Raj Thackeray Live: "आम्हाला एकत्र आणणे बाळसाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना..."; राज ठाकरेंचा घणाघात
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally in Mumbai Live: आज मुंबईच्या वरळी येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्रितपणे विजयी मेळावा होणार आहे. मराठी अस्मितेच्या एकतेसाठी लाखो लोक ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनसागर लोटल्याचे पाहायला मिळत आहे.या मेळाव्याचे केंद्रबिंदू फक्त ठाकरे बंधू नव्हे, तर मराठी माणसाचा स्वाभिमान, संस्कृती आणि एकजूट असल्याचे मानले जात आहे. दरम्यान या विजयी मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केले.
राज ठाकरे म्हणाले, “आमची भाषणे संपली की एकत्रितपणे आरोळ्या ठोका. खरेतर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूने कसा एकवटतो ते मोठ्या प्रमाणावर दिसून आले. पण केवळ मोर्च्याच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरतर आजचा मेळावा शिवतीर्थावर होयला हवा होता. मात्र पावसामुळे ते शक्य नाही. कोणत्याही वादापेक्षा, भांडणाशिवाय महाराष्ट्र मोठा आहे.”
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “आज जवळपास 20 वर्षांनी मी आणि उद्धव एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. आम्हा दोघांना एकत्र आणायचे जे बाळासाहेब ठाकरेंना जमले नाही. जे अनेकांना जमले नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं.”
सरकारची सत्ता विधानभवनात – राज ठाकरे
हिंदी सक्तीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले कुणालाही न विचारता हिंदी सक्ती कशासाठी? तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून का? तुमची सत्ता विधानभवनात. इथं रस्त्यावर आमची सत्ता आहे, असे राज ठाकरे यांनी सुनावलं. तसेच “आता सर्वच चॅनेलचे कॅमेरे इकडे लागले तिकडे लागले. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. काय वाटतं काय,. दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कोणी कमी हसलं का. बोलतायत का. आपल्याकडे इतर विषय सोडून इतर गोष्टीत रस असतो अनेकांना. आजचा हा मेळावा. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी,” असं राज ठाकरे म्हणाले. आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये…असं देखील राज ठाकरे यांनी सांगितले.
हिंद प्रांतावर १२५ वर्षे मराठ्यांनी राज्य केले. आम्ही कधी मराठी लादली का? गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब कुठेही मराठी लादली नाही. हिंदी भाषा २०० वर्षांपूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही ती भाषा नव्हती. कुणासाठी आणि कशासाठी काय करायचं आहे नेमकं? यांनी फक्त चाचपडून पाहायलं. मुंबई स्वातंत्र्य करता येतेय का? त्यासाठी चाचपडून टाकलं. महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावे. आम्ही सांगतोय याचा अर्थ …डू नाही. काहीही अंगावर लादायचा प्रयत्न करता. माघार घेतलं त्याचं काय करायचं. वेगळ्या ठिकाणी सगळं प्रकरण वळवा. ठाकरेंची मुलं इंग्रजीमध्ये शिकली. पुढे काय? कुठे काय शिकलो याचा काय संबंध? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.