Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: बांगलादेशच्या खराब खेळीमुळे श्रीलंकेच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित

Marathi breaking live marathi- बांगलादेशने ५० षटकांत ९ बाद १९५ धावा केल्या. बांगलादेशला विजयासाठी १२ चेंडूत १२ धावांची आवश्यकता होती. तथापि, बांगलादेशने फक्त दोन धावांच्या अंतराने पाच विकेट्स गमावल्या आणि सामना गमावला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 21, 2025 | 06:29 PM
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates:  महिला विश्वचषकाच्या तीन जांगा या सेमीफायनलसाठी पक्क्या झाल्या आहेत. चौथ्या जागेसाठी भारत, न्युझीलंड आणि इतर काही संघाची लढत आहे. बांगलादेशने जिंकणे आवश्यक असलेला सामना ५ बाद २ अशा फरकाने गमावला. सोमवारी झालेल्या २१ व्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवून श्रीलंकेने आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ४८.४ षटकांत २०२ धावा केल्या.

 

 

The liveblog has ended.
  • 21 Oct 2025 06:29 PM (IST)

    21 Oct 2025 06:29 PM (IST)

    Mumbai Air Pollution: दिवाळी फटाक्यांचा परिणाम! मुंबईची हवा झाली खराब; प्रदूषणामुळे अनेक परिसरांत नागरिकांना त्रास

    मुंबई: देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ज्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे, परंतु फटाके फोडल्यामुळे हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. अनेक भागातील हवेची गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा जास्त झाला आहे, जो खराब श्रेणीत येतो. वांद्रे कुर्ला येथे सर्वाधिक AQI नोंदवण्यात आला.

  • 21 Oct 2025 06:14 PM (IST)

    21 Oct 2025 06:14 PM (IST)

    माणुसकीचा मर्डर! भर रस्त्यात Driver ला दगड, विटांनी ठेचून मारलं; कुटुंबाने हायवे जाम अन् थेट गाड्यांची...

     

    Murder News: उत्तर प्रदेशच्या प्रयागरायजमध्ये एक भयानक घटना घडली आहे. क्षुल्लक भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात झाल्याने दगड आणि विटा यांच्या मदतीने एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. प्रयागरायजमधील धूमनगंज पोलिस स्टेशन परिसरातील टोल प्लाझा येथील पेट्रोल पंपावर किरकोळ वाद झाल्याने एक व्यक्तीची हत्या झाली आहे.

  • 21 Oct 2025 05:51 PM (IST)

    21 Oct 2025 05:51 PM (IST)

    ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘लक्झरी’ झाली!

    चंदीगडमधील एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क 51 आलिशान कार भेट दिल्या. ही भेट औषध कंपनी एमआयटीएसने दिली. कंपनीचे संस्थापक एमके भाटिया हे स्वतः कारच्या चाव्या देताना दिसले आहे. असे माहिती आहे की त्यांनी 51 कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या आहेत, ज्यात एक महिंद्रा स्कॉर्पिओ-एन आणि इतर अनेक एसयूव्हीचा समावेश आहे.

  • 21 Oct 2025 05:29 PM (IST)

    21 Oct 2025 05:29 PM (IST)

    मुहूर्त ट्रेडिंग 2025 मध्ये एथर एनर्जीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ!

    मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी मुहूर्त ट्रेडिंग सत्रात एथर एनर्जीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर ९.४ टक्क्यांनी वाढून ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. ट्रेडिंगच्या अखेरीस, शेअर प्रति शेअर ₹७६७.०५ वर व्यवहार करत होता, म्हणजेच ६.२२ टक्के वाढ.

  • 21 Oct 2025 05:07 PM (IST)

    21 Oct 2025 05:07 PM (IST)

    दिवाळीत झेंडू फुलांचे भाव अपेक्षेपेक्षा कमी; शेतकऱ्यांना आर्थिक ताण

    दसरा दिवाळीच्या काळात मोठी मागणी असलेल्या फुलांमधील ‘पिवळे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेंडू फुलांना यंदा बाजारात अपेक्षित दर मिळत नाहीये. पाहिजे तो दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन अधिक झाल्याने झेंडू फुलांना केवळ 20 ते 22 रुपये किलो इतकाच दर मिळत आहे. परिणामी, उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

  • 21 Oct 2025 05:00 PM (IST)

    21 Oct 2025 05:00 PM (IST)

    PhysicsWallah मध्ये मार्केटिंग असोसिएट भरती: ₹2.6 लाख ते ₹4.8 लाख वार्षिक वेतनाची संधी!

