फोटो सौजन्य - X (BCCI Women)
भारताचा महिला संघ सध्या आगामी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करत आहेय बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे, यामध्ये भारताचा संघ हा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळणार आहे. तर या संघाची उपकर्णधार स्मृती मानधना असणार आहे. भारतामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे त्यामुळे भारताचा संघ या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करावी अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.
पुढील महिन्यात भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात आयसीसीने बदल केले आहेत. आयसीसीने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमचे यजमानपद काढून घेतले आहे आणि ते दुसऱ्या स्टेडियमला दिले आहे. या विश्वचषकाचे एकूण पाच स्टेडियम सामने आयोजित करतील. त्यापैकी एक स्टेडियम बेंगळुरूचे एम चिन्नास्वामी स्टेडियम होते, ज्यामध्ये आता सामने होणार नाहीत. आयसीसीने शुक्रवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की बेंगळुरूमध्ये खेळवले जाणारे सामने आता नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवले जातील.
AUS vs IND : राघवी आणि जोशनाच्या खेळीने कांगारुच्या गोलंदाजांचा गाळला घाम! यजमान संघ अडचणीत
या स्टेडियममध्ये एकूण पाच सामने खेळवले जाणार होते, त्यापैकी तीन सामने लीग टप्प्यातील होते आणि एक उपांत्य सामना होता. जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला असता तर हा विजेतेपदाचा सामना देखील याच स्टेडियममध्ये खेळला असता. हे सर्व सामने आता डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहेत. खरं तर, कर्नाटक सरकारने चिन्नास्वामी स्टेडियम सामने आयोजित करण्यासाठी असुरक्षित असल्याचे मानले आहे आणि म्हणूनच आयसीसीने या स्टेडियमचे यजमानपद ताब्यात घेतले आहे.
आयपीएल-२०२५ चा विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १७ वर्षांनी हे विजेतेपद जिंकले आणि चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा विजय साजरा करण्यात आला. स्टेडियमच्या आत उत्सव सुरू असतानाच स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. याची चौकशी करण्यात आली, ज्याच्या अहवालात स्टेडियम सामने आयोजित करण्यासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आले आणि त्यानंतर आयसीसीने निर्णय घेतला.
UPDATE – #TeamIndia‘s revised schedule confirmed for ICC Women’s Cricket World Cup.#WomenInBlue #CWC25 pic.twitter.com/aQm8VjgzWV
— BCCI Women (@BCCIWomen) August 22, 2025
महिला एकदिवसीय विश्वचषक ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. हे सामने भारतातील एकूण चार शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत, ज्यामध्ये गुवाहाटीमधील एसीए स्टेडियम, इंदूरमधील होळकर स्टेडियम, विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियम यांचा समावेश आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमचाही यामध्ये समावेश आहे. जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर विजेतेपदाचा सामना कोलंबोमध्ये होईल. पाकिस्तान त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळेल.