• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Marathwada Politics Former Mlas Kunal Patil And Apoorva Hire To Join Bjp Tomorrow

Marathwada Politics: ठाकरेंच्या गडाला सुरूंग; दोन बड्या नेत्यांचा उद्या भाजप प्रवेश निश्चित

काही दिवसांपूर्वीच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे  नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यानंतर विलास शिंदे यांनीही ठाकरे गटाला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेतले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 30, 2025 | 10:20 AM
Marathwada Politics: ठाकरेंच्या गडाला सुरूंग; दोन बड्या नेत्यांचा उद्या भाजप प्रवेश निश्चित

दोन माजी आमदार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

BJP Politics: राज्याच्या राजकीय वर्तुळात दिवसेंदिवस उलथापालथी घडत आहेत. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षासाठी पक्षबांधणीची तयारीही सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकांसाठीही सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष विरोधी पक्षांचे नेते फोडताना दिसत आहेत. अशाताच उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला सुरूंग लावण्यात सत्ताधारी भाजपला पुन्हा यश आल्याचे दिसत आहे. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी भाजपचे संभाव्य भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी हे दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला उत्तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अपूर्व हिरे हे पूर्वी शिक्षक मतदार संघाचे आमदार होते. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आता अपूर्व हिरे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असून त्याचे भाजपच्या अंतर्गत गटराजकारणाशी मोठे संबंध जोडले जात आहेत.

US Open 2025 : आयुष शेट्टीने BWF 2025 चा दुष्काळ संपवला! जेतेपत केले नावावर, तन्वी शर्मा ठरली उपविजेती

महत्त्वाची बाब म्हणजे , सुधाकर बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशावर नाराजी व्यक्त करणाऱ्या आमदार सीमा हिरे यांनी मात्र अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे. त्यामुळे बडगुजर यांना राजकीय शह देण्यासाठी हिरे यांचा भाजपप्रवेश घडवून आणल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजप अधिक बळकट होणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही स्थिती चिंतेची ठरू शकते.

धुळ्याचे कुणाल पाटील हे काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रमुख नेते होते. या पट्ट्यात त्यांचा मोठा प्रभावही आहे. कुणाल पाटील यांच्या भाजपप्रवेशाने याठिकाणी भाजपची ताकद वाढणार असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, कुणाल पाटील हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण आता त्यांचाही पक्ष सोडण्याची निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कुणाल पाटील यांच्याही भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनाही त्यांच्या भाजप प्रवेशाचा निरोप पाठवण्यात आल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आली आहे. उद्या (१ जुलै) दुपारी दोन वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.

कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात सतत वेदना होतात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ पाणी, पोट होईल स्वच्छ

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे  नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यानंतर विलास शिंदे यांनीही ठाकरे गटाला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेतले. बडगुजर आणि शिंदे यांच्या भाजपप्रवेशानंतर आता नाशिकमध्ये ठाकरे गट खिळखिळा झाल्याचे चित्र असून, शिंदे आणि बडगुजर यांच्यासोबत अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील भाजपमध्ये सामील झाले आहेत.

या घडामोडींमुळे आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. भाजपने स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी आखलेला डाव यशस्वी होताना दिसत आहे. एकीकडे ठाकरे गटातील नेतृत्व निष्ठावंतांना एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे भाजपकडून नेत्यांच्या प्रवेशाची मालिका सुरूच असून, याचा राजकीय फायदा भाजपच्या पारड्यात पडतोय, असे बोलले जात आहे.

शरद पवारांचा माजी आमदारही सोडणार साथ

शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची चिन्हं आहेत. माजी आमदार विजय भांबळे हे उद्या (१ जुलै) अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

सेलू-जिंतूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरले होते. नवाब मलिक यांच्या प्रयत्नातून भांबळे यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रवेशासाठी मुंबईत महिला विकास महामंडळाच्या कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. या प्रवेशामुळे मराठवाड्यातील राष्ट्रवादीतील गटबाजी अधिक स्पष्ट होत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटासाठी ही स्थिती चिंताजनक ठरू शकते.

Web Title: Marathwada politics former mlas kunal patil and apoorva hire to join bjp tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • Marathwada
  • Nashik

संबंधित बातम्या

Maharashtra Weather : नाशकात हुडहुडी, वातावरणातील गारठ्याने ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या, किमान तापमान १०.१ अंशांवर
1

Maharashtra Weather : नाशकात हुडहुडी, वातावरणातील गारठ्याने ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या, किमान तापमान १०.१ अंशांवर

Nashik Crime: मालेगाव हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; 24 वर्षीय आरोपी अटक
2

Nashik Crime: मालेगाव हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; 24 वर्षीय आरोपी अटक

Nashik News : अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस; नगराध्यक्षपदासाठी ६०, नगरसेवकपदासाठी ९८० अर्ज दाखल
3

Nashik News : अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस; नगराध्यक्षपदासाठी ६०, नगरसेवकपदासाठी ९८० अर्ज दाखल

Nashik News: भांडवलदारांच्या फायद्यासाठी नाशकात मराठी शाळेचा बळी? “निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन करू” माजी विद्यार्थ्यांचा इशारा
4

Nashik News: भांडवलदारांच्या फायद्यासाठी नाशकात मराठी शाळेचा बळी? “निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन करू” माजी विद्यार्थ्यांचा इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

Nov 19, 2025 | 04:15 AM
ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Nov 19, 2025 | 02:35 AM
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM
I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Nov 18, 2025 | 10:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.