Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : २२ हजार हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण! ३३११३ शेतकऱ्यांचा सहभाग; २.६७ कोटींचा प्रीमियम जमा

'एक रुपयात पीकविमा योजना' बंद झाल्यानंतर आता पिकानुसार प्रीमियम भरावा लागत असला, तरी नैसर्गिक आपत्तींविरुद्ध संरक्षणासाठी शेतकऱ्यांचा विम्याकडे कल कायम आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 19, 2026 | 07:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण ५ लाख ७२ हजार १२८ शेतकऱ्यांपैकी ३३ हजार ११३ शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीकविमा काढला असून, २२ हजार ६६० हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मिळून २ कोटी ६७ लाख रुपयांचा प्रीमियम भरला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता 10 क्षेत्रीय कार्यालये; 30 स्वीकृत सदस्यपदांसाठी भाजपमध्ये चुरस

राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी सुरू केलेली ‘एक रुपयात पीकविमा योजना’ बंद झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना पिकानुसार निश्चित करण्यात आलेला प्रीमियम भरावा लागत आहे. त्यामुळे विमा नोंदणी प्रक्रियेत बदल झाला असला, तरी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर आणि इतर संकटांपासून आर्थिक संरक्षण मिळावे या उद्देशाने अनेक शेतकरी अजूनही पीकविमा काढत आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन या मुख्य पिकाचा सर्वाधिक विमा उतरवला आहे. त्यानंतर कापूस आणि तूर या पिकांचा क्रमांक लागतो. सध्या सोयाबीनसाठी १,२५० रुपये, कापसासाठी १,३०० रुपये, तुरीसाठी ९४० रुपये, मक्यासाठी १०० रुपये, उडीदसाठी ७६ रुपये आणि मुगासाठी ७५ रुपये प्रति हेक्टर प्रीमियम निश्चित करण्यात आला आहे.

Monsoon Update : मान्सूनचा जोर वाढणार? ISRO ‘त्या’ फोटोमुळे वाढली चिंता

गतवर्षी बुलढाणा जिल्ह्यात २ लाख ७० हजार १६७ शेतकऱ्यांनी सुमारे ५ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला होता. त्या तुलनेत यंदा नोंदणीची गती काहीशी कमी असली, तरी अंतिम मुदतीपूर्वी या संख्येत मोठी वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पांगरी येथील शेतकरी बबन वायाळ यांनी ‘एक रुपयात पीकविमा योजना’ बंद करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अनेक शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्यामुळे विमा भरण्यात अडचणी येत आहेत. तर जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी यंदा ‘एल निनो’ चा प्रभाव जाणवण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी पीकविमा काढून घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Buldhana news insurance coverage for 22000 hectares of land

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन
1

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड
2

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी
3

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी

Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना
4

Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.