Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरातील इमामवाड्यात भीषण स्फोट; कुटुंब साखर झोपेत असताना आगीचा भडका उडाला अन्…

स्फोटाच्या आवाजाने आसपासचे नागरिक घाबरून जागे झाले. घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक व नाशक पथकासह श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 19, 2024 | 01:18 PM
मोठी बातमी ! सिलेंडरच्या स्फोटानंतर तीन मजली इमारत कोसळली

मोठी बातमी ! सिलेंडरच्या स्फोटानंतर तीन मजली इमारत कोसळली

Follow Us
Follow Us:

नागपूर : कुटुंब साखर झोपेत असताना अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यात पती-पत्नी व त्यांची दोन मुले गंभीररित्या होरपळली. सर्व जखमींना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये सुरेंद्र पाल, रमा सुरेंद्र पाल आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. ही खळबळजनक घटना बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास इमामवाडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली.

हेदेखील वाचा : Cyber Crime: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल १,१६१ कोटींचा सायबर फ्रॉड; गुन्हेगारीसाठी ‘या’ पॅटर्नचा सर्वाधिक वापर

स्फोटाच्या आवाजाने आसपासचे नागरिक घाबरून जागे झाले. घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक व नाशक पथकासह श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र, स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा अद्याप शोध लागला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाल हे पत्नी रमा, 11 वर्षांची मुलगी व 13 वर्षांच्या मुलासह इमामवाड्यातील आयसोलेशन रुग्णालयाजवळ राहतात.

पाणीपुरी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री सर्वांनी सोबत जेवण केले आणि झोपी गेले. पहाटे 3-3.30 वाजताच्या सुमारास संपूर्ण कुटुंब साखर झोपेत असताना स्वयंपाक खोलीत अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. या स्फोटात पती-पत्नीसह दोन्ही मुले गंभीररित्या होरपळली. इमामवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी इमामवाडा पोलिसांसह बीडीडीएस आणि श्वान पथकाने घटनास्थळी पाहणी केली.

तसेच तपासणी करण्यासाठी अग्निशमन विभागालाही पत्र दिले आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. कदाचित गॅस सिलिंडरमध्ये लिकेज असल्याने स्फोट झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

एसटी डेपोतील शिवशाही बस पेटवली

दरम्यान, दुसरीकडे एसटी डेपोतील शिवशाही बस अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आली आहे. यासह तीन बसच्या काचा फोडण्यात आल्या. परभणी येथील पोलीस कोठडीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणामुळे सोलापूरात पडसाद उमटले. बसवर दगडफेक आणि आंदोलन करण्यात आले. सोलापूरात बंदच्या हाकेला समिश्र प्रतिसाद मिळाला.

हेदेखील वाचा : Pune Crime News: चोरट्यांनी महिलेला चालत्या गाडीवर धक्का दिला अन्…; आळंदीतील धक्कादायक घटना

Web Title: Massive explosion at imamwada in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 01:18 PM

Topics:  

  • Battery Blast
  • Nagpur News

संबंधित बातम्या

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
1

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
2

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
3

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
4

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.