पुण्यात वर्षभरात सायबर क्राईमच्या घटनेत वाढ (फोटो - istockphoto)
पुणे: शिक्षण व आयटी हब अन् औद्योगिकनगरी असणाऱ्या दोन शहरात आणि ग्रामीणमधील ६५ हजार पुणेकरांना “जाळ्यात” ओढून सायबर चोरट्यांनी वर्षातच तब्बल ११६१ कोटींचा फ्रॉडकरून आर्थिक फसवणूक केली आहे. आतापर्यंत सायबर गुन्ह्यांतील ही सर्वात मोठी फसवणूक आहे. पुणेकरांची सर्वाधिक फसवणूक झाली असून, त्याखालोखाल पिंपरी-चिंचवड तसेच पुणे ग्रामीणचा क्रमांक लागत असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. या वर्षात जवळपास १५ टक्यांनी तक्रारींची संख्या वाढल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे सायबर पोलिसांची कामगिरी मात्र सुमार आहे.
शहरात, शिक्षण व नोकरी यानिमित्ताने येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यासोबत उद्योग व व्यावसायामुळे देखील मोठे नागरिककरण झाले आहे. एक कोटींच्या पुढे दोन शहराची संख्या गेली आहे. शहरात उच्चशिक्षीतांचे प्रमाण देखील मोठे आहे. आपसूकच त्यामुळे या डिजीटल युगात प्रत्येकजन आर्थिक व्यवहार देखील ऑनलाईन करू लागले आहे. ऑनलाईन व्यावहराला प्रथम प्राधान्य देणारे पुणे शहर होते. परंतु, आता जादा पैशांची ओढ अन् झटपट श्रीमंत होण्याचा हव्यासामुळे मात्र, कोट्यवधी रुपयांना फसवणूक होऊ लागला आहे. तर दुसरीकडे न काही करताच भिती दाखवून फसविले जात आहे. एकाठिकाणी बसून हे सायबर चोर कोट्यवधी रुपयांना गंडा घालत आहेत.
दरवर्षी सायबर गुन्हेगारीचा पॅटर्न बदलतो. त्यात आमिष, भिती व भावनिकता हे तीन प्रमुख वैशिष्टय पाहिला मिळते. अमाप पैसा, तर कधी पोलीस कारवाईची भिती आणि हाताला काम देणे अशा त्रीसुत्री पॅटर्न राबवत फसविले जाते. शेअर बाजारात गुंतवणूकीवर चांगला नफा देऊ, गुंतवणूकीवर चांगला परतावा दिला जाईल, अथवा विवाह व मैत्रीकरून परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे सांगत आमिष दाखवून फसवले जाते.
तर, तुमच्या नावाने पाठवलेले पार्सल पकडले असून, त्यात डेबीटकार्ड, पासपोर्ट तसेच आमली पदार्थ सापडले आहे. त्यामुळे तुमच्यावर पोलीस कारवाई होईल अशी भिती दाखवत फसविले जाते. नंतर तुम्हाला घरबसल्या काम देऊ असे सांगत टास्क दिले जातात. विश्वास संपादन करण्यासाठी प्रथम काही परतावा दिला जातो. नंतर मात्र, टास्क मिळविण्यासाठी पैसे उकळले जात आहेत. चालू वर्षात पोलीस कारवाईची भिती, शेअर बाजारातील गुंतवणूक तसेच टास्कच्या आमिषाने सर्वाधिक फसवणूक झाल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.
डिजीटल अॅरेस्टप्रकरणात ज्येष्ठ नागरिकांना हेरले जात आहे.
– पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याची भिती दाखविण्यात तरुणाई टार्गेट केले जाते.
– ऑनलाईन कामासाठी इच्छुक असणाऱ्यांना टास्क फ्रॉडमध्ये फसविले जाते.
– शेअर मार्केटमधून जास्त परतावा देण्याचे आमिषाने अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते.
वर्षभरातील सायबर फ्रॉडमधील रक्कम
पिंपरी-चिंचवड—२७ हजार तक्रारी – ४२९ करोड
पुणे शहर—३८ हजार तक्रारी – ६६९ करोड
पुणे ग्रामीण- फसवणूक रक्कम ६४ कोटी