Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : अधिवेशनापूर्वी अवैध होर्डिंग्जवर मनपाचा बडगा; विशेष मोहीम राबवणार

Nagpur News : नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी महानगरपालिका प्रशासनाने अवैध होर्डिंग्जविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनधिकृत जाहिरात फलक हटवून रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे मोकळी करण्यासाठी मनपाकडून कारवाई केली जाणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 21, 2026 | 03:25 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ७ डिसेंबरपासून शहरात वाढणार गर्दी
  • जाहिरात कुणासाठी, त्याचीही जबाबदारी निश्चित
  • ३ कायद्यांतील तरतुदींनुसार कारवाईचा इशारा
  • रस्ते, पदपथ, मेट्रोचे खांबही जाहिरातबाजीसाठी बंद
Nagpur News : एकीकडे राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असताना नागपुरातून एक बातमी समोर येत आहे . अलीकडच्या काळात जागोजागी लागणाऱ्या राजकीय तसेच सामाजिक आणि इतर अनेक प्रकारच्या होर्डिंग्समुळे शहराला एक बकालपणा येत आहे . यात सगळ्याच पक्षाचे लोक कार्यरत आहेत . इतकेच न्हवे तर या सगळ्याच पक्षात एक मोठमोठ्या होर्डिंग्सची रस्सीखेच सारखीच लागून राहिली आहे .

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत बॅनर, पोस्टर आणि होर्डिंग्जचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता कठोर पवित्रा घेतला असून, शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीविरोधात विशेष मोहीम राबविण्याची तयारी केली आहे. स्काय साइन, जाहिरात फलक, कटआउट, स्वागत कमानी, तोरण आणि पताका लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

अवैध होर्डिंग्ज आणि पोस्टरप्रकरणी उच्च न्यायालयात मनपाविरुद्ध अवमानना याचिका सुरू आहे. शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यासाठी पुढील सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे न्यायालयीन कारवाईची टांगती तलवार लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

Nagpur News : ईडीकडून रेती माफियांची १६ कोटींची मालमत्ता जप्त; नागपूर-भंडाऱ्यात मोठी कारवाई

७ डिसेंबरपासून शहरात वाढणार गर्दी

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. सरकार नागपुरात दाखल होणार आहे. अशा वेळी शहरातील रस्ते, चौक आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ व आकर्षक ठेवण्याची जबाबदारी मनपावर आहे. बॅनर आणि पोस्टरमुळे सार्वजनिक मालमत्तेचे होणारे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात कुणासाठी, त्याचीही जबाबदारी निश्चित

मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी नागरिकांसह सामाजिक, व्यावसायिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत जाहिरात लावणाऱ्यांसोबतच ज्या व्यक्तीचा, संस्थेचा किंवा राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी ती लावण्यात आली आहे, त्यांनाही जबाबदार धरले जाणार आहे. थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मेश्राम यांनी दिला.

Nagpur News : दुर्बल घटकांच्या निधीवरून सभापती बॅकफूटवर; ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती; सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश

३ कायद्यांतील तरतुदींनुसार कारवाईचा इशारा

उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका आणि अवमानना याचिकेतील आदेशांची अंमलबजावणी करणे मनपासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध न्यायालयाच्या अवमाननेची कारवाई होऊ शकते.
याशिवाय महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २४५, महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्ह व जाहिरात प्रदर्शनाचे विनियमन आणि नियंत्रण) नियम २०२२ आणि महाराष्ट्र मालमत्ता विदूपीकरण प्रतिबंधक अधिनियम १९९५ मधील तरतुर्दीनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे.

रस्ते, पदपथ, मेट्रोचे खांबही जाहिरातबाजीसाठी बंद

मनपाच्या परवानगीशिवाय शहरातील कोणत्याही सार्वजनिक जागेचा जाहिरातींसाठी वापर करता येणार नाही. रस्ते, पदपथ, वीज खांब, वाहतूक सिग्नल, ट्रैफिक आयलँड, मेट्रोचे खांब आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी बॅनर, पोस्टर, कटआउट, जाहिरात फलक, स्वागत कमानी किंवा पताका लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

Web Title: Nagpur illegal hoardings drive cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Illegal Hoarding
  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर
1

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर

NCP Politics: फडणवीसांवरील आरोपांवर आदिती तटकरे यांनी सोडलं मौन; नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या
2

NCP Politics: फडणवीसांवरील आरोपांवर आदिती तटकरे यांनी सोडलं मौन; नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या

Raigad News: पेणच्या खारेपाटात पाणीटंचाई तीव्र; चार दिवसांतून एकदाच नळाला पाणी, नागरिक त्रस्त
3

Raigad News: पेणच्या खारेपाटात पाणीटंचाई तीव्र; चार दिवसांतून एकदाच नळाला पाणी, नागरिक त्रस्त

Chandrapur News: धान कापणी सुरू असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी; सिंदेवाहीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली
4

Chandrapur News: धान कापणी सुरू असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी; सिंदेवाहीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.