug 2025 08:25 AM (IST)

    22 Aug 2025 08:25 AM (IST)

    गणेशोत्सवासाठी मुंबई-कोकणसाठी ३८० विशेष गाड्यांच्या फेऱ्या

    आगामी गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातून हजारो नागरिक कोकणात गावी जाण्यासाठी निघतात. या गर्दीचा अंदाज घेऊन यंदा तब्बल ३८० गणेशोत्सव विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

Marathi Breaking news live updates- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच दोन आठवड्यांपासून ते आजपर्यंत राज्यातील 19 जिल्ह्यातील 187 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political national crime sports lifestyle business entertainment international breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 07:52 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today : राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण
1

Top Marathi News Today : राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

Top Marathi News Today : मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी
2

Top Marathi News Today : मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

Top Marathi News Today: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत
3

Top Marathi News Today: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत

Top Marathi News Today: कबुतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम- कोर्ट
4

Top Marathi News Today: कबुतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम- कोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.