Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: ‘मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती’

Marathi breaking live marathi headlines

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 14, 2025 | 06:44 PM
Top Marathi News Today: ‘मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती’
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : आत्तापर्यंतच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कधीही इतका वाईट काळ गेला नाही. त्यामुळे सोमवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात त्यांच्या फलंदाजांना पराभवाची मालिका थांबवण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. आयपीएलच्या इतिहासात सीएसकेने कधीही सलग पाच सामने गमावलेले नाहीत, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या बालेकिल्ल्याच्या चेपॉक येथे सलग तीन सामने गमावण्याची पहिलीच वेळ समाविष्ट आहे.

वाचा सविस्तर-

 

 

The liveblog has ended.
  • 14 Apr 2025 06:25 PM (IST)

    14 Apr 2025 06:25 PM (IST)

    विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

    साताऱ्यामध्ये विनयभंग प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास सातारा शहरातील एका महिलेसमोर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी प्रवीण सुतार रा. संगम माहुली, ता. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • 14 Apr 2025 06:24 PM (IST)

    14 Apr 2025 06:24 PM (IST)

    सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा

    साताऱ्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
    सातारा पालिकेच्या जप्ती पथकाने प्रकाश रामचंद्र ओतारी रा. रविवार पेठ, सातारा यांचा गाळा नंबर 9 सिल केला होता. मात्र ओतारी यांनी सील केलेल्या गाळ्याचे कुलूप तोडून फेकले आहे. याप्रकरणी ओतारी यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोंडवे करीत आहेत.
  • 14 Apr 2025 05:53 PM (IST)

    14 Apr 2025 05:53 PM (IST)

    महाराष्ट्रात सूर्य ओकतोय आग

    यावर्षीचा उन्हाळा अत्यंत कडक ठरत आहे.  या आठवड्यात तापमान हे 40 अंश सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. ज्यामुळे नागरिकांची दैनंदिन जीवनशैली प्रभावित झाली आहे. तापमानाची वाढ आणि उन्हाचा तीव्रतेमुळे नागरिकांना खूप त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात आणि इतर उन्हाळ्याच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

  • 14 Apr 2025 05:23 PM (IST)

    14 Apr 2025 05:23 PM (IST)

    पुण्यात आगीच्या घटना

    ऊरळी देवाची, आदर्श नगर येथे एका भंगार मालाचा साठा असणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागली होती. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीवर पाण्याचा मारा सुरु असताना गोडाऊनमध्ये प्रवेश करत सिलेंडर असलेला धोकादायक टेम्पो बाहेर काढत पुढील अनर्थ टळला.

  • 14 Apr 2025 05:22 PM (IST)

    14 Apr 2025 05:22 PM (IST)

    धान घोटाळाप्रकरणी शिरपूर केंद्रातील दोन कर्मचारी निलंबित

    गडचिरोली जिल्ह्यात धान घोटाळा प्रकरणी शिरपूर धान खरेदी केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच, मिलची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी स्वतः याची चौकशी करत आहेत. हा धान घोटाळा 2011 ते 2025 या कालावधीतील आहे.

  • 14 Apr 2025 01:38 PM (IST)

    14 Apr 2025 01:38 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

    भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये उत्साहात साजरी केली जात आहे. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

    NANDED | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन#nanded #maharashtra #AmbedkarJayanti #MarathiNews pic.twitter.com/lHJhE8XSSb

    — Navarashtra (@navarashtra) April 14, 2025

  • 14 Apr 2025 01:09 PM (IST)

    14 Apr 2025 01:09 PM (IST)

    मध्य प्रदेशात 'वक्फ'नुसार पहिली कारवाई

    वक्फ बोर्डच्या कायद्यानुसार, पहिली कारवाई मध्यप्रदेशातील पन्ना येथे करण्यात आली. प्रशासनाने सरकारी जमिनीवर बांधलेला बेकायदेशीर मदरसा पाडण्यात आला आहे. संचालकाने स्वतः मदरसा पाडला. मुस्लिम समुदायानेच सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या मदरशाची तक्रार केली होती.

  • 14 Apr 2025 12:45 PM (IST)

    14 Apr 2025 12:45 PM (IST)

    उद्धव ठाकरे करणार भाजपसोबत युती?