    एडटेक कंपनी फिजिक्सवाला (PhysicsWallah) ने मार्केटिंग असोसिएट पदासाठी भरती जाहीर केली आहे. या पदासाठी कंपनीला असा उमेदवार हवा आहे जो एबव्ह द लाईन (ATL) आणि बिलो द लाईन (BTL) मार्केटिंग कॅम्पेनचे प्रभावी नियोजन करून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करू शकेल. या भरतीचा उद्देश म्हणजे ब्रँडची ओळख वाढवणे आणि ऑफलाइन मार्केटिंग उपक्रमांच्या माध्यमातून क्वालिटी लीड्स तयार करणे. या पदावर निवड झालेल्या उमेदवाराची जबाबदारी ब्रँडची प्रतिमा बळकट करणे, इव्हेंट्स आणि प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटीजचे नियोजन करणे, तसेच स्थानिक आणि प्रादेशिक मार्केटिंग उपक्रम जसे की प्रिंट मीडिया, आउटडोअर जाहिराती (OOH) आणि कम्युनिटी प्रोग्राम्सचे व्यवस्थापन करणे अशी असेल.

  • 21 Oct 2025 04:55 PM (IST)

    21 Oct 2025 04:55 PM (IST)

    भारतात लाँच होणारी Audi Q3 प्रवाशांसाठी किती सुरक्षित?

    ऑडीची नवी Audi Q3 अलीकडेच क्रॅश टेस्टसाठी सादर करण्यात आली होती. Euro NCAP या संस्थेने या SUV चे क्रॅश टेस्ट केला असून, याला 5 स्टार्स सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.प्रौढांच्या सुरक्षेसाठी या SUV ने 87% गुण मिळवले आहेत. यामध्ये Frontal Impact साठी 16 पैकी 12 गुण. Lateral Impact साठी 16 पैकी 15 गुण. तसेच Rear Impact आणि Rescue साठी 4 पैकी 4 गुण देण्यात आले आहेत.

  • 21 Oct 2025 04:50 PM (IST)

    21 Oct 2025 04:50 PM (IST)

    बोगस मतदारांवर ठाण्यातून रणशिंग! राजन विचारे आणि अविनाश जाधवांचा आक्रमक इशारा

    ठाण्यात शिवसेना (उबठा) नेते *जितेंद्र आव्हाड**, खासदार **राजन विचारे* आणि मनसेचे *अविनाश जाधव* यांनी निवडणूक आयोगावर तीव्र हल्लाबोल केला. मतदार यादीतील घोळ, बोगस नावे आणि भ्रष्ट कारभारावर तिघांनी जोरदार टीका करत १ नोव्हेंबरला आयोगाच्या कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली. “मतदार चोरीशिवाय ते जिंकू शकत नाहीत,” असा आरोप आव्हाडांनी केला, तर विचारे आणि जाधव यांनी बोगस मतदानाविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला.

  • 21 Oct 2025 04:40 PM (IST)

    21 Oct 2025 04:40 PM (IST)

    ग्रामपंचायत हद्दीत राहणारे मतदार शहरात येऊन मतदान करतात - आपचा आरोप

     

    खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक दहा शिळफाटा येथील मतदार याद्या तपासणी केली असता 6392 मतदारांपैकी 185 मतदारांचे दुबार नाव आढळले असून मयत मतदारांचे नाव सुद्धा वगळण्यात आलेले नाही. आम आदमी पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक दहा शिळफाटा येथील मतदार यादी दुरुस्त करण्यात यावी याकरिता माननीय जिल्हाधिकारी, तहसीलदार व निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले होते त्यानुसार निवडणूक आयोगाने कारवाई करू असे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही सदर याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात दोष आहे, खोपोली ग्रामपंचायत आपने आरोप केला आहे.

  • 21 Oct 2025 04:35 PM (IST)

    21 Oct 2025 04:35 PM (IST)

    आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची बैठक संपन्न

    नांदेड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आघाडीने एकत्रित नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेतला. बैठकीत माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, खासदार रविंद्र चव्हाण आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते. नेत्यांनी आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असल्याचे ठाम विश्वास व्यक्त केला आणि जिल्ह्यातील राजकीय रणनीतीवर चर्चा केली.

