Mumbai Indians (Photo Credit- X)
MI Team Name Change: आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ, आता जगभरातील इतर क्रिकेट लीगमध्येही आपला दबदबा निर्माण करत आहे. अमेरिकेपासून ते यूएईपर्यंत, जिथे जिथे क्रिकेट लीग होतात, तिथे एमआयचा (MI) संघ दिसतो. नुकतेच, नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ लीगमध्ये (The Hundred) एक संघ खरेदी केला आहे.
सध्याच्या हंगामात, एमआयने विकत घेतलेला ‘ओव्हल इनव्हिन्सिबल्स’ संघ त्याच नावाने खेळत आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, पुढील हंगामापासून या संघाचे नाव ‘एमआय लंडन’ (MI London) असे बदलले जाईल. या संघात एमआयचा ४९% हिस्सा आहे आणि इतर लीगप्रमाणेच इथेही वर्चस्व गाजवण्यासाठी हा बदल केला जात आहे. लवकरच, संघाची जर्सीही बदलली जाईल आणि एमआयच्या ट्रेडमार्क निळ्या रंगाची जर्सी येऊ शकते.
🚨 MI LONDON IN THE HUNDRED. 🚨
– Oval Invincibles set to be renamed as the ‘MI London’. (Telegraph). pic.twitter.com/C9elYJGmb1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 21, 2025
मुंबई इंडियन्सने आयपीएलमधून क्रिकेट जगतात प्रवेश केला. त्यानंतर त्यांचा महिला प्रीमियर लीगमध्येही संघ आहे. आता जगभरातील इतर लीगमध्येही त्यांचे संघ लोकप्रिय झाले आहेत:
‘द हंड्रेड २०२५’ मध्ये ‘ओव्हल इनव्हिन्सिबल्स’ने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सध्या ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी ६ पैकी ५ सामने जिंकले असून, केवळ एक सामना गमावला आहे. सॅम बिलिंग्जच्या नेतृत्वाखालील या संघात विल जॅक्स, सॅम करन, जॉर्डन कॉक्स आणि रशीद खान यांसारखे स्टार खेळाडू आहेत.