Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : सरत्या पावसाने माथेरानला झोडपलं! सुट्टीची मज्जा घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची तारांबळ

परतीच्या पावसाने अचानक कमबॅक केल्यामुळे माथेरान परिसरात पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे दिवाळीची सुट्टीचा आनंद पर्यटकांना पूर्णपणे घेता आला नाही.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 25, 2025 | 09:35 PM
सरत्या पावसाने माथेरानला झोडपलं!

सरत्या पावसाने माथेरानला झोडपलं!

Follow Us
Close
Follow Us:
  • परतीच्या पावसाचा माथेरानला फटका
  • सततच्या पावसामुळे पर्यटकांची तारांबळ
  • पर्यटकांच्या उत्साहावर पाणी
माथेरान/संतोष पेरणे : माथेरान या लोकप्रिय पर्यटनस्थळी सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर अनेक पर्यटकांनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी माथेरानची वाट धरली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सरत्या पावसाने या पर्यटकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. दिवसभर अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली.

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असून, येथील गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक हिवाळ्यात मोठ्या संख्येने येथे येतात. दिवाळीनंतरच माथेरानमधील हिवाळी पर्यटन हंगामाला सुरुवात होते. त्यामुळे येथील हॉटेल व्यवसायिक गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी दिवाळीनंतरचा पर्यटन हंगाम लक्ष्मीपूजनानंतर सुरू होतो आणि किमान १५ दिवस पर्यटकांची तुफान गर्दी या भागात पाहायला मिळते.

Matheran News : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची माथेरानला पसंती; मात्र ‘या’ कारणासाठी येणारे पर्यटक नाराज

यावर्षीही गुजरातसह इतर राज्यांतील पर्यटक मोठ्या संख्येने माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. शहरात रंगीबेरंगी रोषणाई, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली रेलचेल आणि पर्यटन व्यवसायात आलेली चैतन्याची लहर यामुळे माथेरान पुन्हा एकदा सजून निघाले आहे. मात्र यंदा पावसाळा लांबल्याने आणि सरता पाऊस अद्याप सुरू असल्याने पर्यटन हंगामावर त्याचा परिणाम स्पष्ट दिसत आहे.

दिवाळी आणि विकेंडच्या सुट्ट्यांमुळे माथेरानमध्ये गर्दीचा शिखरबिंदू गाठला असला, तरी मुसळधार पावसाने पर्यटकांना हॉटेलमध्येच थांबवून ठेवले आहे. अखंड सुरू असलेल्या पावसामुळे अनेक पर्यटकांना फिरायला अडचणी येत आहेत. काही पर्यटक प्लास्टिक रेनकोट घालून पावसाचा आनंद घेताना दिसत असले, तरी थंड वातावरण आणि ओलसर हवा यामुळे सर्दी, ताप किंवा आजारपणाची भीती निर्माण झाली आहे.

1 खुर्ची, 2 महिला अधिकारी…! गडकरींसमोरच दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये जुंपली; एकीने दुसरीच्या अंगावर ओतलं पाणी; Video Viral

सध्याचा हा सरता पाऊस माथेरानच्या सौंदर्यात भर घालत असला, तरी पर्यटन व्यवसायासाठी मात्र अडथळा ठरत आहे. येथील स्थानिक व्यावसायिक आणि हॉटेल मालकांनी हवामान लवकर स्थिर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Web Title: Matheran hit by sudden rains tourist facing problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 09:35 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Matheran
  • Monsoon

संबंधित बातम्या

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
1

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ
2

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा
3

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince
4

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.