  • 21 Oct 2025 04:30 PM (IST)

    21 Oct 2025 04:30 PM (IST)

    दिवाळीत झेंडू फुलांचे भाव अपेक्षेपेक्षा कमी; शेतकऱ्यांना आर्थिक ताण

    दसरा दिवाळीच्या काळात मोठी मागणी असलेल्या फुलांमधील ‘पिवळे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेंडू फुलांना यंदा बाजारात अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन अधिक झाल्याने झेंडू फुलांना केवळ 20 ते 22 रुपये किलो इतकाच दर मिळत आहे. परिणामी, उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

  • 21 Oct 2025 04:25 PM (IST)

    21 Oct 2025 04:25 PM (IST)

    भीषण अपघात! काही मिनिटांतच 3 कोटींचे फटाके जळून झाले खाक,

    दिवाळीचा सण म्हणजे उत्साह, प्रकाश, आणि फटाक्यांची आतषबाजी आणि याचाच प्रभाव सध्या सोशल मीडियावर दिसतो आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरसारख्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सध्या सर्वाधिक व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये फटाके फोडण्याचे व्हिडिओ अग्रस्थानी आहेत. दिवसभर सोशल मीडिया स्क्रोल केल्यावर तुम्हालाही लक्षात आलं असेल की, बहुतांश पोस्ट्स दिवाळीशी संबंधित आहेत.असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण हादरले आहेत. व्हिडिओमध्ये 3 कोटींचे फटाके फुटल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • 21 Oct 2025 04:20 PM (IST)

    21 Oct 2025 04:20 PM (IST)

    कांदा लागवडीवर ६०,००० रुपये खर्च, हाती दमडीही नाही

     अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. नाशिकमधील कांद्याच्या उत्पादनावर विशेष परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याची योग्य किंमत मिळत नाही.

  • 21 Oct 2025 04:15 PM (IST)

    21 Oct 2025 04:15 PM (IST)

    बळीराजाच्या पिकाचं विविध रोगांपासून संरक्षण

    एमडीआर 2001 हे कीटकनाशक शेतकरी वर्गसाठी वरदान असल्याचा दावा हाय रिच सिडस कंपनीकडून करण्यात आलं आहे.कंपनीचे गजानन परळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हा दावा केला आहे. हाय रिच सीड्स कंपनीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एमडीआर 2001 हे कीटकनाशक उपलब्ध करून देण्यात आले होते.या कीटकनाशक यांचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून शेतकऱ्यांच्या शेतातील भातपीक कोणत्याही प्रकारच्या रोगराई यांचा प्रादुर्भाव  झालेला नाही.दरम्यान एमडीआर 2001 हे कीटकनाशक शेतकरी वर्गसाठी वरदान असल्याचा दावा हाय रिच सिडस कंपनीकडून करण्यात आलं आहे.कंपनीचे गजानन परळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हा दावा केला असून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भाताच्या पिकाची पाहणी कंपनीकडून करण्यात आली.

  • 21 Oct 2025 04:07 PM (IST)

    21 Oct 2025 04:07 PM (IST)

    खेळाडूंमध्ये इस्लामिक संस्कृतीचा प्रचार भोवला?

    पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच चर्चेत असतो. आता या संघात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मोहम्मद रिझवानकडून एकदिवसीय कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आले आहे. त्याच्याजागी आता  शाहीन शाह आफ्रिदी  एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार असणार आहे.

  • 21 Oct 2025 03:52 PM (IST)

    21 Oct 2025 03:52 PM (IST)

    युद्धविरामानंतरही संघर्ष थांबेना! ट्रम्प यांची हमासला थेट धमकी

    Donald Trump on Hamas: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गाझा येथील दहशतवादी गट हमासला कडक शब्दांत इशारा दिला आहे.

  • 21 Oct 2025 03:42 PM (IST)

    21 Oct 2025 03:42 PM (IST)

    दिवळीच्या साफसफाईवरुन आईशी वाद झाला अन् तरुणी थेट टॉवरवर…;

    Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 21 Oct 2025 03:32 PM (IST)

    21 Oct 2025 03:32 PM (IST)

    पुण्यातील सारसबागेतील पाडवा पहाट होणार रद्द?

    सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये दिवाळीच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. पाडवा पहाट असा सूरमयी कार्यक्रम घेतला जातो. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या सारसबागेमध्ये होणारा दिवाळी पहाट कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.

  • 21 Oct 2025 03:20 PM (IST)

    21 Oct 2025 03:20 PM (IST)

    भारतात प्रदूषणामुळे दररोज 5700 नागरिकांचा मृत्यू, हवा विषारी का होत आहे?

    दिवाळीच्या आतषबाजीनंतर दिल्लीची हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे. हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोकादायक श्रेणीत आली आहे. सकाळी, दिल्लीच्या बहुतेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) अत्यंत धोकादायक श्रेणीत नोंदवला गेला, जो आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.

