भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेना युतीबाबत चंद्रकांत पाटली यांचे सूचक विधान (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यंदाची निवडणूक ही बंडखोरीचे राजकारण झाल्यामुळे प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र यामध्ये शरद पवार गट, ठाकरे गट व कॉंग्रेसचा मोठा पराभव झाला. अगदी यामध्ये विरोधी पक्षनेते पदावर देखील कोणत्याही विरोधी पक्षाला दावा करता आला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला सत्तेमध्ये सामील व्हायचे आहे असा दावा भाजप नेत्यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
राज्यामध्ये दोन वर्षापूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी 42 आमदारांसह शिवसेनेमध्ये बंडखोरी केली. सूरत आणि गुवाहटीला जाऊन एकनाथ शिंदेंनी राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण दिले. तसेच निवडणूक आयोगाने देखील शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव हे शिंदे गटाला दिले आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे गट हा भाजपसोबत युती करणार असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत वाढलेल्या भेटी यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. याच चर्चांना दुजोरा देणारे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रायगडावरील दौऱ्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, “अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत 500 पानी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पाहून संजय राऊत यांना चक्कर येईल. अनेक संदर्भ गोळा करुन त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. एवढा अभ्यास अमित शाह यांचा आहे. पुस्तक तयार आहे फक्त त्याचे प्रकाशन दिल्लीमध्ये करायचे की पुण्यामध्ये करायचे हे ठरणे बाकी आहे,” असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच ठाकरे गटाबाबत देखील चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. तसेच मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाला उमेदवार देखील मिळणार नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची समजूत घालून किंवा दिल्लीत चर्चा करुन आली नाहीत तर मुंबईत ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत. अर्थात त्यांनी यायचं की नाही, त्यांना बरोबर घ्यायचं की नाही हे माझे विषय नाही. याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागलेत? मी एक अंदाज वर्तवला आहे. जर ते आले नाहीत गळती लागत लागत इतकी लागेल की पुणे, कोल्हापूर सोडून द्या ठाकरेंना मुंबईत उमेदवार मिळणार नाहीत,” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरेबाबत केला आहे.