Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : बुलढाण्यात धक्कादायक घटना; दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवत विवाहितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे एका विवाहितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अज्ञात आरोपींनी शेतातील घरात घुसून दाम्पत्याला चाकू आणि विळ्याचा धाक दाखवत लुटमार केली आणि पतीला धमकावत विवाहितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 19, 2026 | 09:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव परिसरात एका विवाहितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि.) रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात आरोपींनी शेतातील घरात घुसून दाम्पत्याला चाकू आणि विळ्याचा धाक दाखवत लुटमार केली. त्यानंतर पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेला जबरदस्तीने शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

Mumbai High Tide Alert: अरबी समुद्रात ‘हाय टाईड’चा धोका; पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे, प्रशासनाचा ऑरेंज अलर्ट!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिचा पती दुधलगाव येथील शेतातील घरात झोपलेले असताना शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आरोपींपैकी एकाच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात विळा होता. दोघांनी दाम्पत्याला शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि ६०० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांनी घरात सोन्या-चांदीचे दागिने असल्याची विचारणा केली. दागिने नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी दाम्पत्याला जबरदस्तीने जवळील शेतात नेले.

शेतात गेल्यानंतर एका आरोपीने पतीला विळ्याचा धाक दाखवत रोखून ठेवले, तर दुसऱ्या आरोपीने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला, अशी तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे दिली आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाले.

या घटनेनंतर पीडित महिलेने मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध सामूहिक लैंगिक अत्याचार, दरोडा, घरफोडी, धमकी आणि इतर संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Buldhana News : बोगस बियाणेप्रकरणी गुन्हा दाखल! मध्य प्रदेश राज्यातील कंपनी; तालुका कृषी अधिकाऱ्यांची तक्रार

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक, सहाय्यक पोलिस अधीक्षक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात आले असून, आरोपींचा माग काढण्यासाठी विविध तांत्रिक माध्यमांचाही वापर केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात किंवा शेतघरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात गस्त वाढविण्याची आणि अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पोलिसांनीही नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Married woman gang raped after couple threatened with a weapon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

Buldhana News : एसटी बसस्थानक परिसरात वृक्षारोपण! राज्य परिवहन विभागीय कार्यालयातर्फे पर्यावरणाचा संदेश
1

Buldhana News : एसटी बसस्थानक परिसरात वृक्षारोपण! राज्य परिवहन विभागीय कार्यालयातर्फे पर्यावरणाचा संदेश

Buldhana News : बोगस बियाणेप्रकरणी गुन्हा दाखल! मध्य प्रदेश राज्यातील कंपनी; तालुका कृषी अधिकाऱ्यांची तक्रार
2

Buldhana News : बोगस बियाणेप्रकरणी गुन्हा दाखल! मध्य प्रदेश राज्यातील कंपनी; तालुका कृषी अधिकाऱ्यांची तक्रार

Buldhana News : २२ हजार हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण! ३३११३ शेतकऱ्यांचा सहभाग; २.६७ कोटींचा प्रीमियम जमा
3

Buldhana News : २२ हजार हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण! ३३११३ शेतकऱ्यांचा सहभाग; २.६७ कोटींचा प्रीमियम जमा

Buldhana News : जिगाव धरण प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करा; मंत्री संजय सावकारे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
4

Buldhana News : जिगाव धरण प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करा; मंत्री संजय सावकारे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.