फोटो सौजन्य – X (badminton photo)
आयुष शेट्टी US ओपन चॅम्पियन : भारताच्या दोन्ही युवा बॅडमिंटन खेळाडूंनी युएस ओपनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. 30 जून रोजी मध्यरात्री यूएसए 2025 ओपनचे अंतिम सामने खेळवण्यात आले. यामध्ये भारताच्या संघाने महिला एकेरी आणि पुरुष एकेरी या दोन्ही कॅटेगिरीमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. पुरुष एकेरीमध्ये भारताचा आयुष शेट्टी याने त्याचे बीडब्ल्यूएफचे पहिले जेतेपद नावावर केले आहे. त्याचबरोबर 2025 मधील बीडब्ल्यूएफ जेतेपदाचा दुष्काळ देखील त्याने संपवला. त्याच्या या कामगिरीने चाहत्यांचे लक्ष वेधले.
वीस वर्षाच्या आयुष शेट्टी याने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली. अंतिम फेरीमध्ये त्याची कामगिरी प्रभावशाली राहिली आणि सलग २१–१८, २१–१३ असा खेळ 47 मिनिटात जिंकून जेतेपद नावावर केले. आयुष शेट्टी याने जागतिक क्रमवारीमध्ये चांगला स्तरावर असलेला कॅनडियन खेळाडूला पराभूत केले. स्पर्धेचा अव्वल मानांकित चाऊ तिएन चेनला फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत करून शानदार कामगिरी केली.
महिला एकेरी मध्ये तन्वी शर्मा हिने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता या फायनल च्या सामन्यांमध्ये तिला विजय मिळवण्यात ती अपयशी ठरली आणि स्पर्धेची उपविजेती राहिली. तिचा सामना अव्वल मानांकित बेइवेन झांग विरुद्ध सामना पार पडला. तन्वी शर्मा हिचा ११–२१, २१–१६, १० –२१ असा तिला पराभवाचा सामना करावा लागला. फायनलच्या सामन्या तिच्या हाती निराशा लागली मागील एक आठवड्यात तिला शरीराची झुंज द्यावी लागली. याआधी तिने खेळलेला स्पर्धेमध्ये तिला सामना मध्यात सोडावा लागला होता यावेळी तिच्या पायाला दुखापत झाली होती.
20 YEAR OLD AYUSH SHETTY CREATES HISTORY BY WINNING US OPEN 2025 TITLE! 🏆
Ayush defeated Brian Yang of Canada 21-18, 21-13 in Finals to clinch first ever BWF Tour Title 💪
🌟 First Indian to win BWF Tour Title in 2025
🌟 First Indian MS Title in BWF Tour after 2023REMEMBER… pic.twitter.com/JNG1BFM4ec
— The Khel India (@TheKhelIndia) June 29, 2025
आयुष शेट्टीच्या सामन्या बद्दल सांगायचे झाले तर फायनलच्या सामन्यांमध्ये ६–६ सामना समान पातळीवर सुरू होता त्यानंतर आयुष शेट्टीने आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत आयुष शेट्टीने ११–६ अशी बरोबरी आहे. दुसऱ्या फेरीमध्ये आयुष शेट्टी याने अनेक चुका केल्या होत्या. त्याच्या चुकामुळे 16–16 अशा आघाडी झाली होती. पण काही चांगल्या शॉर्ट्समुळे आयुष शेट्टी याने आघाडी घेतली आणि सामना जिंकला.