    चंद्रकांत पाटील म्हणाले की, “उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची समजूत घालून किंवा दिल्लीत चर्चा करुन आली नाहीत तर मुंबईत ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत. अर्थात त्यांनी यायचं की नाही, त्यांना बरोबर घ्यायचं की नाही हे माझे विषय नाही. याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागलेत? असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.  वाचा सविस्तर

  • 14 Apr 2025 12:44 PM (IST)

    14 Apr 2025 12:44 PM (IST)

    अमित शाहांनी लिहिले छत्रपती शिवरायांवर आधारित पुस्तक

    चंद्रकांत पाटील म्हणाले की, "अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत 500 पानी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पाहून संजय राऊत यांना चक्कर येईल. अनेक संदर्भ गोळा करुन त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. एवढा अभ्यास अमित शाह यांचा आहे. पुस्तक तयार आहे फक्त त्याचे प्रकाशन दिल्लीमध्ये करायचे की पुण्यामध्ये करायचे हे ठरणे बाकी आहे," असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे

  • 14 Apr 2025 12:20 PM (IST)

    14 Apr 2025 12:20 PM (IST)

    विशाल गवळीच्या अंत्यविधीसाठी कुटुंब दाखल

    कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आरोपी विशाल गवळी याने कारागृहामध्ये आत्महत्या केली. आता  विशाल गवळीच्या अंत्यविधीसाठी विठ्ठलवाडीमध्ये कुटुंब पोहोचले आहे. यासाठी मोठा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

    विशाल गवळीच्या अंत्यविधीसाठी विठ्ठलवाडी पोहोचले कुटुंब, कडेकोट बंदोबस्त#marathinews #Maharashtra pic.twitter.com/eo4ZoWLlNg

    — Navarashtra (@navarashtra) April 14, 2025

  • 14 Apr 2025 12:17 PM (IST)

    14 Apr 2025 12:17 PM (IST)

    आंबेडकर जयंतीनिमित्त दिक्षाभूमीवर मोठी गर्दी

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशासह राज्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी केली जात आहे. जयंतीच्या निमित्ताने नागपूरच्या दिक्षाभूमीवर अनुयायींनी मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे.

    NAGPUR | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; नागपूरच्या दिक्षाभूमीवर गर्दी#nagpur #AmbedkarJayanti2025 #marathinews #Maharashtra pic.twitter.com/Sy553RrqJB

    — Navarashtra (@navarashtra) April 14, 2025

  • 14 Apr 2025 12:07 PM (IST)

    14 Apr 2025 12:07 PM (IST)

    'मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती'

    'मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी दावा केला आहे.

  • 14 Apr 2025 10:48 AM (IST)

    14 Apr 2025 10:48 AM (IST)

    डीजेच्या आवाजामुळे २३ वर्षीय तरूणाच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव, उपचारादरम्यान मृत्यू

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजेच्या प्रचंड आवाजामुळे एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मिरवणुकीदरम्यान डीजे सुरू असताना अचानक त्या तरुणाच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव सुरू झाला. तातडीने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

  • 14 Apr 2025 10:27 AM (IST)

    14 Apr 2025 10:27 AM (IST)

    आता बॉक्सिंगच्या मैदानात रोबोट्सही उतरणार, रंगतदार ठरणार मॅच!

    आता लवकरच आपल्याला असे एक दृश्य दिसेल जिथे मानवांऐवजी रोबोट बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार आहेत. चीनची प्रसिद्ध रोबोटिक्स कंपनी युनिट्रीने त्यांच्या G1 ह्युमनॉइड रोबोटसाठी ‘आयर्न फिस्ट किंग: अवेकनिंग’ या पहिल्या रोबोट बॉक्सिंग स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेत माणसं नाहीतर रोबोट बॉक्सिंग करताना पहायला मिळणार आहेत. अलिकडेच, युनिटरीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांचा G1 रोबोट एका माणसासोबत आणि नंतर दुसऱ्या G1 रोबोटसोबत बॉक्सिंग करताना दिसत आहे.

    Unitree Iron Fist King: Awakening!💪
    Let's step into a new era of Sci-Fi, join the fun together! Unitree will be livestreaming robot combat in about a month, stay tuned!#Unitree #Fighting #Boxing #HumanoidRobot #Robot #AI #IronFist #Game pic.twitter.com/IsAB35pdW0

    — Unitree (@UnitreeRobotics) April 10, 2025

  • 14 Apr 2025 09:36 AM (IST)

    14 Apr 2025 09:36 AM (IST)

    देवेंद्र फडणवींसाकडून चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

    मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. याठिकाणी पोहचल्यानंतर त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  भाजप नेते आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते.