  • 21 Oct 2025 03:14 PM (IST)

    21 Oct 2025 03:14 PM (IST)

    गिल आर्मी अ‍ॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ७ विकेट्सने पराभूत केले.

  • 21 Oct 2025 03:07 PM (IST)

    21 Oct 2025 03:07 PM (IST)

    कसा आहे हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवाचा ‘Ek Deewane Ki Deewaniyat’?

    “सैयारा” नंतर, आणखी एक बॉलीवूड रोमँटिक चित्रपट, “एक दिवाने की दिवानीयत”, आजपासून २१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. मिलाप झवेरी यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात हर्षवर्धन राणे, सोनम बाजवा, शाद रंधावा, सचिन खेडेकर आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका आहेत. सोनमसोबत हर्षवर्धनचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांची केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली होती. सोशल मीडियावर या चित्रपटाला काय प्रतिसाद मिळत आहे जाणून घेऊयात.

  • 21 Oct 2025 03:06 PM (IST)

    21 Oct 2025 03:06 PM (IST)

    काळ बनून येतोय चक्रीवादळ! पुढील २४ तासांत ११ राज्यांवर कोसळणार

    Cyclone Alert: मान्सून भारतात परतला असला तरी हवामानाचा प्रकोप अजून संपलेला नाही. हा आठवडा अनेक राज्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे

  • 21 Oct 2025 02:00 PM (IST)

    21 Oct 2025 02:00 PM (IST)

    Ladki Bahin Yojana की लाडका भाऊ योजना? 12431 पुरुषांची योजनेत घुसखोरी

    महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात धक्कादायक बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा ₹१,५०० प्रदान करते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने तपासणी केली आणि असे आढळून आले की त्यांच्या प्रमुख मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेअंतर्गत १२,४३१ पुरुष लाभ घेत आहेत. पडताळणीनंतर या पुरुषांना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले, तर ७७,९८० महिलांना अपात्र म्हणून देखील ओळखले गेले.

  • 21 Oct 2025 01:55 PM (IST)

    21 Oct 2025 01:55 PM (IST)

    जन्मजात बालकांसाठी वरदान, हाफकीन महामंडळ आणतेय पंचगुणी लस!

     हाफकिन इन्स्टिट्यूट आणि हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाचे मेकओव्हर करण्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली काही  वर्षांपूर्वी समिती स्थापन करण्यात आली हाेती. या समितीचा अहवाल शासनास नुकताच सादर करण्यात आला आहे. या समितीच्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने व समितीने सुचवलेल्या नव्या सूचनानुसार, बालकांसाठी पंचगुणी लसीची निर्मिती करण्याबाबत महत्वपूर्ण सूचनेवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

  • 21 Oct 2025 01:50 PM (IST)

    21 Oct 2025 01:50 PM (IST)

    लोकप्रिय ‘नटरंग’ नंतर तब्बल पंधरा वर्षांनी नवा तमाशापट, रवी जाधव यांचा ‘फुलवरा’ प्रेक्षकांच्या भेटीस

    पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० साली आलेल्या ‘नटरंग’ या चित्रपटाने त्या काळात अमाप लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलेहोते. तर झी टॉकीजची आणि आताची झी स्टुडिओज ही त्यांची पहिलीच निर्मिती होती. मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती करणारे झी स्टुडिओज, अथांश कम्युनिकेशन आणि दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. एक नवा कोरा तमाशापट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, ज्याचं नाव आहे ‘फुलवरा’. दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर समाजमाध्यमावरून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

  • 21 Oct 2025 01:40 PM (IST)

    21 Oct 2025 01:40 PM (IST)

    ट्रम्पच्या एच-१बी व्हिसा शुल्काबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी; या अर्जदारांना मिळणार सूट

    अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी १९ सप्टेंबर रोजी या व्हिसाच्या शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलरपर्यंत वाढ केली होती. हा नियम २१ सप्टेंबर पासून लागू झाला आहे. नुकतेच या व्हिसाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे. यानुसार काही अर्जदारांना मोठी सूट मिळणार आहे.

  • 21 Oct 2025 01:30 PM (IST)

    21 Oct 2025 01:30 PM (IST)

    भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदेंना शिवसेनेत मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच सत्तेवर असलेल्या शिवसेनेत स्थानिक व जिल्हा पातळीवर पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला बेबनाव व पदाधिकाऱ्यांची गटबाजी दिसून आली. ही परिस्थिती लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष शिस्त तसेच संघटन बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास कांदे यांची जिल्हा संघटकपदी नेमणूक केली आहे.

