Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकवणार, जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार दिल्यास..,’ परिवहनमंत्री सरनाईकांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. १०५ दिवसांच्या उपक्रमातून १ लाख ६५ हजार ८०० चालकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, पुढेही कार्यशाळा सुरू राहणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 25, 2026 | 07:35 PM
Pratap Sarnaik

Pratap Sarnaik

Follow Us
Follow Us:
  • १ लाख ६५ हजार ८०० रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले.
  • मराठी शिकण्यासाठी चालकांना सुरुवातीला एक महिना आणि गरजेनुसार आणखी तीन महिन्यांची मुदत.
  • जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द होऊ शकतो.
मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधता यावा, यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. परिवहन विभागाने १०५ दिवसांच्या विशेष मोहिमेत राज्यातील सुमारे १ लाख ६५ हजार ८०० रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे प्रशिक्षण दिले आहे. हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सरनाईक यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी कामगार नेते शशांक राव तसेच कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठी शिकण्यासाठी कार्यशाळा सुरू राहणार

रिक्षा-टॅक्सी चालकांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सरनाईक यांनी सांगितले. महाराष्ट्राची भाषा, अस्मिता आणि संस्कृती यांचा आदर राखण्याची भूमिका अनेक चालकांनी व्यक्त केली आहे.

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट…

ज्या चालकांनी अद्याप मराठीचे प्रशिक्षण घेतलेले नाही, त्यांच्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार आणि नवी मुंबई परिसरातील प्रशिक्षण केंद्रांची माहिती संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या केंद्रांची माहिती मिळण्यासाठी स्वतंत्र संपर्क क्रमांकही लवकरच जाहीर केला जाणार आहे.

मराठी शिकण्यासाठी अतिरिक्त मुदत

चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याबाबत सरनाईक यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. सुरुवातीला एक महिन्याची मुदत दिली जाणार असून, आवश्यकता भासल्यास त्यानंतर आणखी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल.

या काळात संबंधित चालकांना मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. कायद्यानुसार बॅज निलंबित करण्याची कारवाई होऊ शकते; मात्र या तीन महिन्यांच्या मुदतीत बॅज रद्द केला जाणार नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

त्यानंतरही एखाद्या चालकाने जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार दिल्यास संबंधित कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

‘अफवांवर विश्वास ठेवू नका’

परिवहन विभागाने हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेच्या भावनेतून राबविल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मात्र, विभागाच्या निर्देशांचे उल्लंघन करून कोणी कायद्याच्या कक्षेबाहेर काम करत असल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ड्रग्ज माफियांवर थेट प्रहार! पोलिसांनी सुरू केली ‘ही’ विशेष धडक मोहीम

मुंबई आणि ठाणे परिसरातील वातावरण बिघडविण्याचा काही समाजकंटकांकडून प्रयत्न होत असल्याचा दावा करत त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी शासन सातत्याने चर्चा करत असून, त्यांच्या सूचनांचा विचार करूनच कारवाई केली जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.

दरम्यान, मराठी भाषा विभागाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’अंतर्गत हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचे धोरण असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Web Title: Marathi language training auto taxi drivers pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • Auto Driver
  • Maharashtra Transport Department
  • Marathi language Compulsory
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Mumbai Auto Taxi Shortage: मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोची कमतरता; MMRमधील प्रवासावर ‘मराठी राजवटी’चा परिणाम
1

Mumbai Auto Taxi Shortage: मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोची कमतरता; MMRमधील प्रवासावर ‘मराठी राजवटी’चा परिणाम

Maharashtra Politics: ‘… अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करणार’; प्रताप सरनाईकांचा इशारा
2

Maharashtra Politics: ‘… अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करणार’; प्रताप सरनाईकांचा इशारा

ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून बंधनकारक; नियम न पाळल्यास परमिटच होणार रद्द
3

ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून बंधनकारक; नियम न पाळल्यास परमिटच होणार रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.