  • 14 Apr 2025 09:09 AM (IST)

    14 Apr 2025 09:09 AM (IST)

    सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किमती नरमल्या

    14 एप्रिल रोजी भारतात आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,566 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,769 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,175 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,690 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,750 रुपये आहे. भारतात 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,700 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,670 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,760 रुपये होता. भारतात आज 14 एप्रिल रोजी आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 99.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 99,900 रुपये आहे.

  • 14 Apr 2025 09:08 AM (IST)

    14 Apr 2025 09:08 AM (IST)

    Google आणि Samsung लवकरच लाँच करणार Smart glasses

    गुगल आणि सॅमसंग त्यांच्या लाखो ग्राहकांसाठी भागिदारी केली असून आता या कंपन्या अँड्रॉइड एक्सआर स्मार्ट ग्लासेस लाँच करणार आहेत. अलीकडील एका अहवालात असे समोर आले आहे की दोन्ही कंपन्या 2026 पर्यंत हे ‘अनोखे ग्लासेसे’ लाँच करू शकतात. हा प्रकल्प एआर आणि एक्सआरच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. या ग्लासेसमध्ये तुम्हाला लाईव्ह ट्रांसलेशनपासून मेमोरी रिकॉलपर्यंत अनेक फीचर्स मिळणार आहेत. दोन्ही कंपन्यांच्या भागिदारीनंतर त्यांच्या ग्राहकांसाठी हे अनोखं गिफ्ट असणार आहे.

  • 14 Apr 2025 09:07 AM (IST)

    14 Apr 2025 09:07 AM (IST)

    Flipkart वर सुरु आहे बेस्ट ऑफर, iPhone वर 9000 रुपयांचं डिस्काउंट

    ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांसाठी एक आकर्षक डिल घेऊन आला आहे. या डिलमध्ये तुम्हाला iPhone 16 Plus तब्बल 9 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. गेल्या वर्षी अ‍ॅपलने भारतात iPhone 16 Plus 89,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला होता. तथापि, सध्या हा फोन फ्लिपकार्टवर 5 हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह सूचीबद्ध आहे, ज्यामुळे त्याची किंमत 84,900 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. या डीलला आणखी मजेदार करण्यासाठी, फ्लिपकार्ट सर्व बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील देत आहे.

  • 14 Apr 2025 08:58 AM (IST)

    14 Apr 2025 08:58 AM (IST)

    फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अखेर अटकेत

    पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) ऐतिहासिक कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला अखेर बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल १३,५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर भारतातून फरार झालेला चोक्सी शनिवारी (१२ एप्रिल २०२५) बेल्जियमच्या अँटवर्प शहरात पोलिसांच्या हाती लागला. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) च्या अपीलवरून ही अटक करण्यात आली असून, तो सध्या बेल्जियममधील तुरुंगात आहे.

    Fugitive diamond trader #MehulChoksi, wanted in PNB loan fraud case, is arrested in #Belgium at the request of the CBI. pic.twitter.com/O5GXVmor0G

    — All India Radio News (@airnewsalerts) April 14, 2025

    credit : social media

    वाचा सविस्तर-

  • 14 Apr 2025 08:55 AM (IST)

    14 Apr 2025 08:55 AM (IST)

    शेतकऱ्यांना १२ तास वीज, पाच वर्षांत दरवर्षी वीज बिल कमी होणार

    शेतकऱ्यांना दिवसात १२ तास वीज देण्याचे आश्वासन दिले होते. लवकरच राज्याच्या ८० टक्के भागातील शेतकऱ्यांना दिवसभर १२ तास वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय केंद्र सरकारच्या सूर्य घर योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला ३०० युनिटपर्यंत वीज मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.

    वाचा सविस्तर

Web Title: Marathi breaking news today live updates political social sports national viral entertainment weather business news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 08:51 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today:  बांगलादेशच्या खराब खेळीमुळे श्रीलंकेच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित
1

Top Marathi News Today: बांगलादेशच्या खराब खेळीमुळे श्रीलंकेच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित

Nagpur New Vidhanbhavan: दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाविस्टा; नागपुरात नव्या विधानभवनाची उभारणी करणार
2

Nagpur New Vidhanbhavan: दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाविस्टा; नागपुरात नव्या विधानभवनाची उभारणी करणार

Top Marathi News Today Live: हाँगकाँग विमानतळावर बोईंग ७४७ कार्गो विमान कोसळले; दोन जणांचा मृत्यू, चार जखमी
3

Top Marathi News Today Live: हाँगकाँग विमानतळावर बोईंग ७४७ कार्गो विमान कोसळले; दोन जणांचा मृत्यू, चार जखमी

Top Marathi News Today Live: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार
4

Top Marathi News Today Live: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.