  • 21 Oct 2025 01:25 PM (IST)

    21 Oct 2025 01:25 PM (IST)

    : मुंबई, दिल्ली, कोलकाता…,या १० प्रमुख शहरांची हवा झाली विषारी, AQI रीडिंग्सने प्रचंड वाढ

    देशभरात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आताषबाजी आलीच. दिवाळीत जास्त प्रमाणात फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता विषारी बनली. दिवाळीनंतर देशभरात हवेची गुणवत्ता बिघडली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीपासून आर्थिक राजधानी मुंबईपर्यंत हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिल्लीचा AQI सातत्याने ‘अत्यंत खराब’ श्रेणीत राहिला आहे.

  • 21 Oct 2025 01:05 PM (IST)

    21 Oct 2025 01:05 PM (IST)

    पोलिसांच्या बलिदानाला ‘जनरल सॅल्यूट’

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पोलीस संशोधन केंद्र येथे आजच्या ‘पोलीस स्मृतिदिना’निमित्त देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस जवानांना पुष्पचक्र अर्पण केलं. त्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाला ‘जनरल सॅल्यूट’ देत भावपूर्ण आदरांजली वाहिली. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे चीनच्या हल्ल्याचा शौर्यानं प्रतिकार करत सी.आर.पी.एफ.च्या १० जवानांनी वीरमरण पत्करलं. त्यांच्या या अद्वितीय शौर्यस्मरणार्थ दरवर्षी हा दिवस ‘पोलीस स्मृतिदिन’ म्हणून साजरा केला जातो.

  • 21 Oct 2025 12:55 PM (IST)

    21 Oct 2025 12:55 PM (IST)

    बोगस शास्त्रज्ञाच्या घरावर छापेमारी

    मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रातील बनावट शास्त्रज्ञ अख्तर हुसेन अहमद याच्या ठिकाणांवर तपास यंत्रणांकडून छापेमारी करण्यात आली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. छापेमारीमध्ये काही संवेदनशील माहिती यंत्रणांच्या हाती लागल्याचे समजते.

  • 21 Oct 2025 12:45 PM (IST)

    21 Oct 2025 12:45 PM (IST)

    सरकारी पुरूष कर्मचारीही लाभार्थी

    लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक त्रुटी आढळून येत असतानाच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारमधील तब्बल २४०० पुरूष कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर सरकारकडून कारवाई केली जाणार असल्याचे समजते.

  • 21 Oct 2025 12:42 PM (IST)

    21 Oct 2025 12:42 PM (IST)

    दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा देत एक भावनिक पत्र

    दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा देत एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी जिथे देशभरातील जनतेला सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, तिथेच काही खास आवाहनही केलं आहे. पंतप्रधानांनी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार, योग आणि आरोग्य यांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूर पासून नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स पर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांचा उल्लेख केला.

  • 21 Oct 2025 12:02 PM (IST)

    21 Oct 2025 12:02 PM (IST)

    करुणा मुंडेंनी घेतला धनंजय मुंडेंचा खरपूस समाचार

    मला मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. यावर करुणा मुंडे म्हणाल्या की, त्यांनी गुन्हा केला नसला तरी जे ल गुन्हा करत होते, त्यांना पाठबळ देणारं तुझं मंत्रीपद होतं. तुझ्या मंत्रीपदाच्या जोरावर वाल्मीक कराड सारखे गुंड लोक बीडमध्ये उड्या मारत आहेत अशा शब्दांत करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप करत जोरदार हल्ला चढवला.

  • 21 Oct 2025 11:55 AM (IST)

    21 Oct 2025 11:55 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पोलीस स्मृती दिनानिमित केले अभिवादन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पोलीस स्मृती दिनानिमित्त,मुंबई येथील नायगावमधीलमपोलीस मुख्यालय येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर पोलीस हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी पोलीस स्मृतिदिन संचलनासाठी उपस्थित असलेले विविध देशांचे राजनैतिक अधिकारी, मान्यवर आणि शहीदांच्या कुटुंबियांना देखील अभिवादन केले.

    🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पोलीस स्मृती दिनानिमित्त,' पोलीस मुख्यालय, नायगाव, मुंबई येथे, हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर पोलीस हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले.
    यावेळी त्यांनी पोलीस स्मृतिदिन संचलनासाठी उपस्थित असलेले विविध… pic.twitter.com/dIUSbRroMk

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 21, 2025

  • 21 Oct 2025 11:45 AM (IST)

    21 Oct 2025 11:45 AM (IST)

    रवींद्र धंगेकरांनी थेट शेअर केला मुरलीधर मोहोळांचा व्हिडिओ

    जैन बोर्डिंग हाऊच्या जमिनीवरुन खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणावरुन महायुतीमधील नेते रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळांवर निशाणा साधला आहे. कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे, असा टोला लगावून रवींद्र धंगेकरांनी थेट व्हिडिओ शेअर केली आहे.

    कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे.

    तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच… pic.twitter.com/fNeOKb5SWG

    — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 20, 2025

  • 21 Oct 2025 11:35 AM (IST)

    21 Oct 2025 11:35 AM (IST)

    पोलीस स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा

    पोलीस स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, "आम्ही आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या धाडसाला सलाम करतो आणि कर्तव्य बजावताना त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करतो. त्यांचे दृढ समर्पण आपल्या राष्ट्राला आणि लोकांना सुरक्षित ठेवते. संकटाच्या वेळी आणि गरजेच्या वेळी त्यांचे शौर्य आणि वचनबद्धता कौतुकास्पद आहे." अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या आहेत.

    On Police Commemoration Day, we salute the courage of our police personnel and recall the supreme sacrifice by them in the line of duty. Their steadfast dedication keeps our nation and people safe. Their bravery and commitment in times of crisis and in moments of need are…

    — Narendra Modi (@narendramodi) October 21, 2025

  • 21 Oct 2025 11:25 AM (IST)

    21 Oct 2025 11:25 AM (IST)

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सैनिकांसोबत दिवाळी

    देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाचे जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा देणाऱ्या पोलिसांचे देखील कौतुक केले. त्यांनी लिहिले की, कोणताही समाज शांती आणि प्रगतीकडे तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा त्याच्यात सुरक्षितता, न्याय आणि विश्वासाची तीव्र भावना असते आणि ही जबाबदारी आपल्या पोलिस दलांच्या खांद्यावर असते. जर सैन्य राष्ट्राचे रक्षण करते, तर पोलिस समाजाचे रक्षण करतात. ज्याप्रमाणे सैन्य भारताच्या भौगोलिक अखंडतेचे रक्षण करते, त्याचप्रमाणे पोलिस भारताच्या सामाजिक अखंडतेचे रक्षण करतात.

    कोई भी समाज तभी शांति और प्रगति की ओर बढ़ सकता है जब उसके भीतर सुरक्षा, न्याय और विश्वास की भावना सुदृढ़ हो, और इसकी ज़िम्मेदारी हमारे पुलिस बलों के कंधों पर होती है।

    अगर सेना देश की रक्षा करती है, तो पुलिस समाज की रक्षा करती है। जैसे सेना भारत की भौगोलिक अखंडता की रक्षा करती… pic.twitter.com/5kvANmYW2g

    — Rajnath Singh (@rajnathsingh) October 21, 2025

  • 21 Oct 2025 11:15 AM (IST)

    21 Oct 2025 11:15 AM (IST)

    जयंत पाटलांनी शेतकऱ्यांना स्मरुण दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जयंत पाटलांनी लिहिले आहे की,"दिवाळी म्हणजे आनंदोत्सव, प्रकाश आणि समृद्धीचा सण. पण आज या प्रकाशमय सणात अनेक शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधार दाटलेला आहे. अतिवृष्टी, अस्थिर हवामान, कर्जबाजारीपणा, आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी संकटाच्या गर्तेत सापडले आहेत.ज्यांच्या कष्टावर आपल्या देशाची अन्नसंपन्नता उभी आहे, त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हरवला आहे. बी-बियाण्यांच्या किमती वाढत आहेत, पिकांचे भाव घसरत आहेत. त्यात सरकारच्या आश्वासनांचा पोकळ पाऊस. या असह्य परिस्थितीचा शेवट अनेकदा आत्महत्येत होतो आणि मागे राहतात उध्वस्त कुटुंबं, अश्रू आणि अंधार! पण दिवाळी आपल्याला शिकवते की, अंधार कितीही गडद असला तरी एक छोटीशी पणती आशेचा किरण घेऊन येतेच. शेतकऱ्यांच्या आयुष्यातही या पणतीचे तेज उजळायला हवे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमाफी मिळावी, शाश्वत शेती धोरण मिळावे, आणि त्यांच्या श्रमांचा आदर करणारी संवेदनशील शासनव्यवस्था निर्माण व्हावी. आज दिवाळीच्या या मंगलप्रसंगी आपण प्रत्येकाने ठरवूया की, शेतकऱ्याचा सन्मान हा आपला सण असावा. त्यांचं दुःख आपलं दुःख, त्यांचा आनंद आपला आनंद असावा. हाच दिवाळी साजरी करण्याचा खरा मार्ग आहे. या पवित्र सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानता आशेचा, आत्मविश्वासाचा आणि समृद्धीचा दीप उजळून निघो, ह्याच सदिच्छा," अशा शब्दांत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 21 Oct 2025 11:02 AM (IST)

    21 Oct 2025 11:02 AM (IST)

    काश्मीरी राजकारणी फारूक अब्दुल्ला यांचा जन्मदिन

    तीन वेळा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असलेले फारूक अब्दुल्ला हे एक भारतीय राजकारणी आहेत. आज त्यांचा वाढदिवस असून जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आहेत. त्यांनी १९८२ ते २००२ या काळात तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. २००९ ते २०१४ या काळात ते केंद्रीय मंत्री होते. त्यांचे वडील शेख अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरचे पहिले निवडून आलेले मुख्यमंत्री होते आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला हे देखील राजकारणात सक्रिय आहेत. उमर अब्दुल्ला हे आता जम्मू काश्मीरची धुरा सांभाळतात.  

  • 21 Oct 2025 10:59 AM (IST)

    21 Oct 2025 10:59 AM (IST)

    ट्रम्प यांनी पुन्हा सुरू केला ट्रेड वॉरचा भडका!

     पुन्हा एकदा मोठे ट्रेड वॉर सुरु झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी १५५% कर (Tarrif) लादण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी असेही स्पष्ट केले आहे की, चीन आणि अमेरिकेमध्ये कोणताही व्यापर करार झालेला आहे, पण चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर आता १५५% कर लादण्यात येईल. ट्रम्प यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

  • 21 Oct 2025 10:52 AM (IST)

    21 Oct 2025 10:52 AM (IST)

    मुलीच्या जन्मानंतरची पहिल्यांदाच सिद्धार्थ – कियाराने साजरी केली दिवाळी

    या वर्षीची दिवाळी बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीसाठी खूप खास असणार आहे. नवविवाहित जोडप्याने त्यांच्या मुलीच्या जन्मानंतरची पहिली दिवाळी साजरी केली. कियाराने तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत एक खास दिवाळी व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांच्या सेलिब्रेशनची झलक दिसली आहे.

  • 21 Oct 2025 10:43 AM (IST)

    21 Oct 2025 10:43 AM (IST)

    दिवाळीत फटाक्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचाय?

    दिवाळीच्या सणानिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीच्या सणानिमित्त मोठंमोठे फटाके फोडले जात आहेत. या फटाक्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही कोणतीही काळजी न घेता लक्षपूर्वक व्हिडीओ रेकॉर्ड केला नाही तर संपूर्ण व्हिडीओ खराब होऊ शकतो. एवढच नाही तर तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा देखील खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे चांगला व्हिडीओ कॅप्चर करता यावा आणि स्मार्टफोनचा कॅमेरा खराब होऊ नये, यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

  • 21 Oct 2025 10:35 AM (IST)

    21 Oct 2025 10:35 AM (IST)

    पराभवानंतर आकाश चोप्राने केली ICC कडे मागणी!

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यांमध्ये निकाल निश्चित करण्यासाठी अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत (DLS) वापरली जाते. या पद्धतीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. पर्थमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातही हीच पद्धत लागू करण्यात आली होती, ज्यामुळे पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात भारतीय संघाचे नुकसान झाले. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि ती अन्याय्य असल्याचे म्हटले आहे.

  • 21 Oct 2025 10:26 AM (IST)

    21 Oct 2025 10:26 AM (IST)

    रेल्वे खात्यात मोठी भरती संधी!

    भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या रेल्वे भरती मंडळा (RRB) तर्फे CEN क्रमांक 06/2025 आणि 07/2025 अंतर्गत एनटीपीसी (Non-Technical Popular Categories) भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे पदवीधर तसेच पदवीपूर्व स्तरावरील उमेदवारांसाठी हजारो पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल क्लर्क, अकाउंट्स क्लर्क, टायपिस्ट, ट्रॅफिक असिस्टंट अशा विविध पदांचा समावेश आहे. रेल्वे सेवेत स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. पदवीधर पदांसाठी अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल, तर पदवीपूर्व पदांसाठी 28 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज स्वीकारले जातील.

  • 21 Oct 2025 10:18 AM (IST)

    21 Oct 2025 10:18 AM (IST)

    काँग्रेस नेत्याने उडवली मेधा कुलकर्णींची खिल्ली

    पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांनी नमाज अदा केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी याचा निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला. इतकेच नव्हे तर,  पतीत पावन संघटना आणि मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला, तसेच त्या परिसरात गोमुत्र शिंपडण्यात आले. मात्र, पोलिसांनी या सर्व हालचालींवर मज्जाव केला. यावेळी पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाचीही झाली होती. पण या प्रकरणावरून आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मेधा कुलकर्णी यांची खिल्ली उडवली आहे.

  • 21 Oct 2025 10:10 AM (IST)

    21 Oct 2025 10:10 AM (IST)

    रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

    शेतकऱ्यांना अनेकदा नैसर्गिक आपत्तीसह इतर अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यात सिन्नरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जामगाव येथे रविवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास घडली. गोरख लक्ष्मण आव्हाड (वय ५५) असे यामध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जामगाव येथील गोरख आव्हाड हे रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या घरापासून पाचशे फूट अंतरावर असलेल्या शेतात ट्रॅक्टर घेऊन रोटा मारण्यासाठी गेले होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते घरी न परतल्याने त्यांचे चुलत बंधू शरद सदाशिव आव्हाड (वय ४९) हे शेतात पाहण्यासाठी गेले. त्यावेळी गोरख हे रोटरच्या पात्यांमध्ये अडकलेले दिसले. त्यानंतर त्यांनी घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर गोरख आव्हाड यांची पत्नी, मुलगा घटनास्थळी धावत आले.

  • 21 Oct 2025 09:52 AM (IST)

    21 Oct 2025 09:52 AM (IST)

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आकाश चोप्राचीने केली ICC कडे मागणी

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यांमध्ये निकाल निश्चित करण्यासाठी अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत (DLS) वापरली जाते. या पद्धतीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. पर्थमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातही हीच पद्धत लागू करण्यात आली होती, ज्यामुळे पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात भारतीय संघाचे नुकसान झाले. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि ती अन्याय्य असल्याचे म्हटले आहे.

  • 21 Oct 2025 09:42 AM (IST)

    21 Oct 2025 09:42 AM (IST)

    पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला

    पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या सातत्याने चर्चेत आहे, अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर अफगाणिस्तानने पीसीबीला बाॅयकाॅट करण्यात ठरवले आहे.तीन देशांमध्ये होणाऱ्या ट्राय सिरीजमधून अफगाणिस्तानने नाव मागे घेतले आहे. आता आणखी एक बातमी समोर आली आहे. एका मोठ्या निर्णयात, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिझवानला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकले आहे. पाकिस्तानकडे आता तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार आहेत.

  • 21 Oct 2025 09:32 AM (IST)

    21 Oct 2025 09:32 AM (IST)

    आनंदवार्ता! सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण

    भारतात 21 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,068 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,979 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,801 रुपये आहे. भारतात 21 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,19,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,680 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,010 रुपये आहे.भारतात आज 21 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 171.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,71,900 रुपये आहे.

  • 21 Oct 2025 09:22 AM (IST)

    21 Oct 2025 09:22 AM (IST)

    दिल्ली-एनसीआर बनतंय ‘गॅस चेंबर’

    नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. त्यातच दिवाळीच्या दिवशी दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळी गाठली आहे. राजधानी ‘गॅस चेंबर’ बनली आहे. या प्रदुषणामुळे डोळ्यांची अक्षरश: जळजळ होताना दिसत आहे. सोमवारी 38 पैकी 34 निरीक्षण केंद्रांनी ‘रेड झोन’मध्ये प्रदूषण पातळी नोंदवली आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates national international crime sports political business entertainment business breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Nagpur New Vidhanbhavan: दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाविस्टा; नागपुरात नव्या विधानभवनाची उभारणी करणार
1

Nagpur New Vidhanbhavan: दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाविस्टा; नागपुरात नव्या विधानभवनाची उभारणी करणार

Top Marathi News Today Live: हाँगकाँग विमानतळावर बोईंग ७४७ कार्गो विमान कोसळले; दोन जणांचा मृत्यू, चार जखमी
2

Top Marathi News Today Live: हाँगकाँग विमानतळावर बोईंग ७४७ कार्गो विमान कोसळले; दोन जणांचा मृत्यू, चार जखमी

Top Marathi News Today Live: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार
3

Top Marathi News Today Live: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार

Top Marathi News Today : राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन
4

Top Marathi News Today : राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.